महत्वाच्या बातम्या
-
सांगली बंद यामागे काहीतरी राजकीय षडयंत्र दिसतंय: सुप्रिया सुळे
एनसीपी’च्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी शुक्रवारी पुकारलेल्या सांगली बंदवर खोचक टीका केली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे दुर्दैव म्हणावं लागेल. ज्या छत्रपतींनी आपल्याला कष्ट करायला शिकवलं आणि त्यांच्यासाठी ‘बंद’. हे जरा चुकीचे वाटतं… यात काहीतरी राजकीय षडयंत्र दिसतंय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर असं करणं हे योग्य वाटत नाही. संजय राऊत यांनी कालच त्यांचे वक्तव्य मागे घेतले आहे. त्यामुळे ती चर्चा न करता राज्यात आज अनेक गंभीर प्रश्न आहेत त्याकडे लक्ष द्यायला हवं, असंही मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
पोलीस भरती प्रक्रियेत आधी मैदानी चाचणी घ्यावी: खासदार सुप्रिया सुळे
राज्यातील पोलीस भरती प्रक्रियेसंदर्भातील गेल्या शासनाने काढलेला शासन निर्णय रद्द करून ही प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राबवण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. आता या मागणीनुसार कार्यवाही झाल्यास राज्यभरातील लाखो उमेदवारांना दिलासा मिळू शकेल.
5 वर्षांपूर्वी -
डोंबिवली: लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू; खा. सुप्रिया सुळेंनी संसदेत विषय मांडला होता
डोबिवली लोकलच्या गर्दीने आणखी एका प्रवाशाचा जीव घेतला आहे. भरगच्च लोकलमधून पडल्याने एका २२ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. चार्मी पासद असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे. डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान आज सकाळी ९ च्या सुमारास ही दुर्घटना घडली.
5 वर्षांपूर्वी -
सुप्रिया सुळे व आदित्य यांचा महापोर्टलला विरोध; सोबत महाराष्ट्रनामा'कडून ऑनलाईन अभ्यासाची सोय
अनेक त्रुटी असल्याने महापोर्टल विरोधात राज्यभर आंदोलन पेटली होती. कारण विद्यार्थ्यांना याविषयी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यात राज्य सरकारतर्फे विविध खात्यांच्या भरती प्रक्रिया सुरु झाल्याने उमेदवारांमध्ये नव्या सरकारकडून अनेक अपेक्षा आहेत. कारण राज्य शासनाच्या विविध विभागांच्या नोकरभरतीच्या परीक्षा महापोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहे. दरम्यान, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महापोर्टल बंद करुन नवे आणि त्रुटी नसलेले उत्तम पोर्टल सुरु करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीला सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांचं स्वागत
महाराष्ट्रात गेले काही दिवस सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. राज्यातील सत्ता स्थापनेचा अखेर मंगळवारी तिढा सुटला. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देते, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आता आपले बहुमत दाखवत ‘महाविकास’आघाडी सत्ता स्थापन करणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
भाजपचे सहा मंत्रीच पराभवाच्या छायेत असल्याचं भाजपंच सांगतंय: सुप्रिया सुळे
‘लोकसभेच्या वेळेस सात वेळा मुख्यमंत्री माझ्या मतदारसंघात आले. अमित शहा आले, चंद्रकांत पाटील आले, पण मी निवडून आले. आता हा ‘बारामती पॅटर्न’ आपल्याला कर्जत-जामखेडमध्ये दाखवायचा आहे,’ असे आवाहन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. भारतीय जनता पक्षाचे मंत्री राम शिंदे पडणार आणि रोहित पवार निवडून येणार, असं मी नाही, भारतीय जनता पक्ष म्हणत आहे, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत निवडणूक सर्व्हेचा दाखला देत सुप्रिया सुळेंनी रोहित पवार यांना निवांत राहण्याचा सल्ला दिला.
6 वर्षांपूर्वी -
आमच्याकडील गुजरातच्या निरमा पावडरने आम्ही नेत्यांना पक्षात घेताना धुवून घेतो: दानवे
भ्रष्टाचाराविरूद्ध आवाज उठवणाऱ्या सत्ताधाऱ्यांना डागाळलेले नेते कसे चालतात. त्यांना कोणत्या वॉशिंग मशीनमध्ये धुतले जाते, असा प्रश्न एनसीपी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षाला केला होता. सुळे यांच्या आरोपाला भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उत्तर दिले आहे. आमच्याकडे गुजरातची निरमा पावडर आहे. नेत्यांना पक्षात घेताना या पावडरने धुवून घेतो, असे दानवे म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
२००४ ते २०१४ दहा वर्ष तुमची सत्ता होती; तेव्हा ईव्हीएम चांगले होते का? फडणवीस
ईव्हीएम मशीनवरील आक्षेपावरून देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सुनावले आहे . २००४ ते २०१४ दहा वर्ष राज्यात पार्लमेंट ते पंचायत तुमची सत्ता होती. तेव्हा ईव्हीएम चांगले होते का? बारामतीत सुप्रिया सुळे निवडूण आल्या, तिथे ईव्हीएम चांगले आणि जालन्यात रावसाहेब दानवे विजयी झाले तर तिथे ईव्हीएम खराब कसे? असा सवाल करतांनाच ईव्हीएमचा अर्थ एव्हरी वोट फॉर मोदी असा आहे आणि तो जनतेने ठरवला आहे असे फडणवीस यांनी ठणकावले.
6 वर्षांपूर्वी -
बारामतीत भाजप मातीत; सुप्रिया सुळे विजयी तर कांचल कुल यांचा पराभव
बारामती लोकसभा मतदारसंघावर विजय प्राप्त करण्याचं भाजप नेत्यांचं स्वप्न भंगलं असून या मतदारसंघात केवळ पवार कुटुंबीयच राज्य करतात हे पुन्हा सिद्ध झालं आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी मोठं मोठ्या रणनीती आखात होते आणि त्यावर लक्ष देखील ठेऊन होते.
6 वर्षांपूर्वी -
युनिसेफकडून सुप्रिया सुळेंचा पार्लमेंटिरियन अॅवार्ड फॉर चिल्ड्रेनने गौरव
राष्ट्रवादीच्या खासदार तसेच शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा युनिसेफ या जागतिक संघटनेने ‘पार्लमेंटिरियन अॅवार्ड फॉर चिल्ड्रेन’ने गौरव केला आहे. अनेक अपंग मुलांसाठी बारामती खासदार क्षेत्रात भरपूर मदतकार्य सुप्रिया सुळे यांनी केल्याने त्यांच्या कामाची दखल युनिसेफने घेतली आहे. त्याच्या या कार्याची दखल खुद्द संयुक्त राष्ट्र संघाने घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
सोशल मिडीयावर बदनामी, ‘हाताची घडी तोंडावर बोट’ पेजवर गुन्हा दाखल होणार?
एनसीपीच्या वरिष्ठ नेत्यांची ‘हाताची घडी तोंडावर बोट’ या फेसबुक पेजवरून बदनामी केल्या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. या नेत्यांमध्ये खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे तसेच पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आणि धनगर समाजाची फसवणूक - सुप्रिया सुळे
भाजप सरकारने जाहीरनाम्यात मान्य केलेले मराठा आणि धनगर समाजाचे आरक्षण साफ विसरून मराठा आणि धनगर समाजाची साफ फसवणूक करत आहे – सुप्रिया सुळे
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB