देशातील १२ टक्के स्टार्टअप बंद, तर ७०% स्टार्टअपची आर्थिकस्थिती बिकट
टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन मागे घेणं ही भारतीय कंपन्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मत आहे. यापूर्वी काही कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन हळूहळू मागे घेतल्यामुळे कंपन्यांसमोर नवी आव्हाने उभी राहणार आहेत. दुसरीकडे, भारतीय उद्योगपती आणि आयटी व्यावसायिकांचे केंद्र असलेल्या सिलिकॉन व्हॅलीने कोरोना विषाणूच्या फैलावानंतर उद्भवलेल्या स्थितीला सामोरे जाण्याची तयारी एप्रिल पासूनच सुरु केली होती. यामध्ये कर्मचारी कपात, वेतनात कपात आणि नव्या कर्मचारी भरतीस स्थगितीचा समावेश होता. आघाडीचे गुंतवणूकदार रंगास्वामी यांनी पीटीआय’सोबत बोलताना याबाबत माहिती दिली होती.
5 वर्षांपूर्वी