महत्वाच्या बातम्या
-
ED कुणाला अटक करणार हे यांना कसे माहीत पडते? | CBI-ED'च्या कामाला काही दर्जा आहे की नाही? - सुप्रिया सुळे
मी खासदार झाले तरी मला ईडी आणि सीबीआयचे प्रमुख माहीत नव्हते. आज रस्त्यावर चलन काटणाऱ्या प्रमाणे ईडीची अवस्था झाली आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच सीबीआय आणि ईडीच्या कामाला काही दर्जा आहे की नाही?, असा सवालही त्यांनी केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
माझं आयुष्य ब्रेकिंग न्यूज नाही | त्यामुळे मी इन्स्टंट कॉफी पित नाही - सुप्रिया सुळे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र या चर्चेतील हवाच काढली. मी इतकं इम्पलसिव्ह आयुष्य जगत नाही. माझं आयुष्य ब्रेकिंग न्यूज नाही. कोणी काही बोललं तरी मी थोडा वेळ विचार करते, असं सांगतानाच राजकीय मतभेद बाजूला ठेवून कोणी वैयक्तिक नाती जपत असेल तर त्यात काही गैर नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
3 वर्षांपूर्वी -
यशोमती ठाकूर यांच्या बोलण्याचा विपर्यास केला जातोय | अजित पवारांवरील आरोपांवर सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दरम्यान, अजित पवार यांच्याकडून आम्हाला साथ दिली जात नसल्याचा ठपका यशोमती ठाकूर यांनी यावेळी ठेवला होता. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहेत. अजित पवार सहकार्य करत नाही असे जरी बालविकास मत्र्यांनी म्हटले असले तरी त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नये असे आवाहन सुळे यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, अशा बोलण्यान ते काय खरं होत नाही - सुप्रिया सुळे
हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरू झालं आहे का?, असा सवाल राज यांना करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला होता.
3 वर्षांपूर्वी -
केंद्राने OBC एम्पिरिकल डेटा द्यावा | सुप्रिया सुळेंची संसदेत मागणी | भाजप नेत्यानं म्हटलं टाईमपास...
दिल्लीत सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. सध्या संसदेत आरक्षण आणि घटनादुरुस्तीवरून दावे प्रतिदावे सुरु झाले आहेत. त्यालाच अनुसरून राज्यातील मराठा आरक्षण आणि ओबीसी राजकीय आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
देशात कोरोना, बेरोजगारी, आरोग्याच्या प्रचंड अडचणी | तरी एजन्सीचा गैरवापर करत सूडाच्या राजकारणात व्यस्त - सुप्रिया सुळे
एजन्सीचा गैरवापर हे त्यांचं स्टाईल ऑफ ऑपरेशन दिसतं आहे. मागील अनेक वर्षात त्यांची सत्ता आल्यापासून आम्ही जवळूवन पाहिलेलं आहे. शरद पवारांना देखील ईडीची नोटीस पाठवली गेली होती, त्यामुळे हा अनुभव आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे.” असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज म्हटलं. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवसास्थानी ईडीने आज छापेमारी केली, त्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना सुप्रिया सुळे यांनी पुण्यात माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
4 वर्षांपूर्वी -
सुप्रिया सुळेंनी ‘ब्रीच कॅंडी’च्या गेटवरुन पंढरपूरची सभा गाजवली
एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात एडमिट आहेत. २ दिवसांपूर्वी त्यांच्यासह शस्त्रक्रिया झाल्याने सध्या ते रुग्णालयात आहेत. तर दुसरीकडे.पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक तोंडावर आली आहे. आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या रिक्त जागी त्यांच्या मुलाला म्हणजे भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
GST, मनरेगा, आधार'सारख्या योजनांना विरोध करत स्वतःच त्या राबविल्या | हा यु-टर्न नव्हता का?
भारतीय जनता पक्षाने जीएसटी, मनरेगा आणि आधार युआयडी सारख्या योजनांना सुरुवातीला आक्रमक विरोध करुन नंतर स्वतःच या योजना राबविल्या होत्या. हा यु-टर्न नव्हता का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत उपस्थित केला.
4 वर्षांपूर्वी -
पदवीधर निवडणुकीत यश मिळविणाऱ्या राष्ट्रवादीच्या या आमदाराकडून मंत्रिपदाची मागणी
राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निकालानंतर (results of 3 graduate and 2 teacher constituencies) सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचं फळ मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं. तर दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्यानं भारतीय जनता पक्षाला जबरदस्त धक्का बसला होता. कारण, भारतीय जनता पक्षाला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ देखील गमवावा लागला होता. पदवीधरच्या या तिनही मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी ठरला होता.
4 वर्षांपूर्वी -
कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही | सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
मिळालेल्या माहितीनुसार, योगी आदित्यनाथ 1 डिसेंबर रोजी मुंबईला येण्यासाठी उत्तर प्रदेशमधून रवाना होतील. ते 1 डिसेंबरच्या रात्री मुंबईत पोहोचतील. त्यानंतर 2 डिसेंबर रोजी ते मुंबई शेअर बाजाराला भेट देतील. यावेळी योगी त्यांच्या दौऱ्यात महाराष्ट्रातील उद्योगपती, तसेच बॉलिवूड निर्मात्यांसोबत बैठक घेतील. या बैठकीत उद्योगपती तसेच बॉलिवूड निर्मात्यांना उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्याचे ते आवाहन करतील. रतन टाटा, आदित्य बिरला असे बडे उद्योगपती या बैठकीत सहभागी होतील.
4 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ | समाज माध्यमांवर सुप्रिया सुळेंची बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण हे अधिकृत उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या चव्हाण यांच्याविरोधात प्रचार करत असल्याची एक ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावानं फेक मोबाइल नंबर देखील शेअर करण्यात आला आहे. त्या चुकीच्या माहितीद्वारेच सदर क्लिप शेअर केली जात आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ह्या सर्व प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. विरोधकांचा हा रडीचा डाव असल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
दुनिया घुम लो...लस पुण्यातच सापडणार | अन्यथा म्हणायचे मीच लस शोधली - खा. सुप्रिया सुळे
देशात झपाट्यानं पसरलेल्या कोरोना संसर्गानंतर आता प्रत्येकाला कोरोना व्हॅक्सिनची प्रतिक्षा लागली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आता कोरोना व्हॅक्सिनवर लक्ष केंद्रित केलं आहे. याचसाठी पंतप्रधान मोदी शनिवारी अहमदाबाद, हैदराबाद आणि पुण्याचा दौऱ्यावर आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सारखं सरकार पडणार म्हणतात | मोकळी भांडीच खूप आवाज करतात - सुप्रिया सुळे
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे. मात्र मागील एक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे दिल्ली ते गल्लीतील नेते महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याच्या गर्जना करत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील अनेक नेत्यांनी तर थेट तारखादेखील जाहीर केल्या होत्या. मात्र दुसरीकडे भाजपचेच नेते मोठ्या संख्येने पक्ष सोडून महाविकास आघाडी पक्षातील एखाद्या पक्षात जाहीर प्रवेश करत आहेत. त्यामुळे सत्ताधारी देखील विरोधकांची खिल्ली उडवत स्वतःचे कार्यकर्ते टिकविण्यासाठी भाजपचे नेते अशा सरकार पडण्याच्या बाता मारत असतात असं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्याच्या त्या जमिनीवर विकास काम होत आहे | कोणासाठी म्युझियम बांधले जात नाही
मुंबईतील मेट्रो ३ कारशेडच्या कांजूरमार्ग जागेवरुन आता मोदी सरकार आणि ठाकरे सरकारमध्ये वाद उफाळून आला आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र केलं आहे. राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी देखील यावरून केंद्र सरकारला लक्ष केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कात्रजमधील परिस्थितीला पालिका जबाबदार – सुप्रिया सुळे
पुण्यात रात्रीपासून तुफान पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचा घरात पाणी शिरले आहे. तर कात्रज येथील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. मुसळधार पावसामुळे येथील स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. कात्रज परिसराला आज खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली आणि पाहणी केली. कात्रजमधील परिस्थितीला पालिका जबाबदार आहे, असे थेट आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
ठाकरे पितापुत्रांसह सुप्रिया सुळेंच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांची फेरपडताळणी?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची फेरपडताळणी होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला (Central Board of Direct Taxes – CBDT) तशी विनंती केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी सरकार अर्थव्यवस्था व बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलणे टाळतेय | सुप्रिया सुळेंचा घणाघात
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी अपेक्षेप्रमाणे ढासळलेली अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य केले. यामध्ये महाराष्ट्राच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली. त्यांनी लोकसभेतील चर्चेदरम्यान म्हटले की, सध्याच्या घडीला अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती आणि बेरोजगारी हे आपल्या देशासमोरील प्रमुख मुद्दे आहेत. आपण अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच या मुद्द्यांवरील चर्चेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
4 वर्षांपूर्वी -
जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून गरजूंना आम्ही मदत करत आहोत - सुप्रिया सुळे
कौटुंबिक हिंसाचार करणं ही काही कौतुकाची किंवा मर्दानगीची गोष्ट नाही. आपल्या कुटुंबाचं संरक्षण करणं ही प्रत्येक पुरुषाची नैतिक जबाबदारी असते. स्त्रियांचा आदर करण्याचा संस्कारच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला असून त्याची आठवण सगळ्यांनी ठेवली पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज व्यक्त केलं. खासदार सुप्रिया सुळे यांनी आज फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
5 वर्षांपूर्वी -
पक्षाला बदनाम कराल तर गाठ माझ्याशी; सुप्रिया सुळे कार्यकर्त्यांवर संतापल्या
पैठणमधील कार्यकर्ता मेळाव्यात घोषणाबाजी करत गोंधळ घालणाऱ्या राडेबाज कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चांगलीच दमबाजी केली आहे. ‘माझ्या बापाने रक्त आटवून पक्ष उभा केला आहे. पक्षाला बदनाम कराल तर गाठ माझ्याशी आहे,’ अशा शब्दात सुळे यांनी या गोंधळी कार्यकर्त्यांना दम भरल्याचं सूत्रांनी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
हिंगणघाट जळीत प्रकरण: हा मृत्यू नव्हे, तर खून; सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया
माणुसकीला काळीमा फासणारी आणि अवघ्या महाराष्ट्राचं मन सुन्न करणारी घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडली होती. तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षिकेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न विकी नगराळे या युवकाने केला होता. यात गंभीर अवस्थेत जळाल्याने, पीडितेला नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी ६.५५ मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक दिवसांपासून तिची मृत्यूशी झुंज सुरू होती. आज सकाळी ७.४० मिनिटांनी हिंगणघाट पीडितेच्या मेडिकल बुलेटिनमध्ये डॉक्टरांनी याबाबतची माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS