महत्वाच्या बातम्या
-
राफेल डील मधील ते दलाल कोण? | आम्हाला सत्य समजू शकेल का? - प्रियांका चतुर्वेदी
राफेल लढाऊ विमान घोटाळा फ्रेंच मीडियामुळे पुन्हा जगभरात चर्चेत आले आहे. फ्रान्सच्या एका वेबसाइटने देसॉ एव्हिएशनकडून बोगस व्यवहार झाल्याचे म्हटले आहे. या मीडियाने फ्रान्सची भ्रष्टाचारविरोधी संस्था AFA दाखला देऊन रिपोर्ट जारी केला. कंपनीच्या 2017 च्या खात्यांचे ऑडिट करण्यात आले. त्यानुसार, 5 लाख 8 हजार 925 यूरो अर्थात जवळपास 4.39 कोटी रुपये क्लाइंट गिफ्टच्या नावे खर्च करण्यात आले आहेत. इतकी मोठी रक्कम गिफ्ट कशी असू शकते याचे अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. विमानाचे मॉडेल बनवणाऱ्या कंपनीचे केवळ मार्च 2017 चे एक बिल उपलब्ध करून देण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेची बाजी
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांनी अर्ज दाखल करून सर्वांना धक्का दिला होता. पण ऐनवेळी त्यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे पाटील यांचा मार्ग मोकळा झाला. उपाध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली होती. मतदान घ्यावे लागले. यात अर्जून गाडे यांचा ६ मतांनी दणदणीत विजय झाला.
4 वर्षांपूर्वी -
कोल्हापूर | विद्यमान नगरसेवक आणि माजी नगरसेवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून इतर सर्वच पक्षातील नेतेमंडळी राष्ट्रवादी, शिवसेना किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. मागील काही दिवसांपासून माजी खासदार, आमदार आणि नगरसेवक राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
आज बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन | विरोधकांना निमंत्रण नाही
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन सोहळा आज (31 मार्च) पार पडणार आहे. आज संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शिवाजी पार्क येथील महापौरांचे जुने निवासस्थान या स्मारकाची नियोजित जागा आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबतची माहिती दिली आहे
4 वर्षांपूर्वी -
गुप्त बैठकीच्या अफवा | भाजपनेही गुप्त आजारातून लवकरात लवकर बरे व्हावे - शिवसेना
देवेंद्र फडणवीसांचे राज्य महाराष्ट्रात असताना साम-दाम-दंड-भेद वापरुन सत्ता टिकवण्याची भाषा केली जात होती. हा साम-दाम-दंड-भेद इतरांच्या हातीही असू शकतो. तेव्हा अहमदाबादच्या गुप्त बैठकीची अफवा पसरवून गोंधळ घालणे हा त्याच भेद-नीतीचा प्रयोग आहे. अर्थात, त्यातून काय साध्य होणार? सध्या पवार थोडे आजारी आहेत. पवार लवकरच बरे होऊन कामास लागतील. भारतीय जनता पक्षानेही गुप्त आजारातून लवकरात लवकर बरे व्हावे! असा खोचक सल्ला शिवसेनेनं दिला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून अमित शाह आणि शरद पवारांच्या गुप्त बैठकीवर भाष्य करण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यातील सुविधा मोदींसारख्या सैनिकांनाही मिळाव्यात - शिवसेना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच केलेला बांगलादेश दौरा चांगलाच चर्चिला गेला. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी आपण बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतल्याचा दावा केला आणि देशभरातून याबाबत उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या. मोदींचा हा दावा अवास्तव असल्याची टीका करत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. त्यानंतर आता शिवसेनेनंही उपरोधिक शब्दांत पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंढरपूर पोटनिवडणूक | महाविकास आघाडीची दोस्तीत कुस्ती | शिवसेना जिल्हा प्रमुखाची बंडखोरी
राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. मात्र पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी येथे बंडाचे निशाण फडकावले असून आज बैलगाडीतून वाजत गाजत येत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
4 वर्षांपूर्वी -
राज्यपालांमार्फत भाजप सत्ता गाजवू इच्छिते | मग लोकशाहीचा मुडदा पडला तरी चालेल - शिवसेना
राज्यपाल हेच सरकार चालवतील असं नवं राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सुधारणा विधेयक म्हणत असेल तर मग दिल्लीची विधानसभा आणि मुख्यमंत्री हवेतच कशाला ? अशी विचारणा शिवसेनेने केली आहे. महाराष्ट्र असो वा दिल्ली, राज्यपालांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष सत्ता गाजवू इच्छिते. त्यासाठी लोकशाहीचा मुडदा पडला तरी चालेल हेच त्यांचे धोरण आहे. दिल्ली विधानसभा आणि मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांचा कचरा करून केंद्र सरकार एकाधिकारशाहीच्या युगाची तुतारी फुंकत आहे. देशासाठी हे घातक आहे, असं म्हणत आजच्या (२५ मार्च) सामना अग्रलेखातून भारतीय जनता पक्षावर टीका करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ज्या राज्याचे मीठ खातात त्याच राज्याची बदनामी | राजकीय वृत्तीच्या अधिकाऱ्यांवर सेनेचं टोकास्र
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर फडणवीस यांनी पोलिस बदल्यांसाठी झालेल्या फोन टॅपिंगचा डेटा दिल्याने या डेटा बॉम्बचे हादरे महाविकास आघाडी सरकारला बसले आहेत. मंगळवारी सकाळी भाजप कार्यालयातील पत्रकार परिषद आटोपताच फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले होते. काल त्यांनी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांची भेट घेऊन अधिकाऱ्यांमधील पत्रव्यवहार असलेला एक बंद लखोटा आणि ६.३ जीबीचा पेनड्राइव्ह त्यांना सूपर्द केला.
4 वर्षांपूर्वी -
सांगली-जळगावातील कार्यक्रम ही तर नांदी | यापुढे असे अनेक कार्यक्रम होतील - शिवसेना
सांगलीत, जळगावात सत्ताबदल झाला. त्याला फार मोठे नैतिक अधिष्ठान नसले तरी नैतिक किंवा अनैतिक यावर बोलण्याचा अधिकार भाजपने गमावला आहे. सत्तापालट कारणी लागो. तरच करेक्ट कार्यक्रम सत्कारणी लागला असे म्हणता येईल. सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी आहे. यापुढे असे अनेक कार्यक्रम होतील! असा सूचक इशारा शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाला दिला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात याबाबतचे वक्तव्य करण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
पक्षहित सोडून फडणवीस दिल्लीत वाझे-वाझे करत बसले | इकडे सेनेने जळगावची सत्ता खेचली
जळगाव महापालिकेमध्ये सांगली पॅटर्न राबवत अखेर शिवसेनेनं भाजपला सत्तेवरून खाली खेचत भगवा फडकावला आहे. शिवसेनेच्या महापौरपदाच्या आणि उपमहापौरपदाच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. सेनेनं तब्बल 45 मतं मिळवली आहे. त्यामुळे महापालिकेवर भगवा फडकला आहे. थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
'मी पुन्हा येऊ शकतो' या स्वप्नात शहांकडे सेनेच्या 2 नेत्यांची नावं दिल्याची शक्यता?
NIA बुधवारी रात्री निलंबित केलेले पोलिस अधिकारी (API) सचिन वाझेंना ठाण्यात घेऊन गेले. तिथे अनेक ठिकाणी सीन रिक्रिएशन करण्यात आले. रात्री उशीरा NIA च्या दोन टीमने वझेंच्या घराची झाडाझडती घेतली. यामध्ये अनेक कागदपत्रे ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांच्या सोसायटीच्या लोकांचीही चौकशी करण्यात आली.
4 वर्षांपूर्वी -
सचिन वाझे प्रकरणावरून विरोधकांची मातोश्रीविरोधात राजकीय चिखलफेक
सचिन वाझे यांच्यामुळे ‘मातोश्री’ अडचणीत आली आहे. त्यामुळे सचिन वाझे यांचीही हिरेन मनसुखप्रमाणे हत्या होऊ शकते. सचिन वाझे मुंबई पोलिसांच्या ताब्यात सुरक्षित नाही, असा आरोप भाजपचे आमदार रवी राणा यांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
गिरीश महाजन पोकळ ठरले | जळगाव भाजपचे ३० नगरसेवक ठाण्यात | शिवसेनेच्या गळाला
शिवसेनेने जळगावमध्ये भारतीय जनता पक्षाच्या गडाला खिंडार पडली आहे. भारतीय जनता पक्षाचे ३० नगरसेवक ठाण्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या ५७ नगरसेवकांपैकी ३० नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मी सुसंस्कृत कुटुंबातील आहे | राणे कुटुंबाची पार्श्वभूमी गँगपासून खून, अपहरण, खंडणी पर्यंत
आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी IPL सट्टेबाजांकडून सचिन वाझे यांनी १५० कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप करताना त्यात युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई देखील वाटेकरी असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी वरुण सरदेसाई यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन चोख प्रतिउत्तर दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
जळगाव महापालिका | शिवसेनेकडून लोटसचं ऑपरेशन होण्याची शक्यता
शनिवारी (६ मार्च) शहरातील पद्मालय या शासकीय विश्रामगृहात भारतीय जनता पक्षाच्या काही नगरसेवकांची राष्ट्रवादीच्या अशोक लाडवंजारी यांच्याशी ‘योगायोगा’ने झालेली भेट आणि चर्चा यांनी महापालिकेच्या राजकारणात वेगळाच योग घडवून आणला असून भारतीय जनता पक्षाचे २४ नगरसेवक १४ मार्चच्या दुपारपासून ‘नाॅट रिचेबल’ झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई विद्यापीठ मनविसेचे अध्यक्ष आणि मनविसेचे उपाध्यक्ष अॅड. संतोष धोत्रेंचा शिवसेनेत प्रवेश
शिवसेनेकडून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेला जोरदार धक्का देण्यात आला आहे. मनविसेचे मुंबई विद्यापीठ अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य मनविसेचे उपाध्यक्ष अॅड. संतोष धोत्रे यांनी मनसेला रामराम ठोकत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेनेमुळे तिकीट कापलं गेल्याने किरीट सोमैयांचा जीव अजून वर-खाली होतोय? - सविस्तर वृत्त
एकाबाजूला किरीट सोमैया ऑनलाईन सहज उपलब्ध होणारे सातबारा उतारे डाउनलोड करून काहीतरी मोठं सिक्रेट शोधून काढल्याचा ट्विटर आणि पत्रकार परिषदेत कांगावा करत आहेत. त्यात राज्य सरकार आणि स्वतः विरोधी पक्ष त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्या आरोपांची हवाच निघून जातेय. त्यात आरोप करण्याचा त्यांचा मोठा इतिहास असल्याने माध्यमं देखील त्यांना सिरीयस घेताना दिसत नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
TRP घोटाळा आणि अन्वय नाईक आत्महत्या | सचिन वाझे त्याची गर्दन पकडतील म्हणून आदळआपट?
लोकांच्या जगण्या मरण्याचे अनेक प्रश्न सतावत आहेत. त्यावर विधिमंडळात चर्चा घडवून विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला धारेवर धरले असते तर उत्तमच झाले असते, पण एका संशयास्पद मृत्यूचा धड तपास होऊ न देता आदळआपट करणे हे लोकशाहीचे विकृत रूप आहे.’ असे म्हणत शिवसेनेने अर्थसंकल्पीय अधिवेशनात झालेल्या गदारोळावरुन सामना अग्रलेखातून माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आणि निवडणुका | दिल्लीश्वरांना दैवी शक्ती प्राप्त झाल्याने कोरोना त्यांना स्पर्श करीत नसेल
महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आजच्या सामना अग्रलेखातून पुन्हा एकदा लॉकडाऊनचा इशारा देण्यात आला आहे. लोकांनी स्वयंशिस्त पाळायलाच हवी असं सांगत ‘सद्यपरिस्थितीत पुन्हा लॉकडाऊन? टाळता आला तर बघा’, असा अग्रलेखात म्हटलंय.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL