महत्वाच्या बातम्या
-
भाजप शिवसेनेला केवळ १२० ते १२५ जागा देण्याच्या तयारीत: सविस्तर
युतीचे जागावाटप निम्म्या जागांच्या समीकरणात होणार नाही, या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर जागावाटपाचा अधिकार मी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शहा यांचाच असल्याचे ठासून सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपण चंद्रकांत पाटील यांच्या विधानाला किंमत देत नसल्याचे सूचित केले.
5 वर्षांपूर्वी -
भुजबळांना शिवसेनेत घेणार नाही, नाशिकमध्ये पक्ष फुटण्याच्या भीतीने उद्धव यांचा निर्णय
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी भारतीय जनता पक्ष शिवसेनेते प्रवेश केला आहे. त्यानुसार राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री छगन भुजबळ हे पुन्हा घरवापसी करणार असल्याची चर्चा आहे. मात्र ही चर्चा केवळ एक अफवा आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. तरी देखील छगन भुजबळ यांच्या सध्याच्या हालचालींवरून भुजबळ हे शिवसेना प्रवेश करणार असल्याचं बोलल जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
विधानसभा: शिवसेनेच्या योजना बहुजन विकास आघाडीच्या मुळावर? सविस्तर
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने आपले इनकमिंग सुरू केले आहे. त्याचाच भाग म्हणून विजयी होऊ शकणाऱ्यांना शिवबंधन बांधण्याचे काम वेगात आले असून येत्या आठवड्यात बार्शीचे राष्ट्रवादीचे आ. दिलीप सोपल आणि बोईसरचे बहुजन विकास आघाडीचे आ. विलास तरे यांना शिवबंधन बांधण्याचे निश्चित झाले आहे.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे अजून काही आमदार शिवसेनेच्या वाटेवर
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने आपले इनकमिंग सुरू केले आहे. त्याचाच भाग म्हणून विजयी होऊ शकणाऱ्यांना शिवबंधन बांधण्याचे काम वेगात आले असून येत्या आठवड्यात बार्शीचे राष्ट्रवादीचे आ. दिलीप सोपल आणि बोईसरचे बहुजन विकास आघाडीचे आ. विलास तरे यांना शिवबंधन बांधण्याचे निश्चित झाले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मंदी व बेरोजगारीचे मूळ नोटबंदीच्या निर्णयात; उद्धव यांची मोदींच्या आर्थिक धोरणांवर टीका
देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये असतानाही केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार कुठलीही उपाययोजना करत नसल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने केली जाते. ऑटो क्षेत्रातील मंदी, हजारो नोकरदारांवर कोसळलेली बेरोजगारीची कुऱ्हाड, शेअर बाजारातील घसरण, डॉलरचा वधारलेला भाव या घडामोडींमुळे अर्थतज्ज्ञही चिंता व्यक्त करत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास भारताची अर्थव्यवस्था खूपच भक्कम आहे, इतर देशांच्या तुलनेत आपला विकासदरही आश्वासक आहे, असा दावा केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून नोटबंदीच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
बीडीडी चाळ पुनर्विकास समितीतून सेनेला डावललं; आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर नाराजी
मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या मुंबईतील विविध ठिकाणच्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्पाच्या बाबतीत ३१ ऑगस्टला भेट घेणार असल्याचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले. म्हाडाच्या प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांसंदर्भात गुरुवारी वांद्रे येथील म्हाडा भवनामध्ये पत्रकार परिषदेमध्ये ही त्यांनी ही माहिती दिली. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी येत्या २६ तारखेला प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये याबाबतचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील, असेही सांगण्यात आले. यावेळी शिवसेनेचे इतर आमदारही उपस्थित होते.
5 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद: राजकीय फायद्यासाठी एमआयएम'शी साटंलोटं करत निवडणूक जिंकून दाखवली
लोकसभा निवडणुकीत ‘एमआयएम’ आणि शिवसेनेत झालेल्या लढतीत ‘एमआयएम’ने शिवसेनेचा पराभव केला होता. पण त्याच ‘एमआयएम’ने विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेला मदत केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे कशी असतील याची चर्चा सुरू झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
चिदंबरम ‘हिंदू दहशतवाद’ शब्दाचे जनक : शिवसेना
आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना जामीन नाकारण्यात आला असून त्यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या राउज अॅव्हेन्यू कोर्टाने गुरुवारी हा निर्णय दिला.
5 वर्षांपूर्वी -
राज्य सहकारी बँक घोटाळा: राष्ट्रवादी, सेनेच्या नेत्यांसह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी पाच दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे आर्थिक गुन्हे शाखेने (ईवोडब्ल्यू) दिले आहेत. २५ हजार कोटींच्या कर्जवाटप घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार, हसन मुश्रीफ, मधुकर चव्हाण, आनंदराव अडसूळ यांच्यासह इतर बड्या नेत्यांचा समावेश असल्याचे याचिकेत नमूद आहे. अजित पवारांसह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आज न्यायालयाने दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
विधानसभा:: राणेंना भाजपात तर भुजबळांना शिवसेनेत आणण्याची तयारी?
राज्याच्या सक्रीय राजकारणातून बाहेर फेकले गेलेले माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे नाराज असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कॉंग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक असणारे राणे यांना शिवसेनेच्या विरोधामुळे स्वतंत्र पक्ष काढावा लागला आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आग्रही असल्याने मुख्यमंत्र्याची भेट घेतल्याचं बोलले जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
ईडीच्या नोटीसमध्ये 'भेटायला या' एवढाच उल्लेख आहे : उन्मेष जोशी
कोहिनूर मिल प्रकरणात मनसेप्रमुखराज ठाकरे यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीविरोधात मनसेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ”पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नव्या भारतातील हिटलर आहेत. राज ठाकरेंना बजावण्यात आलेली ईडीची नोटीस हा केवळ दबावतंत्राचा भाग आहे. गेल्या पाच सहा वर्षांत भाजपाच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी झालेली नाही. मात्र अशा चौकशांना मनसे घाबरणार नाही, तर हिटलरशाहीविरोधातील लढा सुरूच राहील, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला.
5 वर्षांपूर्वी -
देशभरात प्लॅस्टिक बंदी कठोरपणे करा: आदित्य ठाकरे
संपूर्ण देशात प्लॅस्टिकबंदी कायदा करून कडक अंमलबजावणी करा, अशी मागणी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली आहे. महाराष्ट्रात प्लॅस्टिकबंदी लागू झाली असून अंमलबजावणी करण्यात येत आहे. परंतु आता ‘सिंगल यूज’ प्लॅस्टिक देशातून हद्दपार करण्याची गरज असून त्यासाठी कठोर कायदा करून काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आज शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला तेव्हा त्यांनी हे भाष्य केलं.
5 वर्षांपूर्वी -
‘वंचित’कडून २८८ जागा लढण्यासाठी मोर्चेबांधणी; भाजप-सेना देखील स्वबळावर? सविस्तर
महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुका काही महिन्यांतच होणार असून, वंचित बहुजन आघाडीला निवडणूक लढविण्यासाठी निवडणूक आयोगाने कपबशी गायब करून गॅस सिलिंडर हे चिन्ह दिलं आहे. तसेच वंचित आघाडीकडूनही २८८ जागा लढविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मात्र आता मतदारांंपर्यंत कपबशी ऐवजी गॅस सिलेंडर हे नवे चिन्ह पोहोचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
कारण उद्धव ठाकरे म्हणाले, ‘राणे परत आले तर मी घर सोडीन’
राज्याचे माजी मुख्यमंत्री, ‘प्रहार’चे संपादकीय सल्लागार, खासदार नारायण राणे यांचे आत्मकथन असलेल्या ‘झंझावात’ या मराठी पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते, No Holds Barred या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभगृहात शुक्रवारी सायंकाळी एका शानदान समारंभात झाले. या कार्यक्रमास राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, सांस्कृतिक व मराठी भाषा मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, खा. सुनील तटकरे, आ. कालिदास कोळंबकर, दोन्ही पुस्तकांचे संपादक प्रियम मोदी, मधुकर भावे, सौ. निलमताई राणे, निलेश राणे, आ. नितेश राणे आदी उपस्थित होते.
5 वर्षांपूर्वी -
ठाण्यात आदित्य ठाकरेंचा ताफा खड्ड्यांमुळे वाहतुककोंडीत अडकला; खापर फोडलं मेट्रो प्रशासनावर
मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांमधील महानगर पालिकेत देखील शिवसेनेची सत्ता आहे आणि मुंबईप्रमाणेच या शहरातील पायाभूत सुविधांची अवस्था देखील देखील बकाल झाली आहे. अगदी रोजच्या प्रवासात सामान्य शहरवासीयांचा अर्धा वेळ या प्रवासातच निघून जातो. त्यात खड्यांमुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढलं असून प्रवासात एखाद्याचा जीव जाण यात काहीच नवीन उरलेलं नाही. मुंबई, ठाणे. कल्याण-डोंबिवली या शहरांमधील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट असल्याचं स्थानिक नागरिकांचं देखील म्हणणं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मतांसाठी मालमत्ता करमाफीची घोषणा करत शिवसेनेने मुंबईकरांना टोप्या लावल्याचं उघड
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्याची घोषणा शिवसेनेने केली होती. पण, ही घोषणा पोकळच ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वसाधारण कर वगळून मालमत्ता कराची बिले लवकरच करदात्यांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे ५०० चौरस फुटांपर्यंतचे घर असलेल्यांना ७० टक्के बिल भरावेच लागणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
मी त्या महिलेचा हात पकडलाच नव्हता; असं वागणं ही सेनेची संस्कृती नाही: महापौर
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे सोमवारी त्यांच्याच मतदारसंघातील महिलेशी असभ्य वागले. त्यांच्या पदाला हे शोभण्यासारखं नसून ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. यापूर्वी देखील त्यांनी मुंबईतील अनेक गंभीर घटनांवर अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक प्रतिक्रिया दिल्याचा इतिहास आहे. डोळ्यासमोर दिसणाऱ्या गोष्टींवर देखील ते धादांतपणे खोटं बोलताना मुंबईकरांनी अनुभवलं आहे. काही दिवसांपूर्वी अनेक भागात पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबलेले असताना देखील त्यांनी ऑन कॅमेरा ते अमान्य करत प्रसार माध्यमांनाच चुकीचं म्हटलं होतं. मुंबईतील शहरामध्ये घडलेल्या अशा अनेक घटनांवेळी त्यांनी संतापजनक वक्तव्य केली आहेत. त्यात शिवसेनेकडून देखील त्यांच्या गैरवर्तनावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही आणि त्यांना कोणतीही समज देखील देण्यात आलेली नाही.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईच्या प्रथम नागरिकाचेच महिलांशी थर्ड-क्लास वर्तन चिंताजनक
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांताक्रूझ येथे जाब विचारणा-या महिलेचा हात पिरगळून तिला अपशब्द वापरल्याबद्दल तत्काळ त्यांच्याविरोधात ३५४ अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे. मंगळवारी विश्वनाथ महाडेश्वर यांचा उद्दामपणा एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आला.
6 वर्षांपूर्वी -
सेनेत गृहकलह वाढवण्यासाठी फडणवीसांनी आदित्य यांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केलं? सविस्तर
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहचत आहेत. मात्र ही यात्रा सुरु झाल्याप्पासून आदित्य ठाकरे हेच शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील अशी चर्चा आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष आता विधानसभा निवडणुकीवर लागले आहे. त्यातच मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये चढाओढ पहायला मिळत आहे. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केलेले पहायला मिळत आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO पुरावे: ईव्हीएम'संदर्भात उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचे ही गंभीर आरोप होते
ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरनं निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करावे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी गुणवत्ता असलेल्या आमदार-पदाधिकारी व अन्य नेत्यांना भाजपात सुरू असलेला प्रवेश आता बंद झाला असला तरी विदर्भातील नेत्यांचे आम्ही स्वागत करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले आहे. ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करणे हे अविश्वास दर्शविण्यासारखे आहे. ते न करता आत्मचिंतन करावे, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Poco X7 5G | 32MP फ्रंट कॅमेरा, Poco X7 5G स्मार्टफोन लवकरच लाँच होतोय, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनला तोड नाही
- Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती