शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कारखान्यांची यादी साखर आयुक्तालयाकडून जाहीर | भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांचेही कारखाने
इतिहासात पाहिलांदाच साखर कारखानदारीवर जाहीर आणि ठोस भूमिका साखर आयुक्तालयाकडून घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कारखान्यांची थेट यादी साखर आयुक्तालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. इतिहासात पहिल्यांदाच साखर आयुक्तालयाकडून अशी यादी काढण्यात आली आहे. राज्यातील एकूण 44 कारखाने हे रेड झोनमध्ये म्हणजे एफआरपी वेळेत न देणारे कारखाने म्हणून घोषित केले आहे. एवढ्यावरच साखर आयुक्त थांबले नसून शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याना घालताना ही यादी लक्षात घेऊन ऊस कोणत्या कारखान्याला घालावा, असे आवाहनही केले आहे.
3 वर्षांपूर्वी