महत्वाच्या बातम्या
-
धक्कादायक! शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक
अंबरनाथमधील शिवसेनेच्या माजी नगरसेवकावल बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच याप्रकरणात त्याला अटकही करण्यात आली आहे. प्रधान पाटील असं या माजी नगरसेवकाचे नाव आहे. अंबरनाथमध्ये एका महिलेने शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर गुरुवारी बलात्काराचा आरोप केल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर आज पोलिसांनी याची दखल घेत प्रधान पाटील याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी प्रधान पाटील याला अटक केली आहे. याप्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत. लवकरच या प्रकरणातील संपूर्ण माहिती समोर येईल.
6 वर्षांपूर्वी -
२००९-२०१४ मध्ये फक्त जाहिरातीत माउलीच्या समस्या समजून घेतल्या; उद्यापासून पुन्हा 'माउली संवाद'
महाराष्ट्र शासनाने सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या अध्यक्ष पदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याने साहजिकच शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा प्राप्त झाला होता. आदेश बांदेकर हे शिवसेनेत सध्या सचिव या पदावर असून, शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या मुंबईच्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष पद त्यांना देण्यात आले होते
6 वर्षांपूर्वी -
भाजपनीती! एनसीपी'चे बहुतांश आमदार सेनेविरुद्ध निवडून आल्याचा इतिहास; युती अचानक तोडणार? सविस्तर
लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असल्या तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाचे अंतर्गत मनसुबे भलतेच असू शकतात याची शिवसेनेला देखील पूर्व कल्पना असणार. त्यात लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेलं यश देखील मोदीमुळेच आहे असं भाजपचे अनेक नेते पडद्याआड बोलून दाखवत आहेत, तर शिवसेनेचे अनेक खासदार देखील ते पाठीमागे मान्य करतात.
6 वर्षांपूर्वी -
खेकड्यांमुळे धरण कसे फूटू शकते? विद्यार्थ्याचा आदित्य ठाकरेंना सवाल
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारांनी शिवसेनेला मतदान केले त्यांचे आभार मानण्यासाठी आणि ज्यांनी शिवसेनेला मतदान केले नाही त्या मतदारांचे मन जिंकण्यासाठी आदित्य ठाकरेंनी आज सोलापुरातून यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली आहे. यावेळी वालचंद महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, ‘युवासेनाप्रमुख म्हणून तुमचे प्रश्न पुढे नेण्यासाठी मला ते ऐकणे गरजेचे आहे म्हणूनच मी युवा संवाद हा कार्यक्रम घेतला आहे, असे म्हणत, १८ ते १९ वर्षाच्या वयात मनात जे प्रश्न आहेत ते विचारायला विद्यार्थी घाबरत नाहीत’, याचे आदित्य ठाकरेंनी कौतुक केले.
6 वर्षांपूर्वी -
भाजप-सेनेच्या 'महाजनादेश आणि जण आशीर्वाद' यात्रेला 'शिवस्वराज्य यात्रेने' उत्तर
आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सत्ता कायम राखण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. एकीकडे इतर पक्षांमधील नेत्यांना पक्षामध्ये प्रवेश देण्यात येत असतानाच थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पक्षाने महाजनादेश यात्रेची घोषणा केली आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या या महाजनादेश यात्रेला एनसीपी’च्या माध्यमातून प्रत्युत्तर देणार असून, खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली येत्या 6 ऑगस्टपासून या शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात होणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
१५ दिवसांचा इशारा: पीकविमा कंपन्यांना दम देऊन काहीच न झाल्याने सेनेचे खासदार मोदींकडे
मागील ५ वर्षात कित्येक शेतकऱ्यांचे मोर्चे कोसो दुरून पायी चालत आले आणि मंत्रालयावर तसेच मुंबईमध्ये धडकले. तेव्हा मुंबईत असून देखील उद्धव ठाकरे यांनी स्वतः सत्तेत असून देखील त्यांची प्रत्यक्ष भेट न घेता पक्षातील प्रतिनिधी धाडले होते. मात्र आदित्य संवाद सुरु झाल्यापासून आणि आदित्य ठाकरे यांच्या ‘जण आशीर्वाद’ यात्रेला जळगावातून सुरुवात होणार होती म्हणून केवळ वातावरण निर्मिती म्हणून पीकविमा कंपन्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरले होते.
6 वर्षांपूर्वी -
आरे कॉलनी: आता वृक्षरोपण करण्यापेक्षा, झाडांची बेसुमार कत्तल होताना कुठे होते? स्थानिकांचा सवाल
आदित्य ठाकरे यांच्याउपस्थितीत १,१०० एकाच वेळी अकराशे रोपे लावली. या वेळी बोलताना आदित्य म्हणाले, आज मी लावलेले हे विकासाचे झाड आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी आहे. सर्वच राजकीय पक्षांनी त्यासाठी एकत्र आले पाहिजे. तसेच आमचे खत सगळीकडे चांगले आहे. आधी पावसाचे इनकमिंग होऊ दे, असेही ठाकरे म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
शरद पवारांच्या टिकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
आगामी विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर असताना शिवसेना- भारतीय जनता पक्षामध्ये विरोधी पक्षातील नेत्यांचे पक्ष प्रवेश जोरदार सुरू आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली होती. यावर, आमचे खत चांगलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र हिरवागार आणि भगवा होणार, असा टोला आदित्य ठाकरे यांनी शरद पवारांना लगावला.
6 वर्षांपूर्वी -
भाजपच्या वरिष्ठांवर युती तोडण्यासाठी दबाव वाढला; स्वबळाची चाचपणी
लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असल्या तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाचे अंतर्गत मनसुबे भलतेच असू शकतात याची शिवसेनेला देखील पूर्व कल्पना असणार. त्यात लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेलं यश देखील मोदीमुळेच आहे असं भाजपचे अनेक नेते पडद्याआड बोलून दाखवत आहेत, तर शिवसेनेचे अनेक खासदार देखील ते पाठीमागे मान्य करतात.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनाप्रमुख जयंती ‘सरकारी’ होणार
४० पेक्षा अधिक वर्षे राजकीय कारकीर्द गाजवणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची स्मृती भावी पिढीसमोर चिरंतन रहावी, यासाठी शिवसेनाप्रमुखांची जयंती आणि पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी करावी, अशी मागणी शिवसेनेने मुंबई महानगरपालिका सभागृहात उचलून धरली होती. या मागणीला विरोधी पक्षातील सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिल्यानंतर या प्रस्तावाला अधिकृतपणे मंजुरी मिळाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
कोस्टल रोड: सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती कायम, सेनेच्या ड्रीम प्रोजेक्ट्ला धक्का
कोस्टल रोडप्रकरणी मुंबई महानगरपालिकेला सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने कोस्टल रोडवर असलेली स्थगिती कायम ठेवली आहे. मुंबई हायकोर्टाने कोस्टल रोड संबंधी दिलेला निर्णय रद्दबातल ठरवण्यास सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी नकार दिला. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २० ऑगस्ट रोजी पार पडेल असं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
पीक विमा कंपन्यांनी राज्यात २,२५५ कोटी नफा कमावला; ९८% शेतकरी मदतीविना: सीएसई रिपोर्ट
पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होऊन देखील, विमा कंपनीने फसवणूक केल्याची तक्रार घेऊन नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील चांदोरे येथील शेतकरी बाबूराव सुर्वे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दार ठोठावले. पंतप्रधान कार्यालयाने तत्काळ दखल घेऊन ही तक्रार केंद्रीय कृषी खात्याकडे ती वर्ग केली. केंद्रीय कृषी खात्यानेही ती कंपनीकडे पाठवण्याचे कागदी घोडे नाचवले. परंतु, या तक्रारीला ८ महिने उलटून गेल्यावरही विमा कंपनीने त्यावर काहीही कार्यवाही केलेली नाही. दरम्यान, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा कंपन्यांनी महाराष्ट्रातून सर्वाधिक प्रीमियम गोळा केल्याचे सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट या संस्थेने केलेल्या अभ्यासात पुढे आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
पवार साहेब माझ्या हृदयात, पण बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सेनेत: सचिन अहिर
एनसीपी मुंबई अध्यक्ष सचिन अहिर हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. स्वत: सचिन अहिर यांनी याबाबतची माहिती दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर सचिन अहिर शिवबंधन बांधणार आहेत. त्यासाठी सकाळी साडेदहाच्या सुमारास सचिन अहिर मातोश्रीकडे रवाना झाले होते.
6 वर्षांपूर्वी -
काहींना आमदार न झाल्यास राजकारणच करता येत नाही; त्यामुळे असे निर्णय घेतात: अजित पवार
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकावर एक राजकीय धक्के बसत आहेत. मागच्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या माजी आणि विद्यमान आमदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेशाचा सपाटा लावला होता, तर राष्ट्रवादीच्या आमदारांनी शिवसेनेत प्रवेशाचा सपाटा लावला आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना थेट मंत्रालयात प्रतिनिधी म्हणून धाडण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी दक्षिण मुंबईतील वरळी किंवा शिवडी या दोन विधानसभा मतदारसंघापैकी एकाची निवड करण्याची दाट शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
वरळी विधानसभा; मिशन आदित्य जोमात!; राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर शिवसेनेत प्रवेश करणार?
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकावर एक राजकीय धक्के बसत आहेत. मागच्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या माजी आणि विद्यमान आमदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेशाचा सपाटा लावला होता, तर राष्ट्रवादीच्या आमदारांनी शिवसेनेत प्रवेशाचा सपाटा लावला आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना थेट मंत्रालयात प्रतिनिधी म्हणून धाडण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी दक्षिण मुंबईतील वरळी किंवा शिवडी या दोन विधानसभा मतदारसंघापैकी एकाची निवड करण्याची दाट शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
युती पुन्हा नाजूक वळणावर; शिवसेनेकडून देखील स्वबळाची चाचपणी सुरू? सविस्तर
लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असल्या तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाचे अंतर्गत मनसुबे भलतेच असू शकतात याची शिवसेनेला देखील पूर्व कल्पना असणार. त्यात लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेलं यश देखील मोदीमुळेच आहे असं भाजपचे अनेक नेते पडद्याआड बोलून दाखवत आहेत, तर शिवसेनेचे अनेक खासदार देखील ते पाठीमागे मान्य करतात.
6 वर्षांपूर्वी -
माझ्या वाढदिवसाला पुष्पगुच्छ व होर्डिंग्ज नको, पैसे सामाजिक उपक्रमांसाठी वापरा : उद्धव ठाकरे
२७ ला जुलै शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त शिवसैनिक त्यांना प्रत्यक्ष भेटून तसेच रस्त्यावर होर्डिंग्ज लावून शुभेच्छा देतात. मात्र पक्ष प्रमुखांनी या उधळपट्टीला आळा घालून कार्यकर्त्यांनी तो पैसा सामाजिक उपक्रमांसाठी वापरावा असा संदेश दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
तो विद्यार्थी नाही तर शिवसैनिक; त्याला आदित्य यांच्यात छत्रपती शिवाजी महाराजांची झलक दिसली
सध्याच्या कॉर्पोरेट पद्धतीच्या राजकारणात पेड आणि मॅनेज प्रकार असणार हे साहजिकच आलं. नरेंद्र मोदींच्या बाबतीत देखील अनेक इव्हेंट’मधील घटनांना वास्तवात घडल्यासारखे दाखवून होकारात्मक हवा निर्मिती केल्याचे अनेक प्रकार पाहायला मिळाले. त्यात नरेंद्र मोदींच्या परदेशात संपन्न झालेल्या इव्हेंटमध्ये मोदींना प्रश्न विचारणारे अनेक लोक हे भाजपचे पदाधिकारी असल्याचं उघड झालं होतं.
6 वर्षांपूर्वी -
आंध्रप्रदेश: भूमिपुत्रांना खाजगी नोकरीत ७५% आरक्षण; महाराष्ट्रात ५ वर्ष केवळ निर्धाराच्या मुठी आवळल्या
देशात रोजगाराच्या बाबतीत प्रथमच ऐतिहासिक गोष्ट घडली आहे. कारण आंध्र प्रदेशच्या अधिनियमातील महत्वाची तरतूद अशी आहे की, सरकारने एखाद्या उद्योगाला आर्थिक किंवा जमीन वगैरे अन्य सहाय्य दिलं असो की नसो, त्यांना या स्थानिक भूमिपुत्रांसाठी ७५ टक्के आरक्षणाचं धोरण राबवावंच लागणार आहे आणि सर्वांना काटेकोरपणे अमलात आणावं लागणार आहे. आंध्र प्रदेश सरकारने तसा आदेशच प्रसिद्ध केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करुन देणारचं : आदित्य ठाकरे
शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या जन आशीर्वाद यात्रेनिमित्त महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. त्यांच्या पहिल्या टप्प्यातील दौऱ्यात ते नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात झालेल्या सभेत शेतकऱ्यांना आम्ही सरकट कर्जमाफी देणारच असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Tata Consumer Share Price | टाटा तिथे नो घाटा, 5219 टक्के परतावा देणारा शेअर मालामाल करणार - NSE: TATACONSUM