महत्वाच्या बातम्या
-
नाहीतर आत्महत्याग्रस्त शेतकरी भावाच्या अस्थी ‘मातोश्री’वर पाठवणार: शेतकरी कुटुंबीय
भावाने आत्महत्या करुन ४ दिवस झाले. मात्र अजून देखील पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. पोलीस अधीक्षकांना देखील निवेदन देऊन आलो. परंतु, सगळ्यांना लोकसभा निवडणूक महत्वाची वाटते. जर सदर प्रकरणी पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासनाने योग्य कारवाई केली नाही, तर भावाच्या अस्थी थेट मातोश्रीवर आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार, असा गर्भित इशाराच उस्मानाबादमधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार
देशभरात आज आगामी लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात देशातील १३ राज्यांतील ९७ जांगावर १८ एप्रिलला मतदान होत आहे. महाराष्ट्रात बीड, सोलापूर, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, परभणी, अकोला अमरावती, बुलडाणा या मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
सेना-भाजपला इशारा! मी अस्मितेचा प्रश्न करणार नाही, माझे कार्यकर्ते करतील: हितेंद्र ठाकूर
पालघर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी दरम्यान जोरदार लढाई होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपने आयत्यावेळी निवडणूक चिन्हावरून केलेल्या राजकारणाला अनुसरून आमदार हितेंद्र ठाकूर यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून विरोधकांना इशाराच दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पालघर लोकसभा: बहुजन विकास आघाडीचा 'रिक्षा' चिन्हावर स्वार होत प्रचार?
बहुजन विकास आघाडीला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर धक्का बसला असला तरी त्याचा दुसराच अप्रत्यक्ष फायदा होण्याची शक्यता आहे, ज्याचा कोणी विचार सुद्धा केला नसावा. बहुजन विकास आघाडीचं ‘शिट्टी’ हे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने जरी गोठवलं असलं तरी, त्यांना देण्यात आलेलं ‘रिक्षा’ चिन्ह त्यांना अधिक फायदा देईल अशी शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
सेनेकडून मुंबईकरांना टोप्या; ५०० चौरस फुटांचा कर माफ केल्याची घोषणा फसवी
शहरात ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा शिवसेनेने केली. त्यानंतर युतीसाठी शिवसेना राजी व्हावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०० चौरस फुटांचा कर माफ केल्याचे जाहीर केले. त्यानंतर शिवसेनेने आम्ही दिलेले वचन पाळतो, असे सांगत हा मालमत्ता कर माफ झाल्याचे सांगितले. परंतु ती निवडणुकीसाठीची फसवी घोषणा असल्याचे समोर आलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती
VIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती
6 वर्षांपूर्वी -
अमळनेर येथे भाजप-शिवसेना युतीच्या मेळाव्यात झालेल्या राड्याची सुरुवात
अमळनेर येथे भाजप-शिवसेना युतीच्या मेळाव्यात झालेल्या राड्याची सुरुवात
6 वर्षांपूर्वी -
सत्ताकाळात शिवसेना-भाजप खासदारांची संपत्ती ६० टक्क्यांनी वाढली
भारतीय जनता पक्षाच्या खासदार पूनम महाजन यांच्या संपत्तीमध्ये तब्बल १०६ टक्क्यांची घट झाल्याची आकडेवारी समोर आली होती. पण, आता शिवसेना-भाजप खासदारांच्या संपत्तीमध्ये तब्बल ६० टक्क्यांची वाढ झाल्याचे समजते. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात निवडणूक लढवीत असलेल्या शिवसेना-भाजप खासदारांच्या संपत्तीमध्ये सरासरी ३.२० कोटींची वाढ झाली आहे. ADRच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. २०१४ आणि २०१९ मधील आकड्यांची तुलना केल्यानंतर ही आकडेवारी देण्यात आली.
6 वर्षांपूर्वी -
बीडमध्ये राष्ट्रवादीला धक्का जयदत्त क्षीरसागर मातोश्रीवर
बीडमधील एनसीपीचे नाराज नेते जयदत्त क्षीरसागर यांनी शनिवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत त्यांचे बंधु भारतभूषण क्षीरसागर देखील स्वतः उपस्थित होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीदरम्यान एनसीपीला मोठा राजकीय धक्का बसल्याच म्हटलं जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
विनायक राऊतांची वैभववाडीतील ही विराट प्रचार सभा त्यांचा निकाल सांगत आहे?
मागील ५ वर्षे मुंबईत राहून सिंधुदुर्ग-रत्नागिरीच राजकारण पाहणारे खासदार विनायक राऊत लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोकणात दिसू लागल्याने आधीच त्यांचा मार्ग कठीण असल्याचं प्राथमिक निष्कर्षात समोर आलं होतं. विकासाचा मुद्दा घेऊन निवडून आले आणि ५ वर्ष दिसेनासे झालेले विनायक राऊत शेवटच्या क्षणी नारळ फोडण्याची स्टंटबाजी करताना कोकणवासीयांना दिसले. मात्र त्याच कोकणवासीयांना आणि स्थानिक शिवसैनिकांनी देखील चांगलाच हिसका दाखवला आहे.
6 वर्षांपूर्वी -
षंढ असण्यापेक्षा गुंड बरे! हितेंद्र ठाकूर यांचा बाळासाहेबांच्या शब्दात उद्धव ठाकरेंना टोला
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दौऱ्यावर आलेले उद्धव ठाकरे यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांना लक्ष केलं आहे. वसईतील गुंडगिरी मोडून काढू, असे सांगत हितेंद्र ठाकूर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हितेंद्र ठाकूर यांनी खासकरून स्वर्गीय. बाळासाहेबांच्या शैलीतच खरपूस समाचार घेतला आहे.
6 वर्षांपूर्वी -
‘युवांचा आदित्य’मध्ये आदित्य ठाकरेंवर प्रश्नांचा भडीमार, पण टोलवायचं कसं ते मात्र शिकले?
जास्तीत जास्त तरुणांशी स्वतःला आणि पक्षाला जोडण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी ‘युवांचा आदित्य’ या कार्यक्रमाच्या माध्यमांतून एक प्रयत्न केला. मात्र यावेळी अनेकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला आणि भारताच्या राजकारणात वेळ मारून घेण्याची किंवा विषय टोलवण्याची कला अवगत असणारेच अधिक टिकतात हे सर्वश्रुत असल्याने आदित्य ठाकरेंची ती पोलिटिकल सायन्सची कला यावेळी पाहायला मिळाली. त्यामुळे खोलवर मूळ पोहोचलेला पक्ष आता तंत्रज्ञानाच्या मदतीने आदित्य ठाकरे अधिक भक्कम करू पाहत आहेत असंच म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना उमेदवारी, सोमय्यांचा पत्ता कट की दुसरी सेटलमेंट?
शिवसेना-भारतीय जनता पक्षाचं जागावाटप निश्चित झालं असतानाही ईशान्य मुंबईतून भाजपकडून नक्की कोणाला उमेदवारी द्यायची यावर अजूनही निर्णय झाला नव्हता. त्यात किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला होता, त्यानंतर आता भाजपाकडून ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेना पक्ष अल्पसंख्याकांविरोधात आहे: मिलिंद देवरा
लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला असताना मुंबई काँग्रेसने देखील सत्ताधाऱ्यांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शिवसेना अल्पसंख्याकांविरोधात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. काही वर्षांपूर्वीच शिवसेनेने जैन मंदिराबाहेर मांस शिजवून जैन समाजाचा अपमान केला होता याची आठवण देखील त्यांनी यावेळी करून दिली. आता मतदानातून त्यांना चांगलाच धडा शिकवा, असे जाहीर आवाहन देवरा यांनी जैन समाजाला केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
राऊतांची शिष्टाई कामी नाही आली, जगताप - बारणेंतील वाद मिटेना, पार्थ पवारांना फायदा
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन भारतीय जनता पक्षाचे स्थानिक आमदार लक्ष्मण जगताप आणि श्रीरंग बारणे यांच्यादरम्यान समझोता करण्याचा प्रयत्न केला, मात्र ही शिष्टाई कामी आली नसल्याचे वृत्त आहे. लक्ष्मण जगताप यांनी खासदार बारणेंचे काम करण्यास स्पष्ट नकार दिल्याचे कळते. त्यामुळे मावळातील शिवसेनेचा उमेदवार धोक्यात तर एनसीपीचे उमेदवार पार्थ पवार यांचा मात्र फायदा होणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे भाजपला इतके का घाबरू लागलेत, जयंत पाटलांचा सवाल
उद्धव ठाकरे भाजपला इतके का घाबरू लागलेत, जयंत पाटलांचा सवाल
6 वर्षांपूर्वी -
अजब! मुंबईच्या सत्तेत असून बाधितांना भेटले नाही, पण सत्तेत टिकण्यासाठी थेट गुजरातला?
मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या पादचारी पूल दुर्घटनेत अनेकांचा नाहक जीव गेला आणि त्यात अनेक मुंबईकर गंभीर जखमी देखील झाले. मात्र काही मिनिटाच्या अंतरावर असून आणि मुख्य म्हणजे मुंबई महानगर पालिकेच्या सत्तेत असून देखील उद्धव ठाकरे यांनी दुर्घटनेतील ना जखमींची भेट घेतली ना मृतांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. मुंबई महानगर पालिकेत सत्तेत असून देखील उद्धव ठाकरे यांनी कोणतीही जवाबदारी किंवा संवेदनशीलपणा मुंबईकरांप्रती व्यक्त केला नाही.
6 वर्षांपूर्वी -
PNB बँकेने कर्जबुडव्या म्हणून घोषित केलेल्या धैर्यशील माने यांना सेनेकडून उमेदवारी
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पीएनबी घोटाळा आणि देशातून पळ काढणारा निरव मोदी आधीच भाजपची डोकेदुखी ठरलेला असताना, आता शिवसेनेत देखील एक प्रति निरव मोदी असल्याचं उघड झालं आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीला देखील PNB म्हणजे पंजाब नॅशनल बँकेनेच कर्जबुडव्या म्हणून अधिकृतपणे घोषित केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
किरीट सोमय्यांविरोधात शिवसेना आमदार निवडणूक रिंगणात उतरणार
लोकसभा निवडणुकीच्या तिकीटासाठी किरीट सोमय्यांकडून मातोश्रीच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसैनिकांचा रोष असलेले ईशान्य मुंबईचे विद्यमान खासदार सोमय्यांकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, अद्याप मातोश्रीवरुन त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेली नाही. निवडणूक जवळ येत असताना, प्रचाराचे दिवस कमी होत असताना ईशान्य मुंबईचे खासदार असलेल्या किरीट सोमय्या यांना धक्का बसला आहे.
6 वर्षांपूर्वी -
कोणते दिवे लावले म्हणून युतीच्या अधिक जागा ते सर्व्हेत का येत नाही? नेटिझन्स
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून अनेक ओपिनियन पोल अर्थात सर्व्हे येण्यास सुरुवात झाली असून त्यात महाराष्ट्रात भाजप आणि सेनेला घवघवीत यश मिळणार असं दाखविण्यात आलं आहे. वास्तविक शिवसेनेबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या राज्यातील आणि केंद्रातील डझनभर मंत्र्यांनी, ६३ आमदार आणि १८ खासदारांनी नक्की विकास कामांचे कोणते दिवे लावले आहेत, म्हणून लोकं त्यांना भरघोस मतदान करणार आहेत? अशी चर्चा आता समाज माध्यमांवर रंगू लागली आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: TATAMOTORS
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- House Rent | पगारदारांनो, कमी पगार आणि त्यामुळे बचती कमी होतेय, मग या टिप्स फॉलो करा, होईल मोठी बचत - Marathi News
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- NHPC Share Price | पीएसयू NHPC शेअरबाबत CLSA ब्रोकरेज फर्मचा फायद्याचा रिपोर्ट, शेअर रॉकेट होणार - NSE: NHPC
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News