महत्वाच्या बातम्या
-
राणे म्हणतात वाघाची शेळी-मेंढी झाली; तर धनंजय मुंडे म्हणतात ही कुत्र्यासारखी अवस्था
विधानसभा निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे राजकीत आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झडताना दिसत आहे. आता तर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. राजकारणात शिवसेनेची अवस्था ही कुत्र्या सारखी झाली आहे, एक गोष्ट सांगून धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव म्हणाले युतीचा फॉर्मुला लोकसभेलाच ठरला; चंद्रकांत दादा म्हणतात कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही
युतीचा फॉर्मुला लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या वेळीच ठरलेला आहे. युतीमध्ये कुठलाही तिढा नाही. येत्या एक ते दोन दिवसांत युतीची घोषणा होईल,’ अशी माहिती शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. भाजपवर नाराज असलेले विदर्भातील शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.
5 वर्षांपूर्वी -
हिंदी-गुजराती मतांसाठी सेना झुकणार; भाजप देईल तेवढ्या जागा घेत युतीस तयार? सविस्तर
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक तारखांची लवकरच घोषणा होणार होणार आहे. त्याआधी शिवसेना-भाजपने जागावाटपाच्या नव्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केलेल्या चर्चेनंतर हा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या फॉर्म्युल्याला हिरवा कंदील दाखवला, अशी माहिती आहे.
5 वर्षांपूर्वी -
५ वर्ष उद्योगमंत्री सेनेचेच; मग आदित्य यांनी बेरोजगारी कमी का केली नाही? डॉ. अमोल कोल्हे
मी पुन्हा मुख्यमंत्री होणार असे म्हणत जनादेश यात्रा काढणारे मुख्यमंत्री पहिल्यांदाच पाहिले आहेत. पाच वर्ष कामे केली असती तर हि वेळ आली नसती. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे प्रदुषण मुख्य महाराष्ट्र करण्याची भाषा करत आहेत. मग पर्यावरण मंत्री रामदास कदम काय करत होते. पाच वर्षांत शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलेली १५ कामे दाखवा असे म्हणत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेना भाजपवर निशाणा साधला. ते कर्जत येथे शिवस्वराज्य यात्रे दरम्यान आयोजीत सभेत बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेना कोकणात मी आणली होती, पुढच्या वेळी दोन्ही खासदार भाजपचे असतील: खा. नारायण राणे
येत्या आठ दिवसात भाजपात प्रवेश करणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली. भाजपात प्रवेश करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा आक्षेप असण्याचं काहीही कारण नाही, असंही ते म्हणाले. शिवसेना कोकणात मी आणली होती, त्यामुळे भाजपात प्रवेश केल्यास कोकणात पुढच्या वेळी दोन्ही खासदार भाजपचे असतील, असा विश्वास राणेंनी व्यक्त केला.
5 वर्षांपूर्वी -
बाळासाहेबांच्या स्मारकासाठी आ. प्रताप सरनाईकांनी ५ वर्षात एक दमडी आणली नाही: आ. नरेंद्र मेहता
स्थायी समितीच्या बैठकीत बाळासाहेब ठाकरे कला दालनाच्या निविदा विषयाला स्थगिती दिल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत स्थायी समिती सभागृहाची तोडफोड केली. तसेच शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपाच्या स्थानिक आमदाराला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत महापालिका मुख्यालय दणाणून सोडले. तर सभागृहाबाहेर जमलेल्या शिवसैनिकांनी महापौर दालनाची तोडफोड केली.
5 वर्षांपूर्वी -
मोदींच्या आणि भाजपच्या जीवावरच शिवसेना जिंकते; शिवसेनेने माफी मागावी: आ. नरेंद्र मेहता
स्थायी समितीच्या बैठकीत बाळासाहेब ठाकरे कला दालनाच्या निविदा विषयाला स्थगिती दिल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत स्थायी समिती सभागृहाची तोडफोड केली. तसेच शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपाच्या स्थानिक आमदाराला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत महापालिका मुख्यालय दणाणून सोडले. तर सभागृहाबाहेर जमलेल्या शिवसैनिकांनी महापौर दालनाची तोडफोड केली.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेना तब्बल ८-१० विद्यमान आमदारांचे तिकीट कापणार; कोअर कमिटीकडून नावं निश्चित
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही जाहीर होऊ शकते. मात्र शिवसेनेतील गोटातून अनेक विद्यमान आमदारांना नारळ दिला जाऊ शकतो असं वृत्त आहे. यामध्ये पक्षाने स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या आहेत. तसेच इतर पक्षातील आयात दिग्ग्जची आर्थिक ताकदीवर वर्णी लागण्याची शक्यता असल्याने आमदार धास्तावले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
पवारसाहेब, स्वाभिमान म्हणजे नक्की काय? : उद्धव ठाकरे
पक्ष सोडून जाणाऱ्यांना पळपुटे म्हणणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. ‘आज तुम्ही ज्यांना पळपुटे म्हणत आहात ते काल कुठून तरी पळून किंवा फुटूनच तुमच्या तंबूत शिरले होते. आता तुमचा तंबू भुईसपाट झाल्यावर स्वाभिमानाचे नाव का घेता? हा स्वाभिमान म्हणजे नक्की काय असतो?,’ असा खोचक सवाल उद्धव यांनी पवारांना केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
दाऊदला मुंबई सोडायला लावली; इथे कोण दादागिरी करेल: प्रदीप शर्मा
एक दोन दिवसात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता असून सर्वच पक्ष आणि त्यांचे संभाव्य उमेदवार कामाला लागल्याचं दिसत आहे. नुकताच पोलीस खात्यातून राजीनामा देत राजकरणात प्रवेश करणारे मुंबई पोलीस दलातील एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला. त्यानंतर त्यांना नालासोपारा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे आमदार आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितिज ठाकूर यांच्या विरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरवल जाणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
5 वर्षांपूर्वी -
'सातारचे राजे' असा उल्लेख करत शिवसेनेकडून उदयनराजेंची खिल्ली
उदयनराजे भोसले हे शिवरायांचे १३ वे वंशज आहेत म्हणून त्यांना समाजात मान आहे. त्यामुळे उदयनराजेंना जाळ्यात ओढल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाची मते पदरात पडतील असे भाजपचे गणित आहे, पण शिवराय हे फक्त एका जातीचे नव्हेत, तर सर्व जाती-धर्माच्या लोकांचे दैवत आहे. त्यामुळे शिवरायांचे तेरावे वंशज एका जातीच्या राजकारणाचे ‘मोहरे’ म्हणून राजकारणात वापरले जात असतील तर तो शिवरायांचा अपमान ठरेल,’ अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
दिल्लीत भाजपात प्रवेश घेताना हायकमांडसमोर कॉलरही उडवली नाही: शिवसेना
उदयनराजे भोसले हे शिवरायांचे १३ वे वंशज आहेत म्हणून त्यांना समाजात मान आहे. त्यामुळे उदयनराजेंना जाळ्यात ओढल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाची मते पदरात पडतील असे भाजपचे गणित आहे, पण शिवराय हे फक्त एका जातीचे नव्हेत, तर सर्व जाती-धर्माच्या लोकांचे दैवत आहे. त्यामुळे शिवरायांचे तेरावे वंशज एका जातीच्या राजकारणाचे ‘मोहरे’ म्हणून राजकारणात वापरले जात असतील तर तो शिवरायांचा अपमान ठरेल,’ अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदींनी लोकांच्या हाती भिकेचे वाडगे दिल्याचा संताप कॉलर उडवत केला होता: शिवसेना
उदयनराजे भोसले हे शिवरायांचे १३ वे वंशज आहेत म्हणून त्यांना समाजात मान आहे. त्यामुळे उदयनराजेंना जाळ्यात ओढल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाची मते पदरात पडतील असे भाजपचे गणित आहे, पण शिवराय हे फक्त एका जातीचे नव्हेत, तर सर्व जाती-धर्माच्या लोकांचे दैवत आहे. त्यामुळे शिवरायांचे तेरावे वंशज एका जातीच्या राजकारणाचे ‘मोहरे’ म्हणून राजकारणात वापरले जात असतील तर तो शिवरायांचा अपमान ठरेल,’ अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
SaveAarey: आदित्य ठाकरे नाही; ते तर 'पप्पू ठाकरे' आहेत: आपच्या नेत्या प्रीती शर्मा
आरे कॉलनीतील मेट्रोच्या कारशेड डेपोवरून सध्या मुंबई शहरातील वातावरण तापलं असून हजारो मुंबईकर आणि पर्यावरणप्रेमी वृक्षतोडीविरुद्ध रस्त्यावर उतरत आहेत. त्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेत, राज्यात, दिल्लीत सत्ता असताना केवळ दाखवण्यापुरता विरोध केला जातं असल्याचा आरोप यापूर्वी देखील विरोधकांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेला युतीसाठी दिली ही नवी ऑफर; अन्यथा भाजपची स्वबळाची तयारी?
शिवसेनेशी युती करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आपला फॉर्म्युला तयार केला असून, यामध्ये निम्म्या-निम्म्या जागांची मागणी तुर्तास अमान्य केली आहे. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला १२० जागा देऊ केल्या असून, स्वत: १५६ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरीत १२ जागा मित्र पक्षांना सोडण्याची तयारी दर्शवली आहे. आता यावर शिवसेनेच्या भूमिकेकडे भारतीय जनता पक्षाचे लक्ष आहे.
5 वर्षांपूर्वी -
प्रदीप शर्मां शिवसेनेकडून आमदार क्षितिज ठाकूर यांच्याविरुद्ध मैदानात उतरणार?
प्रदीप शर्मा यांनी ४ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यानंतर प्रदीप शर्मा राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. आता राज्याच्या गृह विभागाने राजीनामा मंजूर केल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर प्रदीप शर्मा नालासोपारा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सध्या वसई-विरार भागातील ठाकूर कुटुंबाची असलेली एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी शिवसेनेकडून प्रदीप शर्मा यांना नालासोपारा मतदार संघातून क्षितीज ठाकूर यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
मंगलदास बांदल आंबेगावमधून दिलीप वळसे-पाटील यांच्या विरुद्ध सेनेकडून लढण्याची शक्यता
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे तर अनेक नेते भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल शिवसेनेच्या वाटेवर
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे तर अनेक नेते भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
5 वर्षांपूर्वी -
सेनेची स्थायी समिती सुसाट! मुंबई महापालिकेत २ दिवसांत १६०० कोटींचे प्रस्ताव मंजूर
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता चार-पाच दिवसांत लागू होण्याची शक्यता गृहीत धरून मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने कामे मंजुरीचा सपाटाच लावला आहे. पाचशे कोटी रुपयांच्या दीडशे कामांना सोमवारी मंजुरी देणाऱ्या पालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी आणखी चारशे कोटींच्या ५० हून अधिक प्रस्तावांना हिरवा कंदील दाखवला. यामध्ये रस्ते, जलवाहिन्या दुरुस्तीसह अन्य काही प्रस्तावांचा समावेश आहे.
5 वर्षांपूर्वी -
राजीनामा मंजूर; एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा सेनेकडून निवडणूक लढवण्याची शक्यता
राज्य सरकारच्या गृहखात्याने एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा राजीनामा स्वीकारला आहे. प्रदीप शर्मा हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते. प्रदीप शर्मा यांनी जुलै महिन्यातच तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यानंतर ते निवडणूक लढवू शकतात अशीही चर्चा रंगली होती. आता एएनआयनेही ही शक्यता वर्तवली आहे. प्रदीप शर्मा येत्या विधानसभा निडवणुकीत निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याचं एएनआयने म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News