महत्वाच्या बातम्या
-
'या' कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणूकदारांची लॉटरी | ४०० ते ५०० टक्के टक्के रिटर्न्स
सध्या शेअर बाजारात हिंदुजा ग्लोबल सोल्यूशन (HGS) समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या वर्षभरात Hinduja Global Solution (HGS) कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 410 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. जून 2020 मध्ये हिंदुजा ग्लोबल सोल्यूशनच्या समभागाचा भाव 666 रुपये इतका होता. मात्र, जून 2021 मध्ये या समभागाची किंमत 3397 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. याचा अर्थ वर्षभरापूर्वी एखाद्या गुंतवणुकदाराने हिंदुजा ग्लोबल सोल्यूशनचे पाच लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्यांची किंमत साधारण 25.5 लाखांच्या घरात गेली आहे. गेल्या बऱ्याच काळापासून हा समभाग ग्रीन झोनमध्ये आहे.
4 वर्षांपूर्वी -
Stock Market | पेनी स्टॉक म्हणजे नेमकं काय? | मोहात पडून खरेदी करता? - मग नक्की वाचा
शेअर मार्केट हा कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा तसेच त्या देशाच्या प्रगतीचा प्रमुख भाग असतो. शेअर बाजाराचा फायदा हा कंपन्यांना तसेच त्या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला अश्या दोघांना होतो. काही लोकांना हाच शेअर बाजार जुगार आहे असे वाटते तर काहींना पैसे कमवण्याचे साधन. तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की भारतातील फक्त 4% लोक शेअर मार्केटमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या गुंतवणूक करतात. शेअर मार्केटमधील महान गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीस सुरुवात केली. परंतु यात अनेकजण फसतील अशा गोष्टी आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास पेनी स्टॉकचे द्यावे लागेल.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना देशभर वाढतोय | शेअर बाजार कोसळला | गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटी बुडाले
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बाजारात सोमवारी जोरदार घसरण दिसून येत आहे. सुरुवातीच्या काळात सेन्सेक्स 1700 अंकांनी खाली घसरून 48 हजारांच्या खाली आला. यामुळे गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटी बुडाले. यापूर्वी 1 फेब्रुवारीला हा निर्देशांक 48 हजारांवर आला होता.
4 वर्षांपूर्वी -
UK | नव्या कोरोना व्हायरसने चिंता | सेन्सेक्स कोसळला | ५ लाख कोटींचे नुकसान
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा आणि आधीच्या तुलनेत अधिक धोकादायक स्ट्रेन आढळून आल्यानं केंद्र सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनहून भारतात येणारी हवाई वाहतूक रोखण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २२ डिसेंबरला रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी सुरू होईल. हा निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत लागू असेल.
4 वर्षांपूर्वी -
सेन्सेक्स कोसळला | गुंतवणूकदारांचे २.७ लाख कोटीचे नुकसान
अमेरिकेत दुसरे पॅकेज देण्याची शक्यता मावळली आहे. भारताने जाहीर केलेले दुसरे पॅकेज अपेक्षा अपेक्षाभंग करणारे आहे. त्याचबरोबर विविध देशात करोनाचा संसर्ग वाढल्यामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने जागतिक शेअर बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक गुरुवारी कोसळले.
4 वर्षांपूर्वी -
शेअर बाजारात मोठी पडझड | गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात आज टेन्शन वाढलेलं पाहण्यास मिळालं कारण सेन्सेक्स १११५ अंकांनी घसरला आहे. खरंतर गेल्या काही दिवसांमध्ये शेअर बाजारात जरा बरं वातावरण होतं. मात्र आज आठवड्याच्या चौथ्या दिवशी शेअर बाजार १११५ अंकांनी कोसळला. बाजार बंद होताना सेन्सेक्स ३६ हजार ५५० अंकांवर स्थिरावला. ही परिस्थिती अगदी मार्च महिन्यासारखीच आहे असं अर्थ तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेअर बाजार कोरोनाच्या धास्तीने कोसळला; गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटी बुडाले
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. उद्योग- व्यवसायाबरोबरच शेअर बाजारावरही त्याचा मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच अर्थात सोमवारी शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळत आहे. शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स २००५ अंकांनी कोसळला असून तो ३२,५५७ अंकावर स्थिरावला आहे. निफ्टीत सध्या ६११ अंकांनी खाली आला आहे. तसेच आशियाई बाजारात पुन्हा एकदा पडझड झाली. याव्यतिरिक्त हाँगकाँग, शाँघाय, टोकियोचे बाजारही सोमवारी चांगलेच गडगडले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सुरुवातीच्या पडझडीनंतर शेअर बाजार काहीसा सावरला, भीती मात्र कायम
सलग दुसऱ्या दिवशी मुंबई शेअर बाजाराच्या आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात मोठी पडझड झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये ९५० अंकांची घसरण झाल्यामुळे बाजारात लोअर सर्किट लावण्यात आले. यामुळे राष्ट्रीय शेअर बाजारात व्यवहार ४५ मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात अर्थात सेन्सेक्समध्ये शुक्रवारी बाजार उघडताच घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सुरुवातीच्या पडझडीनंतर दोन्ही शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी खरेदी करण्याला काहीसा उत्साह दाखविल्यामुळे निर्देशांक सावरण्यास मदत झाली.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना इम्पॅक्ट: सेन्सेक्स १६०० तर निफ्टी ४७० अंकानी घसरला
कोरोना व्हायरसबाधितांची संख्या जगभरात वाढत असताना त्याचा गंभीर परिणाम आता आर्थिक आघाडीवरही दिसू लागला आहे. जगातील सर्वच महत्त्वाच्या शेअर बाजारांच्या निर्देशांकात पडझड झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात गुरुवारी सकाळी मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल १८०० अंकांनी कोसळला. राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टीमध्येही ५०० अंकांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.
5 वर्षांपूर्वी -
दलाल स्ट्रीट आज हलाल स्ट्रीट झाला: प्रियांका चतुर्वेदी
कोराना विषाणूच्या प्रभावामुळे शेअर बाजारात हाहाकार उडाला आहे. तेलाच्या किेंमतीत झालेल्या घसरणीनंतर आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजार कोलमडल्याचे चित्र पहायला मिळाले. दुपारी निर्देशांकात २३४२ अंकाची घसरण होऊन सेन्सेक्स ३५, २३४ वर आला. निफ्टीही घसरून तो १०, ४०० वर आला. कोरोनाने जगभरात आर्थिक मंदीचे सावट घोंगावत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शेअर बाजारातील निर्देशांकात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचा जवळपास ५ लाख कोटी रुपये बुडाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
शेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स १४०० अंकांनी कोसळला
करोना व्हायरसमुळे आधीच शेअर बाजारात निरुत्साह असताना, येस बँकेवर आरबीआयने निर्बंध लादले त्यामुळे शुक्रवारी बाजार आणखी गडगडला. आता सौदी अरेबियाने तेल बाजारपेठेला मोठा धक्का दिला आहे. एकेकाळचा सहकारी असलेल्या रशिया विरोधात सौदी अरेबियाने दर युद्ध सुरु केले आहे. त्यामुळे तेलाच्या किंमतीमध्ये ऐतिहासिक घसरण झाली आहे. आज सकाळी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात १४०० अंकांची घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सुद्धा ४०० पेक्षा जास्त अंकांनी गडगडला. निफ्टी सात महिन्यातील नीचांकी पातळीला पोहोचला आहे.
5 वर्षांपूर्वी -
शेअर बाजारात मोठी पडझड, सेन्सेक्स १४०० अंकांनी कोसळला
मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी दिवसाच्या सुरुवातीलाच निर्देशांकात १४०० अंकांची मोठी घसरण झाली. नव्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेअर मार्केटमध्ये मोठी उलथापालथ पहायला मिळाली. गेल्या आठवड्यातही सेन्सेक्समध्ये ११०७. ४१ अंकांची मोठी घसरण पाहायला मिळाली होती. सलग दुसऱ्या आठवड्यात शेअर बाजारात पडझड पहायला मिळाली.
5 वर्षांपूर्वी -
चिनी ‘कोरोना’ भीती; शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स ११०७ अंकानी कोसळला
मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी दिवसाच्या सुरुवातीलाच निर्देशांकात ११०७. ४१ अंकाची मोठी घसरण झाली. शेअर बाजार सुरु होताच आठवड्याच्या शेवटच्या दिवसाची सुरुवातच खराब झाली. सेन्सेक्स ११०७. ४१अंकांनी घसरुन ३८, ६३८ वर आला. टेक महिंद्रा, टाटा स्टील आदी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झालेली पहायला मिळाली. तर निफ्टी ३०० अंकांनी कोसळून ११,३३३ वर स्थिरावला.
