महत्वाच्या बातम्या
-
असलेलं नीट सांभाळता येत नाही आणि निघालेत स्मार्ट सिटी करायला - अजित पवार
सध्या मुसळधार पाऊसामुळे मुंबईची तुंबई झाल्याचे सर्वत्र पाहायला मिळत आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे मालाडमध्ये भिंत कोसळून दुर्घटना झाली आणि या दुर्घटनेवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेना – भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधत महापौरांना तुंबलेली मुंबई दिसत नाही तसेच हा सत्तेचा माज आणि सरकारचा बेजबाबदारपणा आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.
5 वर्षांपूर्वी -
अनधिकृत बांधकामामुळे अशा घटना घडतात पण त्याला पालिका जबाबदार नाही - संजय राऊत
मुंबई: मालाडमध्ये भिंत कोसळून झालेली दुर्घटना हि महापालिकेचं अपयश नाही तर तो एक अपघात आहे असं वक्तव्य सेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. मालाडमध्ये भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला असून 60 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. संजय राऊत यांच्यामते पावसाळा सुरु होण्या आगोदर उद्धव ठाकरेंनी स्वतः मुंबईभर फिरून नालेसफाईची पहाणी केली होती.
5 वर्षांपूर्वी -
अजब उत्तर! मुंबईत पाणी तुंबलं नाही तर साचलं: महापौर विश्वनाथ महाडेश्वर
पावसाळ्यापूर्वी १०० टक्के नालेसफाई झाली असल्याचं स्पष्ट करणाऱ्या शिवसेनाप्रणित मुंबई महागरपालिकेची पावसाळा सुरु होताच पोलखोल झाली आहे. मुंबईमध्ये पावसाला सुरुवात होऊन २-३ दिवस झाले नसताना देखील काल रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मूंबईतील अनेक भाग पूर्णपणे जलमय झाल्याचं वृत्त आहे आणि त्यासंबंधित व्हिडिओ देखील स्वतः सामान्य नागरिकच समाज माध्यमांवर शेअर करून संतप्त भावना व्यक्त करत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोकणात तेलशुद्धीकरण प्रकल्प नको म्हणणारी सेना पुन्हा पलटली? रायगड जिल्हा कोकणात नाही का?
लोकसभा निवडणुकीत नाणार’मधील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्प कोकणच्या निसर्गाला हानिकारक असून शिवसेनेचा अशा प्रकल्पना विरोध असून असे प्रकल्प येऊ देणार नाही असं म्हणणारी शिवसेना लोकसभा निवडणूक संपताच आणि रायगडमधून अनंत गीते पराभूत होताच, पडद्याआडून वेगळ्याच हालचाली सूर झाल्या आहेत. सदर प्रकल्प हा कित्त्येक लाख करोड रुपयांचा असल्याने शिवसेनेला शांत करण्याच्या हालचाली भाजपकडून सुरु झाल्याचे वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
त्या १०० टक्के नालेसफाईतील 'टक्केवारी' नक्की गेली कुठे? सविस्तर
मुंबई आणि शिवसेनेची सत्ता असलेल्या आजूबाजूच्या शहरांमध्ये पावसाळा सुरु होऊन १-२ दिवस उलटले नाहीत तरी जागोजागी पाण्याची गटारं तुंबल्याने लोकांच्या घरात पाणी शिरल्याचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तर पाणी तुंबल्याने प्रवास करणे कठीण झाले असून वाहन देखील अडकून पडली आहेत. विशेष म्हणजे पावसाळा सुरु होऊन १-२ दिवस झाले आहेत आणि म्हणावा तास पाऊस देखील पडलेला नाही, मात्र शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु पावसाळा सुरु होण्यापूर्वी सामना वृत्तपत्रात शिवसेनेकडून १००% नालेसफाईची कामं झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे पावसाच्या पहिल्याच झटक्यात मुंबईतील नालेसफाईच्या कामातील टक्केवारी नक्की गेली कुठे असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
5 वर्षांपूर्वी -
सामना'त खिल्ली उडवल्याने पुसदच्या न्यायालयाने कोणाविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते?
शिवसेनेचे मुखपत्र दैनिक ‘सामना’ मुखपत्रातून मराठा मोर्चाची खिल्ली उडवून त्यात मराठा समाजातील तरुण तरुणींना ‘मुका मोर्चा’ म्हणून हिणवलं होतं. दरम्यान मराठा समाजाचा अपमान केल्याप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संपादक संजय राऊत, व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाई आणि राजेंद्र भागवत या चौघांविरुद्ध पुसदच्या न्यायालयाने एप्रिल महिन्यात अटक वॉरंट जारी केला होते याची किती जणांना कल्पना होती. समन्स बजावून देखील सर्व आरोपी न्यायालयात हजर न राहिल्याने अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. सध्या मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या हक्कावर शिक्कामोर्तब केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याचा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न केल्याची जोरदार चर्चा समाज माध्यमांवर सध्या रंगली आहे आणि त्यावरून अनेक पुरावे मराठा समाजातील युवक व्हायरल करत आहेत. तसेच आता विनोद पाटलांवर देखील संधीसाधू अशी टीका होऊ लागली असून, त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तिकिटासाठीच हा खटाटोप केल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
5 वर्षांपूर्वी -
नितेश राणेंचा सेनेला दणका; विद्यार्थ्यांच्या आडून १५० रु'चा हॅण्डवॉश १३०० रु खरेदी प्रस्ताव स्थगित
सत्ताधारी शिवसेना पक्ष सध्या स्थायी समितीच्या माध्यमातून टेंडरमध्ये नवनवे विक्रम करताना दिसत आहेत. महापालिकेच्या तिजोरीतून पैसे कसे उकळावे याबाबतीत ठाण्यातील गोल्डन गँगचा हात कोणीच पकडू शकत नाहीत. दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने पक्षासाठी फंडींगच्या अनुषंगाने टेंडरचा वापर केला जातो आहे असा आरोप विरोधकांनी केला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेची सत्ता असलेल्या महानगरपालिकांमध्ये असे प्रकार नित्याचे झाले आहेत. तसेच काही महिन्यांपूर्वी ‘आपला दवाखाना’च्या अनुषंगाने आणि ठाण्यातील व्यवस्थेच्या नावाने देखील मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप याआधीच विरोधकांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात २ वर्षांत तब्बल ९७३ कारखाने बंद पडले: उद्योगमंत्री सुभाष देसाई
महाराष्ट्र राज्यात विविध कारणांमुळे २०१५-१६ या कालावधीत १५४ तर २०१७-१८ या कालावधीत तब्बल ८१९ कारखाने बंद पडल्याचा धक्कादायक खुलासा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केला. दरम्यान बंद पडलेले कारखाने पुनर्जीवित करण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करीत असून, वर्षभरापासून बेरोजगारीवर मात करण्यासाठी उद्योग विभागातर्फे मोठे प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती देसाई यांनी यावेळी सभागृहाला दिली.
5 वर्षांपूर्वी -
मराठी माणसाला मुंबईतून हुसकावून बदलापूरच्या हद्दीत शिवसेनेने ढकललं
राज्याची राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्यांची कित्येक वर्ष सत्ता आहे, त्यांनीच मराठी माणसाला मुंबईतून हुसकावून लावून बदलापूरच्या हद्दीत ढकललं आहे, अशी घणाघाती आणि बोचरी टीका आमदार कपील पाटील यांनी शिवसेनेवर केली आहे. शिवसेनेच्या हाती मुंबईची सत्ता आहे, मात्र मुंबई महापालिका स्वतः मराठीत बोलत नाही. मराठीत व्यवहार देखील करत नाही. मराठी भाषेचं आणि मराठी माणसाचं सर्वात जास्त नुकसान मराठी भाषेच्या नावाने सत्तेवर आलेल्यांनीच केल्याचे आरोप यावेळी कपिल पाटील विधान परिषदेत केला.
5 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणाच्या जल्लोषात 'मुका मोर्चा' म्हणून खिल्ली उडवणारे सामील का? : सचिन सावंत
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर मुंबई हायकोर्टाने काल निर्णय दिला आहे. कोर्टाच्या या निर्णयावर विधान भवनात भारतीय जनता पक्ष आणि सेनेच्याचं आमदारांनी नव्हे तर विरोधी पक्षांनी देखील जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शिवसेनेवर जुन्या आठवणींना उजाळा देत जोरदार निशाणा साधला. यात त्यांनी सामना दैनिकातून ‘मुका मोर्चा’ म्हणणारे देखील सामील का? असा प्रश्न सचिन सावंत यांनी केला.
5 वर्षांपूर्वी -
प्लॅस्टिक बंदीमध्ये फ्लेक्सचा समावेश करावा, नेटकऱ्यांची मागणी - सोशल व्हायरल
प्लॅस्टिकबंदीवर मात्र नेटकऱ्यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि महाराष्ट्र सरकारला ट्रोल केलं आहे. नेटकऱ्यांच्या मते प्लॅस्टिकबंदीमध्ये फ्लेक्स बॅनरचा देखील समावेश करावा. आज गल्लोगल्ली आणि रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला फ्लेक्सच – फ्लेक्स दिसतात. कुठे भाऊंचा वाढदिवस, कुठे राजकीय अभिनंदन तर कुठे राजकीय श्रेयाच्या नावाने लागलेले फ्लेक्स. इतकंच काय तर आजकाल लोकांनी लहानग्यांच्या वाढदिवसाचे फ्लेक्स देखील लावायला सुरुवात केली आहे. हे इतरत्र लावलेले फ्लेक्स शहरांच्या सौंदर्यात डाग होताना दिसत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मी विधानसभा निवडणूक लढणार, हाकाळपट्टीनंतरही आशा बुचकेंचा ठाम निर्धार
लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्यामुळे शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पुण्यातील शिरूर लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या आढळराव पाटलांचा पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे विजयी झाले. लोकसभा निवडणुकीत आशा बुचकेंनी पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळेच आढळराव पाटलांचा पराभव झाला असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
सामनात आणीबाणीवरून विरोधकांचा चिरकूट असा उल्लेख; पण उद्धव यांना बाळासाहेबांच्या भूमिकेचा विसर?
आजच्या सामना संपादकीय मध्ये आणीबाणीवरून मोदींची स्तुती करताना विरोधकांना शेळक्या भाषेत ‘चिरकूट’ असं संबोधण्यात आलं आहे. त्यात आणीबाणीच्या संदर्भात सविस्तर भाष्य करण्यात आलं असलं तत्कालीन परिस्थितीत बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना भेटून आणीबाणीच समर्थन केलं होतं आणि शिवसेनेच्या वाढीसाठी त्याला संधी समजून वेगळीच भूमिका घेतली होती, त्याचा उल्लेख मात्र सामनामध्ये वगळण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आशा बुचकेंची शिवसेनेतून हकालपट्टी, आमदार शरद सोनावणेंच्या विरोधात रणशिंग फुंकणार?
पुणे जिल्हा शिवसेनेतील आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झेडपी सदस्य आशा बुचके यांची शिवसेनेने पक्षातून अधिकृतपणे हकालपट्टी केली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात काम केल्याचा ठपका बुचके यांच्यावर ठेवण्यात आला आहे, शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख (शिरूर लोकसभा) राम गावडे यांनाही पदावरून दूर करण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला शेतकऱ्यांचा पुळका: राजू शेट्टी
मागील तब्बल ५ वर्षे राज्यातील शेतकरी दारिद्र्यातच खितपत पडले आहेत. बळीराजाचे अनेक प्रश्न गंभीर रूप धारण करत आहेत. त्यात भर म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही थांबलेल्या नाहीत, उलट त्यामध्ये प्रचंड वाढ होत गेली आहे. अशा अनेक शेतकरी प्रश्नावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कधीच कडक शब्दात बोललेले ऐकीवात नाही. मग शेतकऱ्यांचा आत्ताच कसा तुम्हाला पुळका आला? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेनेला केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आमचा कॅप्टन ठरलाय! मुख्यमंत्रीपदावरून सदाभाऊंकडून उद्धव ठाकरेंची खिल्ली
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता भाजपचे सहकारी पक्ष देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या दाव्यावरून लक्ष करू लागले आहेत. त्याचच भाग म्हणजे मुख्यमंत्रीपदावरून मंत्री सदाभाऊ खोत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला हाणला आहे. विधानसभेसाठी ‘आमचा कॅप्टन ठरलाय’ असं विधान करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री विचार सोडून द्यावा असंच अप्रत्यक्ष म्हटलं आहे. याआधी भाजपातील गिरीश महाजन आणि रावसाहेब दानवे यांनी देखील उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला होता. मात्र आता भाजपचे सहकारी पक्ष देखील उद्धव ठाकरेंना लक्ष करत असल्याचे दिसत आहे.
5 वर्षांपूर्वी -
सेनेचा मुख्यमंत्र्यांना शह? जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याची जलसंधारण मंत्र्यांची कबुली
सध्या राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरु असल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र आजच्या एका धक्कादायक कबुलीने शिवसेनेने अप्रत्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शह दिल्याचं म्हटलं जात आहे. कारण राज्यातील महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना ही मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असून देखील शिवसेनेने म्हणजे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी सभागृहाला दिलेल्या कबुलीने खळबळ माजली आहे.
5 वर्षांपूर्वी -
तर युतीमध्ये पुण्यात शिवसेनाला एकही जागा नाही, दानवेंच्या वक्तव्याने सेनेत संताप
लोकसभेत युती केल्यानंतर आगामी विधानसभेसाठी देखील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेकडून एकत्र लढण्याचे निश्चित झाले आहे, परंतु विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोणाचा होणार यावरून आत्ताच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री पदावरून सुरु असणाऱ्या वादामध्ये आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जागा वाटपा संदर्भात केलेल्या वक्तव्याने शिवसेना नेत्यांची चिंता वाढणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यता
मुंबईकरांसाठी एक क्लेशदायक बातमी येण्याची शक्यता आहे. कारण लवकरच सामान्य माणसाच्या दैनंदिन वापरातील रिक्षा आणि टॅक्सीच्या भांडयात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. विशेष म्हणजे बेस्टकडून भाडेकपातीचा निर्णय घेतला जात असतानाच रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ मात्र होण्याची शक्यता आहे. सदर विषयाला अनुसरून शुक्रवारी परिवहन विभाग, टॅक्सी संघटना आणि मुंबई ग्राहक पंचायतीची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यात टॅक्सी संघटनांनी पंचवीस रुपये भाडेवाढीची मागणी केली. येत्या मंगळवारी भाडेवाढीवर पुन्हा चर्चा होणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
फडणवीसांची रथयात्रा हे आंध्र प्रदेशातील 'वायएसआर' तंत्र महाराष्ट्रात? सेने विरुद्ध मोठं षडयंत्र?
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांत रथयात्रा काढणार आहेत. या रथयात्रेसाठी “फिर एक बार शिवशाही सरकार” आणि ”अब कि बार २२० पार” अशी घोषवाक्ये तयार करण्यात आली आहेत. ऑगस्ट महिन्यात ही रथयात्रा निघणार आहे. मात्र हेच तंत्र आंध्र प्रदेशात ऐतिहासिक विजय मिळवत सत्तेत आलेल्या वायएसआर काँग्रेसने तेथिल विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने २-३ महिन्यापूर्वी राबविले होते. यावेळी भाजपने शिवसेनेच्या मतदारसंघातून देखील ही रथयात्रा काढण्याची रणनीती आखली आहे असे वृत्त आहे. त्यामुळे शेवटच्या शनी स्वतःच्या बाजूने वातावरण निर्मिती करून शिवसेनेला शह दिला जाऊ शकतो असं राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS