Supreme Court on Divorce | पती-पत्नीच्या नात्यात सुधारणा होण्यास वाव नसेल तर घटस्फोट लगेच मिळू शकतो, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
Supreme Court on Divorce | जर लग्नानंतर पती-पत्नीच्या नात्यात सुधारणा होण्यास कोणताही वाव नसेल तर अशा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून घटस्फोटाला ताबडतोब मंजुरी मिळू शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने सोमवारी सुनावणीदरम्यान ही माहिती दिली. कलम १४२ अन्वये सर्वोच्च न्यायालयाला न्यायासाठी दोन्ही पक्षांच्या संमतीने कोणताही आदेश जारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर दोन्ही पक्ष घटस्फोटासाठी सहमत असतील तर अशी प्रकरणे कौटुंबिक न्यायालयात पाठवण्याची गरज नाही, जिथे 6 ते 18 महिने थांबण्याची आवश्यकता आहे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
2 वर्षांपूर्वी