5 वर्षांपूर्वी -
शेअर बाजारात तेजी; गुंतवणूकदारांना २.७३ लाख कोटींचा नफा
शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी मंगळवारी अक्षरश: दिवाळी साजरी केली. सोमवारच्या सुटीनंतर मंगळवारी उघडलेल्या बाजारात गुंतवणूकदारांनी सुरुवातीपासून समभागखरेदीचा सपाटा लावल्याने सेन्सेक्स उसळत गेला. दिवसभरात ५८१ अंकांनी वधारलेल्या सेन्सेक्सने दिवसअखेरीस ३९८३१चा स्तर गाठला. तर, १५९ अंकांची वाढ साधलेला निफ्टी ११७८६वर स्थिरावला. सेन्सेक्सच्या या दमदार कामगिरीमुळे गुंतवणूकदारांच्या बाजार भांडवलात तब्बल २.७३ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.
5 वर्षांपूर्वी -
शेअर बाजार ६५० अंकांनी कोसळला; गुंतवणूकदारांचे २.३ लाख कोटी बुडाले
जागतिक अर्थव्यवस्थेवर असलेले मंदीचे सावट, जागतिक बाजरापेठेतील घसरण याचा फटका हिंदुस्थानी शेअर बाजारालाही बसला आहे. दुपारी २ वाजेनंतर निर्देशांक ६७० अंकांनी घसरला. दिवसभरातील कामकाज संपले त्यावेळी निर्देशांकाने ६४२ एवढी घसरण घेत 36,481.09 वर बाजार बंद झाला. तर निफ्टीमध्ये १८६ अकांची घसरण होऊन तो १०,८१७.६० वर बंद झाला.
5 वर्षांपूर्वी -
शेअर बाजार कोसळला; गुंतवणूकदारांचं २.७९ लाख कोटींचं नुकसान
जीडीपी दर अपेक्षेपेक्षा कमी; तसंच इतर महत्वाच्या क्षेत्रांत कासवगतीनं सुरू असलेल्या विकासाचा परिणाम शेअर बाजारावर झाला. दुपारी सव्वातीनच्या सुमारास सेन्सेक्समध्ये तब्बल ८०० अंकांची घसरण नोंदवली आणि तो ३६,५००वर पोहोचला. निफ्टीतही २४.४० अंकांची घसरण नोंदवून तो १०७८२.८५ वर पोहोचला.
5 वर्षांपूर्वी -
शेअर मार्केट गडगडला, सेन्सेक्समध्ये ५७२ अंकांची घसरण, २.२८ लाख कोटींचे नुकसान
शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली आहे. हाती ते;आलेल्या बातमीनुसार सेन्सेक्स तब्बल ५७२ अंकांनी खाली घसरला आहे. तर निफ्टीत सुद्धा मोठी घसरण पहायला मिळाली. त्यामुळे बाजारातील गुंतवणूकदारांचे तब्बल २.२८ लाख कोटी रुपयांचे एवढे नुकसान झाले आहे.
6 वर्षांपूर्वी -
सेन्सेक्स आणि निफ्टीचीही ऐतिहासिक भरारी
शेअर बाजारानं आज नवा उच्चांक गाठला आहे आणि बहुसंख्य बँकांच्या शेअर्सचं मूल्य वधारल्यानं बाजारात ही तेजी पाहायला मिळत आहे. आज मुंबई शेअर बाजाराने पहिल्यांदा ३८,००० अंशांचा टप्पा ओलांडला.
7 वर्षांपूर्वी -
शेअर बाजार गडगडला, तब्बल १२०० अंकांनी सेन्सेक्स खाली.
अर्थसंकल्प २०१८-१९ सादर झाल्यापासून सलग ६ व्या दिवशीही शेअर बाजारात मोठी पडझड सुरूच आहे.
7 वर्षांपूर्वी -
सेन्सेक्सची 36 हजारांवर उसळी
आज ही शेअर बाजारात तेजी सुरूच होती. सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्सने ३६ हजारांचा पल्ला गाठला आणि ऐतिहासिक पातळी गाठली. तर दुसरीकडे निफ्टीनेही ११ हजाराचा विक्रमी पल्ला गाठला आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC