महत्वाच्या बातम्या
-
विधानपरिषद निकाल: भाजप २, शिवसेना २, एनसीपी १
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या ६ पैकी ५ जागांचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात भाजप २, शिवसेना २, एनसीपी १ असा निकाल लागला असून अमरावतीत काँग्रेसला जबर धक्का मिळाला आहे.
7 वर्षांपूर्वी -
बाळासाहेबांनी समोरुन लढा दिला, पण शिवसेनेत आज ती स्थिती नाही
बाळासाहेब ठाकरेंनी कधीच कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही आणि नेहमी समोरुन लढा दिला. परंतु आज शिवसेनेची आजची स्थिती पहिल्यासारखी राहिलेली नाही जशी बाळासाहेबांच्या वेळी होती. आजची त्यांची स्थिती पाहून जर सगळ्यात जास्त दुःख कोणाला होत असेल तर ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना असं म्हणत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी थेट शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष पणे विरार येथील भाजपच्या सभेत लक्ष केलं.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचं हिंदुत्व केवळ मतांसाठी, नेते चर्चच्या भेटीला
सध्या पालघरमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाषांत एक मुद्दा आणि मतांसाठी पडद्याआड वेगळंच राजकारण शिजताना पहावयास मिळत आहे. त्याचाच प्रत्यय पालघर निवडणुकीत आला आहे. ज्या चिंतामण वनगांनी पालघरमधल्या पाड्या-पाड्यांवर, वस्त्या-वस्त्यांवर भाजप, रा. स्व. संघ आणि हिंदू सेवा संघाच्या माध्यमातून हिंदुत्वाचा जागर करण्याचा वसा घेतला, त्यांच्याच मुलाला सेनेने स्वतःच्या मतलबासाठी चर्चमध्ये नेले आणि शिवसेनेचा हिंदुत्वाचा बुरखा फाटला आहे.
7 वर्षांपूर्वी -
उत्तर भारतीय मतांसाठी योगी आदित्यनाथ नालासोपाऱ्यात: पालघर
येत्या २३ तारखेला म्हणजे बुधवारी वसई, विरार आणि नालासोपारा भागातील उत्तर भारतीय मतदारांची लोकसंख्या लक्ष्यात घेता भाजपने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने नालासोपारा येथे जाहीर सभेचे आयोजन केलं आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सुद्धा पालघर मध्ये त्याच दिवशी जाहीर सभा होत आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजप-सेनेच्या सरकारमुळे गिरगांवकर रस्त्यावर: मेट्रो-रेल्वे प्रकल्प
मुंबईतील मेट्रो रेल्वेचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरु असून त्याला सुरवातीला गिरगावकरांचे सहकार्य लाभले होते. कारण या मार्गातील केवळ २ इमारती पाडाव्या लागतील असं आधी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून सांगण्यात आलं होत. परंतु भाजप-सेनेच्या सरकारने अक्षरशः त्या विषयावर यू-टर्न घेतल्याचे चित्र समोर आले आहे.
7 वर्षांपूर्वी -
पालघर, भाजपच्या प्रचार साहित्यांवर चिंतामण वनगांचे फोटो
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या निवडणूक प्रचार साहित्यावर सर्व ठिकाणी दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या फोटोचा तसेच नावाचा भाजपच्या उमेद्वाराकडून गैरवापर केला जात असल्याचा आरोप करत जयश्री वनगा यांनी भाजप विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली असल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
तर शिवसेनेच्या भविष्यात अडचणी वाढतील
२०१९ मधील निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना डॉ. मनमोहन सिंग हेच टक्कर देऊ शकतात. कारण राहुल गांधी यांना अजून बरंच राजकीय शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे राहुल गांधी गांधी हे मोदींना टक्कर देऊ शकणार नाहीत असं परखड मत व्यक्त केलं आहे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी. तर दुसरीकडे शिवसेनेने जर निर्णय वेळीच घेतला नाही तर त्यांच्यासमोर भविष्यात अडचणी वाढण्याची शक्यता आहेत असं प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं.
7 वर्षांपूर्वी -
नाहीतर सेनेचे आमदार-खासदार फुटण्याची शक्यता
शिवसेनेने २०१९ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जर भाजपसोबत युती केली नाही तर शिवसेना पक्षात उभी फूट पडून शिवसेनेचे अनेक आमदार आणि खासदार बाहेर पडतील असं मत आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. या विधानाने शिवसेना आणि रामदास आठवले यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
नारायण राणे पालघरमध्ये शिवसेना विरुद्ध प्रचारात
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार नारायण राणे हे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपसाठी प्रचारात उतणार असल्याचे वृत्त आहे. पालघर मध्ये मोठया प्रमाणावर कोकणी मतदार तसेच भंडारी समाजाचे लोक आहेत. त्याचाच फायदा भाजपच्या उमेदवाराला व्हावा या उद्देशानेच खुद्द मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेंना प्रचारासाठी विनंती केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचे भंडाऱ्याचे नाराज जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले भाजपात
लोकसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे भंडाऱ्याचे नाराज जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले यांनी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. त्याआधी त्यांनी शिवसेना भंडारा जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला.
7 वर्षांपूर्वी -
भाजपने बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन शंका दूर करावी : उद्धव ठाकरे
सध्या देशभरात भाजपची सर्वच निवडणुकांमध्ये विजयी घोडदौड पाहून सर्वच पक्षांकडून ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली जात आहे. त्यालाच अनुसरून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपने बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन लोकांच्या मनातील शंका दूर करावी अशी टिपणी केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
तुम्ही पालघरमध्ये माघार घ्या, आम्ही भंडारा-गोंदियात समर्थन देतो: उद्धव ठाकरे
भाजपने पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी मागे घेतल्यास शिवसेना भाजपला भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिडणुकीत समर्थन देईल असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर दौऱ्यावर आले असता प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर राम कदमांची सडकून टीका
शिवसेना साधी नखं कापली तरी स्वतःला शहीद म्हणवून घेत फिरते अशी शिवसेनेची सध्याची परिस्थिती आहे अशी खरमरीत टीका भाजपचे आमदार राम कदम यांनी केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
पालघर टायमिंग, मनसेतून गेलेले ते ६ नगरसेवक 'डेंजर-झोन' मध्ये ?
कोकण आयुक्तांनी ७ मे रोजी मनसेतून फुटून शिवसेनेत प्रवेश केलेल्या मुंबईतील त्या ६ नगरसेवकांना नोटीस पाठवली असून १४ मे रोजी सुनावणी असल्याचे समजते.
7 वर्षांपूर्वी -
'सामना'मधून भुजबळांचे कौतुक, ओबीसी लीडर सेनेला पक्षात हवेत का ?
आजच्या सामना अग्रलेखातून छगन भुजबळ यांच कौतुक करण्यात आलं असून त्यामागे ओबीसी लीडर चेहरा हे मुख्य कारण असल्याचं राजकीय विश्लेषक बोलत आहेत. त्याबरोबरच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे सुद्धा यामागे कारण असल्याची राजकीय कुजबुज सुरु आहे.
7 वर्षांपूर्वी -
कर्नाटक विधानसभेत काँग्रेसच मोठा पक्ष बनेल - संजय राऊत
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना निवडणुकीनंतर कर्नाटकमध्ये काँग्रेस नंबर एकचा पक्ष बनेल असं ठाम विश्वास व्यक्तं केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
आम्ही स्वबळावरच आणि निर्णयावर ठाम: उद्धव ठाकरें
पुढील सर्व निवडणूक शिवसेना स्वबळावरच लढणार असून आम्ही निर्णयापासून माघार घेणार नाही असं पुन्हां एकदा शिवसेना पक्ष प्रमुखांनी प्रसारमाध्यमांकडे स्पष्ट केलं.
7 वर्षांपूर्वी -
भाजपवर आरोप करत वणगा कुटुंबिय रातोरात शिवसेनेत
भाजपचे पालघरचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या कुटुंबीयांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला.
7 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे म्हणतात, सध्याच्या सरकारात मंत्री, खासदार आणि जनतेचेही कास्टिंग काऊच
सामना संपादकीयमधून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर अप्रत्यक्ष बोचरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, सध्याच्या सरकारात मंत्री, खासदार आणि जनतेचेही कास्टिंग काऊच सुरु आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज्याची कायदा व सुव्यवस्था बिहारपेक्षा वाईट: उद्धव ठाकरे
अहमदनगरमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण नगर जिल्ह्यात आणि राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिहारपेक्षा वाईट असल्याचा आरोप करत महाराष्ट्राला स्वतंत्र आणि पूर्णवेळ गृहमंत्री हवा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलीय.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News