महत्वाच्या बातम्या
-
पुणे, नाशिक, नवी मुंबई, नागपूरमधील शिवसैनिकांचं राजकीय अस्तित्व धोक्यात
पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे राखले आहेत. तर शिवसेनेच्या वाट्याला एकही मतदारसंघ आलेला नाही त्यामुळे आगामी काळात शिवसेनेला पुण्यात आपले राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी झगडावं लागणार असल्याचं दिसत आहे. भारतीय जनता पक्षाने नुकतीच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भारतीय जनता पक्षाने कोथरूड, शिवाजीनगर, कॅन्टोंमेंट, कसबा, वडगाव शेरी, पर्वती, हडपसर, खडकवासला या आठही मतदार संघातील उमेदवारांची घोषणा केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
वडाळा: भाजपाची कालिदास कोलंबकरांना उमेदवारी; सेनेच्या श्रद्धा जाधव बंडखोरीच्या तयारीत
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज आपल्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, दक्षिण कराडमधून अतुल भोसले यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात उतरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, तब्बल १२ विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आयातांना एबी-फॉर्म मिळाले, तर सच्चे शिवसैनिक मातोश्रीच्या गेटवर वेटिंगवर
शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीची घोषणा अखेर पत्राद्वारे करण्यात आली आहे. मात्र ज्या गोष्टीची अवघ्या राजकीय विश्वात उत्सुकता आहे, त्या जागावाटपाचा फॉर्म्युला मात्र अद्याप जाहीर झालेला नाही. कोणता पक्ष कोणत्या आणि किती जागा लाढवणार हे स्पष्ट करण्यात आले नसले तरी सूत्रांच्या म्हणण्यानुसार शिवसेनेच्या वाट्याला १२४ जागा आल्या असून, मित्रपक्षांसहित भाजपकडे १६४ जागा आल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
वरळीला जागतिक पातळीवर घेऊन जाणार: आदित्य ठाकरे
विधानसभेसाठी महायुती होणार की नाही याबरोबरच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवणार की नाहीत, याविषयी गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, महायुतीसह आदित्य यांच्या निवडणूक लढवण्यावरही सोमवारी शिक्कामोर्तब झाले. ‘वरळी मतदारसंघातून मी विधानसभा निवडणूक लढवणार आहे’, असे खुद्द आदित्य यांनीच जाहीर केले. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात उतरणारे आदित्य हे ‘ठाकरे’ कुटुंबातील पहिली व्यक्ती ठरले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कल्याण ग्रामीण: शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे मनसेला फायदा? सविस्तर
कल्याण ग्रामीण मतदारसंघ २००९मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ताब्यात घेतला होता. त्यावेळी मनसेचे रमेश पाटील यांनी शिवसेनेला धोबीपछाड देत विधानसभा गाठली होती. मात्र २०१४मध्ये आलेल्या मोदी लाटेमुळे इथली समीकरणं बदलली आणि विधानसभा निवडणुकीत युती संपुष्टात आली तरी शिवसेना एनडीएचा घटक पक्ष असल्याने त्याचा थेट फायदा शिवसेनेच्या उमेदवारांना झाला होता आणि शिवसेनेचे सुभाष भोईर यांनी ८४, ११० मतं घेत विधानसभा गाठली होती, तर मनसेचे रमेश पाटील यांना ३९, ८९८ मतं मिळाली होती.
5 वर्षांपूर्वी -
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ; शिवसैनिकांचं भाजप विरोधात बंड
विधानसभा निवडणुकीचा प्रचार दोन दिवसांवर आलेला असतात ठाणे शहर मतदारसंघात शिवसेना आणि भाजपमधील वाद विकोपाला गेल्याचं वृत्त आहे. त्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान,एकूणच ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातं असल्याने शिवसेना हा मतदारसंघ सोडण्यास तयार नाही.
5 वर्षांपूर्वी -
तानाजी सावंत यांच्या गाडीनं तरुणाला उडवल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीने एका व्यक्तीला उडवल्याची घटना सोलापुरात घडली आहे. यानंतर संतप्त जमावानं सावंत यांच्या गाडीची तोडफोड केली. अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. बार्शी तालुक्यातील शेलगावमध्ये हा अपघात झाला. अपघातावेळी तानाजी सावंत गाडीमध्ये नव्हते, अशी माहिती मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
सेनेला दुर्लक्षित करत भाजप नारायण राणेंचा २ ऑक्टोबरला पक्ष प्रवेश करून घेणार
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे २ ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंतीच्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. नारायण राणे यांच्या प्रहार या दैनिकाच्या संकेतस्थळावर याबाबत माहिती देण्यात आली आहे. भाजप-शिवसेना युती होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबई येथे घेतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात युती होणारच यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे शिवसेनेचा नारायण राणे यांच्या प्रवेशाला होणारा विरोध देखील निवळल्याचे दिसते. १ ऑक्टोबरपर्यंत युती आणि जागावाटपाची घोषणा होणार आहे. त्यानंतर २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करतील.
5 वर्षांपूर्वी -
सेना-भाजप युतीचं जागावाटप आज ठरणार? भाजपची दिल्लीत महत्वाची बैठक
काही दिवसांवर येऊ ठेपलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील भाजपाच्या उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक रविवार, २९ सप्टेंबर रोजी दिल्लीत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल व त्यात शिवसेनेशी युतीबाबतची भूमिकाही याच बैठकीत निश्चित केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. शिवसेनेबरोबरच्या जागावाटपावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात येईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
मी शेतकऱ्यांना कर्ज मुक्त आणि चिंतामुक्त केल्याशिवाय राहणार नाही: उद्धव ठाकरे
भाजप-शिवसेनेची युती होणार हे आता निश्चित झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः युतीची घोषणा एक दोन दिवसांत होणार असल्याचं सांगितले आहे. शिवसेनेकडून मुंबईमध्ये आयोजित प्रमुख पदाधिकारी आणि इच्छुकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी माझं आणि अमित शहाचं चांगलं बोलणं सुरु आहे, युतीची घोषणा आज-उद्यामध्ये होईल, असं त्यांनी सांगितले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मी शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवल्याशिवाय राहणार नाही: उद्धव ठाकरे
भाजप-शिवसेनेची युती होणार हे आता निश्चित झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः युतीची घोषणा एक दोन दिवसांत होणार असल्याचं सांगितले आहे. शिवसेनेकडून मुंबईमध्ये आयोजित प्रमुख पदाधिकारी आणि इच्छुकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी माझं आणि अमित शहाचं चांगलं बोलणं सुरु आहे, युतीची घोषणा आज-उद्यामध्ये होईल, असं त्यांनी सांगितले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना: उद्धव ठाकरे
भाजप-शिवसेनेची युती होणार हे आता निश्चित झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः युतीची घोषणा एक दोन दिवसांत होणार असल्याचं सांगितले आहे. शिवसेनेकडून मुंबईमध्ये आयोजित प्रमुख पदाधिकारी आणि इच्छुकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी माझं आणि अमित शहाचं चांगलं बोलणं सुरु आहे, युतीची घोषणा आज-उद्यामध्ये होईल, असं त्यांनी सांगितले आहे.
5 वर्षांपूर्वी -
ज्या घोटाळ्यावरुन ईडीने FIR दाखल केला आहे, त्या बँकेत शरद पवार कोणत्याही पदावर नव्हते
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी)होणाऱ्या चौकशीवरुन सध्या मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी तणावाचं वातावरण आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी ईडीच्या मुंबईतील कार्यालयात शरद पवार स्वत:च उपस्थित राहणार आहेत. त्यांनी स्वत: आपण ईडी कार्यालयात जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांना समर्थन दिलं आहे. शरद पवार राजकारणातले भिष्म पीतामह असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
विधानसभा: शिवसेनेच्या या मंत्र्यांचा सांगली पदाधिकारी मेळाव्यात पुन्हा स्वबळाचा नारा
युतीचे गाडे अडलेले असतानाच, बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे बुधवारी नवी मुंबईत एकत्र आले होते. यामध्ये दोघांनीही ‘पुढील सरकार युतीचेच’ असा विश्वास व्यक्त केल्याने युतीचे संकेत मिळत आहेत. जागांचा तिढा सोडवण्यासाठी बुधवारी रात्री मुख्यमंत्री व उद्धव यांची भेट निश्चित झाली होती. त्यानंतरच मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीतील नेत्यांची भेट घेण्यासाठी रवाना होणार आहेत. ‘बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री ‘मातोश्री’वर येऊ शकतात अथवा उद्धव ठाकरे ‘वर्षा’वर जाऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू शकतात’, अशी माहिती शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने प्रसार माध्यमांना दिली होती.
5 वर्षांपूर्वी -
RBI सांगते ६ महिन्यांनी आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन निर्णय; आ. वायकर सांगतात आठवड्यात सुरु?
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत. २३ सप्टेंबर पासून हे निर्बंध लागू झाले आहेत. बँकेची सद्यस्थिती पाहून नागरिकांच्या हितासाठी बँकेवर निर्बंध आणल्याचं रिझर्व्ह बँकेने आपल्या आदेशात नमूद केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
हडपसरची जागा मनसे खेचून आणणार असल्याने भाजप हडपसर सेनेला देणार?
शिवसेना भाजप युतीच्या जागावाटपाचा तिढा अजून संपलेला नसतात काही जागांच्या अदलाबदलीची कारणं त्यासाठी पुढे करण्यात आली आहेत. पुण्यात भाजप सेनेला ठेंगा देण्यात तयारीत असून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रावर भाजपने लक्ष केंद्रित केलं आहे. मात्र शिवसेना पुण्यात अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपडत असल्याने भाजप हाती न येणाऱ्या पुण्यातील जागा शिवसेनेला देण्याच्या तयारीत आहे. भाजप आणि शिवसेनेचे युतीचे ठरले असून मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील काही जागांची अदलाबदल करण्यात येणार आहे. या बदलाचा फटका भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांना बसण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
युती झाल्यास शिवसेनेचे ठाण्यातील काही आमदार फुटण्याची शक्यता: सविस्तर
विधानसभेला निम्म्या निम्म्या जागा वाटून घेण्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत जाहीर केल्यानंतरही प्रत्यक्षात कमी जागा घेत भाजपसोबत युती करायची की नाही, अशा द्विधा मनस्थितीत शिवसेना नेतृत्व अडकल्याचे कळते. शिवसेनेला १२० जागा देऊ पाहणाऱ्या भाजपचे गाडे काही केल्या पुढे सरकत नसल्याने कमी जागा घेऊन युती करायची की कसे याबाबत शिवसेनेच्या आमदार, नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशीच शिवसेना नेतृत्व संपर्क साधणार असल्याचे कळते.
5 वर्षांपूर्वी -
स्वबळावर की मिळेल त्यात समाधान मानायचं? शिवसेनेचं काहीच ठरेना: सविस्तर
विधानसभेला निम्म्या निम्म्या जागा वाटून घेण्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत जाहीर केल्यानंतरही प्रत्यक्षात कमी जागा घेत भाजपसोबत युती करायची की नाही, अशा द्विधा मनस्थितीत शिवसेना नेतृत्व अडकल्याचे कळते. शिवसेनेला १२० जागा देऊ पाहणाऱ्या भाजपचे गाडे काही केल्या पुढे सरकत नसल्याने कमी जागा घेऊन युती करायची की कसे याबाबत शिवसेनेच्या आमदार, नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशीच शिवसेना नेतृत्व संपर्क साधणार असल्याचे कळते.
5 वर्षांपूर्वी -
'१९९०-१८३ जागा ते २०१९-१२६' जागा! भाजपसोबत सेनेच्या अधोगतीचा प्रवास: सविस्तर
नव्वदच्या दशकात जन्माला आलेली भाजप-शिवसेना युतीचा इतिहास सर्वात मोठा आहे. मात्र तेव्हा पासूनच युतीचा जागा वाटपाचा प्रवास पाहिल्यास शिवसेना अस्ताच्या दिशेने स्वतःहूनच जाते आहे का असा प्रश्न आकडेवारी सिद्ध करत आहे. विशेष करून उद्धव ठाकरे यांचं राजकारणातील सक्रिय होणं आणि त्यानंतर शिवसेनेच्या युतीतील जागांचा कानोसा घेतल्यास उद्धव ठाकरे यांच्या नैर्तृत्वात शिवसेना वाढते आहे की घटते आहे असा प्रश्न आकडेवारी उपस्थित करत आहे.
5 वर्षांपूर्वी -
काही लोकांनी भाड्याने पत्रकारीता करायला सुरूवात केली आहे: प्रियांका चतुर्वेदी
आज तक या हिंदी वृत्तवाहिनीच्या अँकर अंजना ओम कश्यप यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबाबत केलेल्या टिप्पणीचा एक व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. यावेळी अँकरने काँग्रेसे नेते राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांच्यात तुलना करणारी धक्कादायक टिप्पणी केल्याचं या व्हिडीओ’मध्ये स्पष्ट दिसत आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा
- Vodafone Idea Share Price | पेनी शेअर रॉकेट तेजीत, 5 दिवसात 25 टक्के कमाई, पुढेही मालामाल करणार - NSE: IDEA