Starlink V2 | पुढील वर्षी स्टारलिंक व्ही-2 लाँच झाल्यावर उपग्रहांच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात मोबाइल नेटवर्कपर्यंत पोहोचणार
Starlink V2 | इलॉन मस्क यांनी आपल्या स्टारलिंक या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत नवी घोषणा केली आहे. पुढील वर्षापर्यंत स्टारलिंक व्ही २ लाँच करणार असल्याचे मस्क यांनी ट्विट केले आहे. हे थेट मोबाइल फोनला नेटवर्क प्रदान करेल. या माध्यमातून आपण जगातील डेड झोनमधील मोबाइल नेटवर्कपर्यंतही पोहोचू. म्हणजेच जगाच्या कानाकोपऱ्यात आता मोबाइल नेटवर्कची सुविधा उपलब्ध होणार आहे. मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे लिहिले आहे की, आम्ही प्रति सेल झोन २ ते ४ एमबिट्सची कनेक्टिव्हिटी प्रदान करू. हे व्हॉईस कॉल आणि मजकूर संदेशांसाठी चांगले कार्य करेल परंतु ते उच्च बँडविड्थसाठी असणार नाही.
2 वर्षांपूर्वी