Video Viral | जाम झालेले ट्रॅफिक स्विगी डिलिव्हरी बॉयने केले रिकामे, सामाजिक कर्तव्य बजावल्याने नेटिझन्सकडून कौतुक
Swiggy Delivery Boy Video Viral | मोठ मोठ्या शहरांमध्ये ट्रॅफिक होणं म्हणजे लोकांच्या अंगवळणी पडलेल्या गोष्टी आहेत. मात्र ज्या लोकांना 24 तास काम असते अशा लोकांसाठी या गोष्टी पचनी पडत नाहीत. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे या व्हिडीओमध्ये न दिसणारे अनोखे चित्र दिसून येत आहे. एक स्विगी डिलिव्हरी एजंट ट्रॅफिक पोलिसाची भूमिका बजावत आहे आणि त्याने 30 मिनिटांची वाहतूक कोंडी दूर केली आहे. या कृत्यामुळे त्याने लोकांची मने झिंकली आहेत आणि लोक त्याचे भरभरून कौतुक करत आहेत. दरम्यान, सोशल मीडिया वापरकर्ता श्रीजीत नायरने लिंक्डइनवर हा व्हिडिओ शेअर केला असून तुम्ही यामध्ये पाहू शकता की, स्विगी डिलिव्हरी एजंट अवजड वाहनचालकांना रहदारीचा सामना करण्यासाठी मदत करत आहे. तसेच त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.दरम्यान, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, स्विगी ग्राहकांसाठी खाद्यपदार्थ डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीने रस्त्यावरचे ट्रॅफिक दूर करण्यासाठी आपला वेळ दिला आहे.
2 वर्षांपूर्वी