महत्वाच्या बातम्या
-
Rahul Dravid Appointed Team India head Coach | टी-20 विश्वचषकनंतर 2023 विश्वचषकापर्यंत राहुल द्रविड प्रशिक्षक
भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन प्रशिक्षकाचा शोध संपला आहे. टीम इंडियाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ या महिन्यात सुरू होणाऱ्या टी -20 विश्वचषकानंतर संपत आहे. या स्पर्धेनंतर ते आपल्या पदाचा राजीनामा देतील. बीसीसीआयने या पदासाठी माजी भारतीय फलंदाज राहुल द्रविडशी संवाद साधला आणि त्यांनी ही जबाबदारी स्वीकारण्यास सहमती (Rahul Dravid Appointed Team India head Coach) दर्शवली.
3 वर्षांपूर्वी -
Australia Women Vs India Women, 1st T20I Live | भारतीय विरुद्ध ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट सामना
कर्णधार हरमनप्रीत कौरच्या पुनरागमनाने उत्साहित, भारतीय महिला क्रिकेट संघ गुरुवारपासून सुरू होणाऱ्या मजबूत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी -20 मालिकेत विजयाची नोंद करून हा दौरा सकारात्मकतेने संपवण्याचा प्रयत्न करेल. अंगठ्याच्या दुखापतीमुळे हरमनप्रीत एकदिवसीय मालिका आणि एकमेव दिवस-रात्र कसोटीला मुकली पण आता तंदुरुस्त आहे, ज्यामुळे संघाची फलंदाजांची (Australia Women Vs India Women, 1st T20I Live) फळी मजबूत झाली आहे ज्यामध्ये युवा शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांचा समावेश आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mr India Men’s Physique Champion Manoj Patil | मिस्टर इंडिया मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न | साहिल खानवर आरोप
मिस्टर इंडिया मनोज पाटील याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विषारी गोळ्या खाऊन 29 वर्षीय मनोजने आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. बुधवारी रात्री उशिरा कुटुंबियांनी त्याला मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल केलं. सध्या मनोजची तब्येत स्थिर असल्याची माहिती आहे. बॉलिवूड अभिनेता साहिल खान याच्या त्रासाला कंटाळून मनोज पाटीलने हे पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
ते जाहीर झालेलं बक्षीस द्या, तर ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रित करू | नीरजच्या त्या ट्विटने भाजपाची पोलखोल
राहुल गांधींनी नीरज चोप्राचे जुने ट्विट्स शेअर केले आहेत. त्यात नीरज म्हणतो की, ”तुम्ही जी रक्कम देण्याची विनंती केली होती, ती आम्हाला द्यावी. म्हणजे आम्ही आमचे पूर्ण लक्ष्य येणाऱ्या ऑलिम्पिक खेळावर करू शकू.” तर, दुसऱ्या एका ट्विटमध्ये नीरज म्हणतो की, ”सर जेव्हा आम्ही पदक जिंकून येतो, तेव्हा तुम्ही आणि संपूर्ण देश आमच्यावर गर्व करता. हरियाणातील खेळाडूने जगभर नाव काढलं, असं म्हणता. दुसरे राज्यही हरियाणाच्या खेळाडूंचे उदाहरण देतात.
3 वर्षांपूर्वी -
भारतीय हॉकी टीमने घडवला इतिहास | ऑलिम्पिकमध्ये 41 वर्षांनंतर भारतीय हॉकीला मिळाले मेडल
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. 41 वर्षाची प्रतिक्षा संपवत भारताने हॉकीमध्ये कांस्यपदक मिळवले आहे. भारतीय हॉकी संघाला ऑलिम्पिकमध्ये शेवटचे पदक 1980 मध्ये मॉस्को येथे मिळाले होते, याचे नेतृत्व वासुदेवन भास्करन यांनी केले होते. दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाच्या लढतीत भारतीय पुरुष संघाने 5-4 असा पराभव केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
मोदींचा नवा भारत? | गुणवत्ता नव्हे तर पी व्ही सिंधूची जात शोधत आहे गूगलवर | ही राज्य आघाडीवर
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमधील महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या ताय झू-यिंगने जगज्जेत्या सिंधूला धूळ चारली. त्यामुळे पाच वर्षांची मेहनत आणि प्रदीर्घ प्रतीक्षेनंतरही सिंधूचे ‘सुवर्णस्वप्न’ अधुरेच राहिले.
3 वर्षांपूर्वी -
मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय
टोकियो ऑलिम्पिकमधून सध्या मोठी बातमी समोर येत आहे. वेटलिफ्टिंगमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देणाऱ्या मीराबाई चानूचे पदक सुवर्णात रूपांतरीत होऊ शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या क्रमांकावर असलेल्या चिनी अॅथलीट होउ जिहूईवर डोपिंगचा संशय आहे. अँटी-डोपिंग एजन्सीने होउचे सँपल-B चाचणीसाठी बोलवले आहेत. तिचा सँपल-A क्लिन नाही असे मानले जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | मित्रासोबत ‘या’ क्रिकेटपटूच्या पत्नीचा भन्नाट डान्स
प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने आपल्या डान्सने समाज माध्यमांवर धुमाकूळ घातला आहे. धनश्री आपल्या इन्स्टाग्रांम अकाऊंटवर अनेक व्हिडिओ पोस्ट करत असते. पण यावेळीचा व्हिडिओ खास आहे. कारण क्रिकेटविश्वातून पहिल्यांदाच तिला डान्समध्ये टक्कर मिळाली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णाधार श्रेयस अय्यरने धनश्रीसोबत भन्नाट डान्स केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सचिन आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील? | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पोस्टरद्वारे सवाल
केंद्राने लागू केलेल्या ३ कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे दिल्लीत २ महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला तरी आंदोलन सुरु आहे. दरम्यान, या मुद्यावरुन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने ट्विट केले होते. यावरुन सचिनच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा पदाधिकाऱ्यांनी सचिन तेंडूलकरच्या घराबाहेर पोस्टरबाजी केली आहे. आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील? असा सवाल या पोस्टरच्या माध्यमातून स्वाभिमानीच्या रणजित बागल याने उपस्थित केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
तो माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता | पण यापुढे सगळं वेगळं असेल | मराठी दिग्दर्शकाची प्रतिक्रिया
रिहानाच्या ट्विटनंतर भारतातील वातावरण ढवळून निघालं असून जगभरात शेतकरी आंदोलन चर्चेचा विषय बनला आहे. त्यात २ महिन्यांहून अधिक काळ शेतकरी आंदोलन सुरु असताना देखील भारतातील सेलिब्रेटी शांत असल्याचं पाहायला मिळालं. त्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे आंदोलनात ६० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू होऊन देखील प्रतिष्ठित व्यक्ती तोंड उघडत नव्हते. मात्र मोदी सरकारवर आंतरराष्ट्रीय स्तरातून टीका होताच बॉलिवूड सहित अनेक क्रिकेटर्स झोपेतून जागे झाल्याचं पाहायला मिळालं. एकानेही शेतकऱ्यांची बाजू न घेता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या मोदी सरकारची तळी उचलल्याचे पाहायला मिळले. त्यानंतर देशभरातुन संबंधित क्रिकेटर्सवर जोरदार टीका होताना दिसत आहे. त्यात सचिन तेंडुलकर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. त्यासाठी जुने संदर्भ देखील दिले जात आहेत.
4 वर्षांपूर्वी -
क्रिकेटर्स ट्विटचा सपाटा | संदीप शर्माचं ट्विट डिलीट | जय शहा ट्रेंडिंग | राजकीय दबावाची चर्चा
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकाविरोधात शेतकरी गेल्या २ महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत, सरकार आणि शेतकऱ्यांच्या आतापर्यंत ११ चर्चेच्या फेऱ्या झाल्या परंतु कृषी विधेयक मागे घेण्यावर शेतकरी ठाम आहेत. यातच आता शेतकरी आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय बनला आहे.
4 वर्षांपूर्वी -
भारताची फुलराणी बॅडमिंटनपटू सायना नेहवालकडून अक्षयच्या ट्विटची 'फुल'कॉपी पेस्ट
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकाविरोधात शेतकरी गेल्या २ महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत, सरकार आणि शेतकऱ्यांच्या आतापर्यंत ११ चर्चेच्या फेऱ्या झाल्या परंतु कृषी विधेयक मागे घेण्यावर शेतकरी ठाम आहेत. यातच आता शेतकरी आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय बनला आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशातील पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचं निधन | नेहरूंनी केला होता गौरव
एकेकाळी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गौरविलेले आणि थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर चमलेले देशातील पहिले हिंदकेसरी श्रीपती शंकर खंचनाळे यांचे सोमवारी सकाळी साडे आठ वाजता वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. अनेक दिग्ग्जांना आस्मान दाखवणाऱ्या या मल्लाच्या निधनामुळे कोल्हापूरची लाल माती देखील अश्रूनी न्हावून निघाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्राचा राष्ट्रीय पातळीवरील सुवर्णपदक विजेता बॉक्सर प्रणव राऊतची आत्महत्या
अकोला जिल्ह्यातील बॉक्सरपटू प्रणव राऊत याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अकोला जिल्ह्यातील शास्त्री स्टेडीयम जवळ असलेल्या क्रीडा प्रबोधिनीत त्याने गळफास घेतला. प्रणव राऊत हा राष्ट्रीय पातळीवरील सूवर्णपदक विजेता खेळाडू आहे. जानेवारी महिन्यात दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रणवने सुवर्णपदक जिंकले होते. त्याच्या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर क्रीडा वर्तुळातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आज (शुक्रवार, २१ फेब्रुवारी) सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई मॅरेथॉन २०२० : १७व्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला मोठा प्रतिसाद
आशियातील सर्वात सर्वात मोठी व मानाचा ‘गोल्ड लेबल’ दर्जा मिळालेल्या मुंबई मॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. यंदाच्या मुंबई मॅरेथॉनमध्ये गतवर्षीच्या तुलनेत नऊ हजारांनी वाढलेली धावपटूंची संख्या नागरिकांमध्ये ‘फिटनेस’चे वाढलेले महत्त्व अधोरेखित करताना दिसत आहे. त्यात कडाक्याच्या थंडीला न जुमानता मुंबईकरांनी मोठ्या संख्येने मुंबई मॅरेथॉनला उपस्थिती लावली आहे. देश-विदेशातील नामांकित धावपटू विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाले असून यंदाही केनिया, इथियोपियाचे धावपटू यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मुंबई मॅरेथॉन टीमने ‘बी बेटर’ या थीमसह, घनकचरा व्यवस्थापनासाठी उचललेले विशेष पाऊल पाहता यंदाची ‘टीएमएम २०२०’ पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कुस्तीपटू विनेश फोगट २०२० टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र
भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटनं जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत अमेरिकेच्या सारा हिल्डेब्रँटचा पराभव करत टोकियोमध्यो होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी आपले स्थान पक्के केले आहे. अशी कामगिरी करणारी विनेश फोगट पहिली कुस्तीपटू बनली आहे. ५३ किलो वजनी गटात विनेशनं ही कामगिरी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
ऑस्ट्रेलियाचा ऍशेसवर कब्जा, इंग्लंडला १८५ रननी लोळवलं
अॅशेस कसोटी क्रिकेट मालिकेत ऑस्ट्रेलियाने चौथ्या सामन्यात इंग्लंडला १८५ धावांनी धूळ चारली. जागतिक कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेल्या पॅट कमिन्सने रविवारी लौकिकाला साजेशी कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने प्रतिष्ठेचा अॅशेस करंडक त्यांच्याकडेच राखून पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. २०१७ च्या अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने ४-० असे यश मिळवले होते.
5 वर्षांपूर्वी -
स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदाल US ओपनचा चॅम्पियन
स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदाल (Rafael Nadal)याने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करत ‘अमेरिकन ओपन’ (US Open २०१९) स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात नदालने रशियाच्या दानिल मेदवेदेवला पराभूत केलं. जवळपास पाच तास चाललेल्या या सामन्यात नदालने मेदवेदेवचा ७-५, ६-३, ५-७, ४-६, ६-४ असा पराभव केला.
5 वर्षांपूर्वी -
US Open: फेडररला पराभवाचा धक्का; तर नदालची स्पर्धा चौथ्यांदा जिंकण्याच्या दिशेने कूच
टेनिसमधील ‘बापमाणूस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रॉजर फेडररचं अमेरिकन ओपनमधील आव्हान आज उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आलं. बेबी फेडरर, अर्थात ग्रिगोर दिमित्रोव्हनं पाच सेटच्या थरारक सामन्यात फेडररचा पराभव केला. फोरहँडसह अन्य काही फटके फेडररच्याच स्टाईलने खेळत असल्यानं दिमित्रोव्हला बेबी फेडररही म्हटलं जातं. या ‘बेबी’नं आज ‘बाबा’ला पार दमवल्याचं पाहायला मिळालं.
5 वर्षांपूर्वी -
रॉजर फेडररला पुन्हा ऑस्ट्रेलियन ओपन विजेता
स्वित्झर्लंडचा टेनिसस्टार रॉजर फेडरर ठरला यंदाचा ऑस्ट्रेलियन ओपन विजेता. हे त्याच्या करियरमधलं तब्बल विसावं ग्रँडस्लॅम जेतेपद आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो