महत्वाच्या बातम्या
-
सुशांतसिंहच्या मृत्यूचं सत्य सीबीआयकडूनही गुलदस्त्यात | राज्याला बदनाम करणारे विरोधकही मूग गिळून शांत
मागील वर्षी म्हणजेच २०२० मध्ये बॉलिवू़ अभिनेता सुशांतसिंग राजपूतयाचा मृतहेह वांद्रा येथील त्याच्या राहत्या घरी गळफास लावलेल्या अवस्थेत मिळाला. त्याच्या मृत्यूनंतर सिनेसृष्टीसह राजकारणीही हळहळले. यानंतर त्याचा मृत्यू कसा झाला याचा तपास सुरु झाला. ही हत्या होती की आत्महत्या यावरुन राजाकराण सुरु झालं. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासावरून ‘बिहार विरुद्ध महाराष्ट्र’ पोलीस असा सामना रंगला. दुसरीकडे सोशल मीडियावर मुंबई पोलिसांविरुद्ध बदनामीचे षड्यंत्र राबविल्याचे समोर येताच, आरोप- प्रत्यारोपांचे राजकारण तापले. मात्र, वर्षभरानंतरही सुशांतच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.
4 वर्षांपूर्वी -
दिशा सालियान आत्महत्या प्रकरण | CBI तपासाची याचिका हायकोर्टाने फेटाळली
मागील काही महिन्यांपासून सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाने राजकीय वातावरण तापलं होतं. मात्र सीबीआयकडे प्रकरण देऊन सुद्धा काहीच हाती न लागल्याने विरोधकांचा देखील हिरमोड झाला होता. त्यानंतर राजकीय विरोधकांनी बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणाकडे (Sushant Singh Rajput Ex Manager Desha Salian suicide case) मोर्चा वळवला होता. वास्तविक सदर प्रकरणाची फाइल मुंबई पोलिसांनी बंद केल्यानंतर दिशाच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका मुंबई हायकोर्टानं (Mumbai High Court rejected plea) अखेर फेटाळली आहे.
4 वर्षांपूर्वी -
SSR Case | या वृत्तवाहिन्यांना २७ ते ३० ॲाक्टोबर दरम्यान जाहीर माफी मागण्याचे आदेश
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आज तक वृत्तवाहिनीला एक लाखाचा दंड ठोठाविण्यात आला आहे. तर झी न्यूज, इंडिया टीव्ही, न्यूज २४ व आज तक (Aak Tak, ZEE News, India TV, News24) या वाहिन्यांना सार्वजनिक माफी मागायचे आदेश न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड असोसिएशनच्या वतीनं देण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुशांत संबंधित बनावट वृत्त | आज तक'ला दंड तर ३ वाहिन्यांना माफी मागण्याचे आदेश
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्याशी संंबंधित बनावट ट्विट प्रसारित केल्याबद्दल ‘आज तक’ या वृत्तवाहिनीला नॅशनल ब्रॉडकास्टिंग स्टॅण्डर्ड्स अॅथॉरिटी (एनबीएसए) या संस्थेने एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुशांतने आत्महत्याच केली हे कशावरून? | AIIMS च्या डॉक्टरांनी दिलं स्पष्टीकरण
AIIMS च्या डॉक्टरांनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI ला दिला. सीबीआयनेदेखील हा अहवाल मान्य केला आहे. मात्र एम्सच्या या रिपोर्टवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. सुशांतचा मृत्यू गळफासामुळे झाला हे रिपोर्टमधून सांगू शकता पण ही आत्महत्याच आहे हे कशावरून सांगता अशी विचारणा वकिलांनी केली. हे तर सीबीआयला आपला तपास आणि पुराव्यानुसार सिद्ध करावं लागेल, असं सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी म्हटलं.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अखेर जामीन मंजूर
मुंबई, ७ ऑक्टोबर : सुशांतसिंह राजपूत मृत्यू अमलीपदार्थ पुरवठा प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अखेर जामीन मंजूर झाली आहे. मुंबई हायकोर्टाने रियाला सशर्त जामीन मंजूर केला आहे.. रिया चक्रवर्तीने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दहा दिवस हजेरी देणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे रियाने आपला पासपोर्ट जमा करणे देखील गरजेचे आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुशांतची एक बहिण बनावट डिस्क्रिप्शनच्या आधारे त्याला ड्रग्ज देण्याचा प्रयत्न करत होती
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस आणि आयुक्त परमबीर सिंह यांच्या बदनामीसाठी सोशल मीडियात तब्बल ८० हजार बनावट अकाऊंट्स उघडण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आयुक्त परमबीर सिंह यांनी मुंबई सायबर सेलला चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. तसेच, याप्रकरणी मुंबई सायबर सेलकडून माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
एम्स समितीचे प्रमुख डॉ. गुप्तांविरोधात कपोकल्पित वृत्त सुरु | ऑडिओ क्लिपचा आधार?
काही दिवसांपूर्वीच एम्सने सुशांतच्या हत्येची थिएरी नाकारली. सुशांतने आत्महत्याच केली असा रिपोर्ट एम्सच्या समितीने सीबीआयला सुपूर्द केला आहे. मात्र सदर रिपोर्टवरून अचानक आक्रमक झालेले भाजपचे नेते आणि त्यांची सुशांतच्या कुटुंबीयांप्रती उफाळून आलेली माणुसकीची भावना आणि त्याचवेळी रिपब्लिक टीव्हीने सुरु केलेली ऑडिओ क्लिपची ओरड यांचा अचूक ताळमेळ लागला आहे.
4 वर्षांपूर्वी -
NCB च्या केपीएस मल्होत्रांना कोरोना | दीपिकाची केली होती चौकशी
बॉलिवूडचं ड्रग्स कनेक्शन असल्याच्या तपासात आता कोरोनाची एन्ट्री झाली आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) चे डिप्टी डायरेक्टर केपीएस मल्होत्रा यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर केपीएस मल्होत्रा मुंबईहून दिल्लीला पुन्हा गेले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सुशांत आत्महत्या प्रकरण | भाजप बिहारच्या राजकारणावरून तोंडघशी
अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणाचा गेल्या 3 महिन्यांपासून तपास सुरू आहे. सुशांतने आत्महत्या केली की हत्या? या प्रश्नभोवती गेल्या तीन महिन्यापासून मुंबई पोलीस आणि नंतर सीबीआयने तपास केला. पण, आता AIIMS हॉस्पिटलच्या रिपोर्टमध्ये या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुशांत आत्महत्या प्रकरण | अखेर मुंबई पोलीस आयुक्तांचं 'ते' विधान सत्य ठरलं
अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणाचा गेल्या 3 महिन्यांपासून तपास सुरू आहे. सुशांतने आत्महत्या केली की हत्या? या प्रश्नभोवती गेल्या तीन महिन्यापासून मुंबई पोलीस आणि नंतर सीबीआयने तपास केला. पण, आता AIIMS हॉस्पिटलच्या रिपोर्टमध्ये या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुशांतप्रकरणी CBIने काय दिले लावले | शरद पवारांचा संतप्त सवाल
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणावरून मुंबई पोलीस आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप करण्यात आले. तसंच नंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. मात्र अद्याप या आत्महत्या प्रकरणाच्या तपास पूर्णत्वास आला नसल्याने टीका करण्यात येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जोरदार हल्लाबोल केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुशांतसिंहची हत्या की आत्महत्या | AIIMS ने CBI कडे सोपवला रिपोर्ट
सुशांतसिंह राजपूत प्रकरणी एम्सने सीबीआयकडे अहवाल सादर केला आहे. सीबीआयनेही एम्सच्या अहवालाचे विश्लेषण सुरू केलं आहे. सुशांतची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली? यावरून सीबीआय निष्कर्ष काढणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुशांतच्या वकिलांना मुंबई पोलिसांचं महत्व पटलं? | CBI व बिहार पोलिसांबाबत वक्तव्य
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय, एनसीबी आणि ईडीसारख्या राष्ट्रीय संस्था तपास करताना अद्यापही सुशांतच्या मृत्यूचं कारण स्पष्ट झालं नाही, सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर संशय घेतला, तिला अटक झाली असली तरी सुशांत प्रकरणाशी अजून खुलासा झाला नाही, सुशांत सिंह राजपूत प्रकरण आता सीबीआयसाठी प्राधान्य राहिलं नाही असा दावा सुशांत सिंह राजपूतच्या वकिलांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुशांत प्रकरण | CFSL अहवालानंतर विरोधक तोंडघशी पडणार? | सविस्तर वृत्त
अभिनेता सुशांत सिंह राजयूत याच्या मृत्युप्रकरणी गेल्या तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं आणि महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापवण्याचा मोठा प्रयत्न केला गेला. जस्टीस फॉर सुशांत प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं आणि त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय स्थिती अजूनच तापल्याचं पाहायला मिळालं.
4 वर्षांपूर्वी -
नारायण राणेंच्या दाव्याला प्रत्यक्षदर्शीचा दुजोरा | पार्टीत दिशावर सामूहिक बलात्कार झाला
अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणी एका प्रत्यक्षदर्शीने मोठा खुलासा केला आहे. दिशाच्या मृत्यूच्या दिवशी पार्टीमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा खुलासा प्रत्यक्षदर्शीने ‘न्यूज नेशन’ या वृत्तवाहिनीकडे केला. त्या पार्टीमध्ये बॉलिवूडमधला एक स्टारसुद्धा उपस्थित होता, असंही त्याने सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
दिशाच्या लिव्ह इन पार्टनरचा जबाब महत्त्वाचा | नितेश राणेंच अमित शहांना पत्र
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं आत्महत्या करून तीन महिने उलटले आहेत. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. पुढील आठवड्यात सुशांतची व्हिसेरा रिपोर्ट समोर येणार आहे. या दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी दावा केला आहे. दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा थेट संबंध असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. या संदर्भात नितेश राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
केजे एनसीबी'च्या ताब्यात | रियासहित बॉलीवूडमधील मोठे मासे अडचणीत येणार
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन पुढे आल्यानंतर सुशांतची गर्लफ्रेण्ड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली. त्यानंतर रियाच्या तपासात या प्रकरणात अनेक महत्त्वाचे धागेदोरे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) हाती लागले असून त्याआधारे आज आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. ड्रग्ज कनेक्शनमध्ये एक बडा मासा एनसीबीच्या गळाला लागला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुशांतसिंह राजपूत जिवंत असता, तर तुरुंगात असता का | तापसी पन्नूचा सवाल
आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिने रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर पुन्हा खळबळ उडवून देणारं ट्वीट केलं आहे. “अभिनेता सुशांतसिंह राजपूत जर जिवंत असता, तर तोही तुरुंगात असता का?” असा सवाल तापसीने ड्रग्ज कनेक्शनच्या अनुषंगाने उपस्थित केला.
4 वर्षांपूर्वी -
सुशांतच्या घरी सेलिब्रिटींच्या ड्रग्स पार्टी रंगायच्या | दीपेश सावंत व सॅम्युअलच्या संयुक्त चौकशीत उघड
मागील 6 दिवसात एनसीबीने 9 जणांना अटक केली आहे. 9 पैकी 3 जणांना जामीन मंजूर झाला आहे. रिया आणि शोविकच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये बर्ड्स आणि डुब्ज हे ड्रग्ज तस्करीत वापरल्या जाणाऱ्या सांकेतिक शब्दांचा वापर केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच एनसीबीने यांच्याभोवतीचा फास आवळला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो