Sintex Plastics Share Price | 2 रुपयांच्या शेअरवर दररोज अप्पर सर्किट, 5 दिवसात 23% परतावा, खरेदी करणार का?
Sintex Plastics Share Price | ‘सिंटेक्स ब्रँड’ चे उत्पादन बनवणाऱ्या प्रसिद्ध ‘सिंटेक्स प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या शेअर मध्ये घसघशीत वाढ होत आहे. स्टोरेज टँक, इंटिरियर, इलेक्ट्रिकल आणि एसएमसी उत्पादने बनवणाऱ्या ‘सिंटेक्स प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढ पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटवर 2.39 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘सिंटेक्स प्लॅस्टिक’ कंपनीचे शेअर्स मागील काही महिन्यांपासून सातत्याने घसरत होते. आता अचानक या कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी वाढ पाहायला मिळत आहे. मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.35 टक्के वाढीसह 2.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. सिंटेक्स प्लॅस्टिक कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1.79 रुपये होती. (Sintex Plastics Limited)
2 वर्षांपूर्वी