महत्वाच्या बातम्या
-
दिल्लीतील हिंसाचाराला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार: सोनिया गांधी
दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत. त्यांनी जबाबदारी स्वीकारुन तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. दिल्लीत झालेला हिंसाचार चिंतेचा विषय असून, केंद्राने जाणीवपूर्वक ७२ तासात कारवाई केली नाही असा आरोप काँग्रेसने केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपसोबत पक्ष संपवण्यापेक्षा युपीए'सोबत पक्ष वाढविण्यासाठी सोनिया-उद्धव यांची भेट? - सविस्तर वृत्त
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ या निवासस्थानी उद्धव ठाकरे त्यांची भेट घेतील.आज दुपारी दीड ते दोनच्या सुमारास ही भेट होण्याची शक्यता आहे. भाजपशी फारकत घेऊन राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. याबाबत स्वतः शिवसेनेचे संसदीय नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. तसेच ही सदिच्छा भेट असल्याचं म्हणत या भेटीच्या तपशिलात खोल शिरण्याची गरज नसल्याचंही राऊत म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
विधानसभा प्रचाराला न फिरकलेलं गांधी कुटूंब आज राज्यात पवारांमुळे अस्तित्व टिकवून? - सविस्तर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडून निकाल देखील जाहीर झाले असले तरी सत्ता स्थापनेचा घोळ अजून कायम असल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांचे नेते स्वपक्षाच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते, तेव्हा देशातील सर्वात मोठं गांधी कुटूंब मात्र राज्यातील नेत्यांना एकाकी सोडून दिल्लीत रममाण होते. किंबहुना आपला सुपडा साफ होणार याची त्यांना खात्री असावी म्हणून त्यांनी मेहनत न घेण्याचा निर्णय घेतला असावा.
5 वर्षांपूर्वी -
देश आर्थिक संकटात, पण पंतप्रधान हेडलाईन बनवण्यात व्यस्त: सोनिया गांधी
देश दिवसागणिक आर्थिक संकटाच्या खाईत जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र, सभा-समारंभ आणि प्रसिद्धीच्या मोहात पडलेले आहेत. आर्थिक विकासाच्या झालेल्या घसरणीची कबुली देऊन त्यावर उपाययोजना करण्याऐवजी केंद्र सरकारला ती मान्यही नाही ही बाब चिंताजनक आहे, अशी टीका काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली. सरकारच्या आर्थिक धोरणाविरोधात काँग्रेस ५ ते १५ नोव्हेंबर या काळात देशव्यापी आंदोलन करणार असून त्याच्या तयारीसाठी सोनिया गांधी यांनी नेत्यांची बैठक बोलावली होती.
5 वर्षांपूर्वी -
ईव्हीएम मुद्यावरून राज ठाकरे आणि सोनिया गांधींची भेट; आंदोलन पेटणार?
नवी दिल्लीच्या दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. लवकरच महाराष्ट्रात पुढच्या दोन महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सोनिया गांधींची घेतलेली भेट खूप महत्वपूर्ण समजली जाते. दोन्ही नेत्यांमध्ये कार् सविस्तर चर्चा झाली ते समजू शकलेले नसलं तरी ईव्हीएम हा चर्चेचा मुख्य मुद्दा होता असं म्हटलं जात आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळीही राज ठाकरेंनी मोदी-शाहंविरोधात जोरदार प्रचार करत अप्रत्यक्षपणे काँग्रेस-एनसीपीच्या आघाडीला साथ दिली होती. त्यावेळी मनसेने लोकसभेची निवडणूक लढवली नव्हती.
6 वर्षांपूर्वी -
२०१९ मध्ये सोनिया असो की प्रियांका गांधी, रायबरेलीतून पडणार
काँग्रेसचे फुटीरवादी नेते दिनेश प्रताप सिंह हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यावेळी अमित शहा यांची उपस्थिती असेल. परंतु भाजप प्रवेशाआधी त्यांनी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांवर निशाणा साधला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारविरोधात सोनिया गांधींची डिनर डिप्लोमसी
मोदी सरकारविरोधात सोनिया गांधींच्या ‘डिनर डिप्लोमसीत’ १७ पक्ष सहभागी होणार असल्याचे समोर येत आहे. परंतु त्यात राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार, सपाचे नेते अखिलेश यादव आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी उपस्थित राहणार नसल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
सोनिया गांधी पुन्हा सक्रिय, विरोधकांची पुन्हा मोट बांधणी
भाजप विरोधात दंड थोपटण्यासाठी स्वतः सोनिया गांधी यांनी पुढाकार घेऊन विरोधकांची मोट बांधणी सुरु केली आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो