महत्वाच्या बातम्या
-
पंजशीरमध्ये 600 तालिबानी मारले गेले | तालिबानला ISI चालवतेय | अमरुल्लाह सालेहचा आरोप
पंजशीरमध्ये तालिबान आणि रेजिस्टेंस फोर्स यांच्यातील लढाई सुरूच आहे. दरम्यान, रेजिस्टेंस दलाने दावा केला आहे की, त्यांनी 600 तालिबान मारले आणि 1000 तालिबान एकतर आत्मसमर्पण केले किंवा शनिवारी पकडले गेले. अल जझीराच्या एका अहवालात म्हटले आहे की तालिबानने सांगितले की, ते पंजशीरची राजधानी बझारक आणि प्रांतीय गव्हर्नर कंपाऊंडकडे जाणाऱ्या रस्त्यांवर लँडमाईन्समुळे पुढे जाऊ शकले नाहीत.
3 वर्षांपूर्वी -
भारताची तालिबानबरोबर चर्चा | कतारमध्ये घेतली भेट
अफगाणिस्तानवर तालिबानने नियंत्रण मिळविल्यानंतर भारताने प्रथमच या संघटनेच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. दोहा येथे भारताच्या राजदूतांनी तालिबान नेत्यांची भेट घेतली असून अफगाणिस्तानच्या हद्दीतून दहशतवाद्यांना दिल्या जात असलेल्या शरणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. भारतीय राजदूतांनी कतारची राजधानी दोहा येथे तालिबान नेत्याशी चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, युद्धग्रस्त अफगाणिस्तानच्या नवीन राज्यकर्त्यांच्या विनंतीवरुन ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
3 वर्षांपूर्वी -
अमेरिकेकडून ISIS च्या ठिकाणांवर ड्रोनने हवाई हल्ला | काबूल स्फोटांचा मास्टरमाईंड ठार
अमेरिकेने ड्रोनच्या सहाय्याने अफगाणिस्तानातील इसिस (ISIS) च्या ठिकाणांवर हल्ला केला आहे. अमेरिकेने पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतात हा हवाई हल्ला केला आहे. काबूल विमानतळावरील स्फोटांचा मुख्य सूत्रधार इसिसच्या खुरासन गटाच्या एका दहशतवाद्याला ठार मारल्याचा दावाही केला जात आहे. त्याचबरोबर अमेरिकेने आपल्या नागरिकांना ताबडतोब काबूल विमानतळ सोडण्यास सांगितले आहे.
3 वर्षांपूर्वी -
अफगाणिस्तानच्या माजी IT मंत्र्यावर जर्मनीमध्ये पिझ्झा डिलिव्हरीची वेळ | फोटो व्हायरल
अफगाणिस्तानचे माजी IT मंत्री सय्यद अहमद शाह सादत जर्मनीमध्ये पिझ्झा विकत आहेत. पिझ्झा कंपनीचा ड्रेस परिधान करून ते जर्मनीच्या लाइपझिग शहरात सायकलवर पिझ्झा डिलिव्हर करत आहेत. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्याबरोबर ते देश सोडून जर्मनीला गेले होते. आयटी मंत्री असताना त्यांनी अफगाणिस्तानमध्ये सेलफोन नेटवर्कला प्रोत्साहन दिले होते.
3 वर्षांपूर्वी -
अफगाण लोक नेमकी कशाची खरेदी करतायत? | पगडी, हिजाब खरेदीसाठी दुकानात गर्दी
अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा काळ सुरु झाला आहे. तालिबानचे सरकार सत्तेवर आलेले नाही.अमेरिकेचा शेवटचा सैनिक अफगाणिस्तान सोडत नाही तोपर्यंत सरकार स्थापन करणार नाही, असे तालिबाननं जाहीर केल आहे. दुसरीकडे तालिबानच्या दहशतीमुळे अफगाणी नागरिकांनी पगडी आणि हिजाब खरेदीसाठी दुकानात गर्दी केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | अफगान योद्ध्यांकडून तालिबानला तालिबानी पद्धतीने उत्तर | थेट बॉम्बने | पण सत्य काय?
अजिंक्य असलेला पंजशीर ताब्यात घेण्यासाठी तालिबानने दहशतवादी पाठविले आहेत. रशियाच्या सैन्याला, त्यानंतर तालिबानलाही ताब्यात न घेता आलेल्या अवघड आणि योद्ध्यांच्या पराक्रमाने भारलेला हा भाग तालिबानला नडला आहे. पंजशीरला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या 300 दहशतवाद्यांना अफगान योद्ध्यांनी ठार केले आहे. या दाव्यानंतर तालिबानने असे घडलेच नसल्याचे म्हणत वृत्त फेटाळले. यामुळे अफगान योद्ध्यांनी तालिबानी दहशतवाद्यांची काय हालत केली, याचा व्हिडीओ व्हायरल केल्याचं म्हटलं जातंय.
3 वर्षांपूर्वी -
अफगाणिस्तानात आता तालिबानवर दुहेरी हल्ला | शेकडो अतिरेक्यांचा खात्मा | ३ जिल्हे ताब्यातून गेले
अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानला पहिल्यांदाच एका आव्हानाला सामोरे जावे लागले आहे. बागलाण प्रांतात तालिबानवर हल्ला करण्यात आला होता, ज्यामध्ये ३०० तालिबानी लढाऊ ठार झाले होते. त्याचवेळी, उत्तर अफगाणिस्तानच्या बागलाण प्रांतातील स्थानिक स्त्रोतांनी शनिवारी टोटो न्यूजला माहिती दिली की स्थानिक बंडखोरांनी तालिबानच्या ताब्यातून तीन जिल्हे परत घेतले आहेत. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचे वृत्त असल्याचे स्थानिक माध्यमांनी सांगितले.
3 वर्षांपूर्वी -
काबुल विमानतळ | क्रूर तालिबान्यांच्या हद्दीत अमेरिकन सैनिकांकडून अफगाणी चिमूकल्यांचा सांभाळ
अफगाणिस्तानाचा तालिबान्यांनी ताबा घेताच परिस्थिती नियत्रंणाबाहेर गेली आहे. काबूल विमानतळावरुन चित्तथरारक फोटो समोर येत आहे. दरम्यान, विमानात जेथे जागा मिळेल तेथे बसून लोक प्रवास करत आहे. आतापर्यंत यामध्ये 5 पेक्षा जास्त लोकांचा विमानातून पडून मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे काबूल विमानतळावर सध्याही अमेरिकन सैन्यांचा पहारा आहे.
3 वर्षांपूर्वी -
तालिबानकडून काबूल विमानतळावरुन भारतीयांसह अनेक प्रवाशांचं अपहरण | काय म्हटलं तालिबानने
तालिबानने काबूल विमानतळावरुन काही प्रवाशांचं अपहरण केल्याचं वृत्त अफगाणिस्तानातील मीडियाने दिलं आहे. यामध्ये काही भारतीयांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. ANI ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. मात्र याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. भारत सरकारने याबाबत अधिकृत काहीही माहिती दिलेली नाही. काबूलमधील हामीद करजई इंटरनॅशनल एअरपोर्टरजवळूनच या नागरिकांचं अपहरण करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
3 वर्षांपूर्वी -
अफगाणिस्तानमध्ये दडलीय 74 लाख कोटींची साधन संपत्ती | तर अफगाणिस्तान होऊ शकतो सर्वात श्रीमंत देश
जगातील सर्वात गरीब राष्ट्रांपैकी एक म्हणून अफगाणिस्तानला कमी लेखले जात असले तरी प्रत्यक्षात या ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्तीचे भांडार आहेत. या देशात एक ट्रिलियन डॉलर अर्थात तब्बल 74.37 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त साधन संपत्ती आहे. 2010 मध्ये अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांनी एका सर्व्हेमध्ये याचा खुलासा केला होता.
3 वर्षांपूर्वी -
Afghani Hazara Community Girls | अफगाणी हजारा समाजाच्या मुली दहशतीखाली | तालिबान्यांकडून जबरदस्तीने लग्न
तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी महिलांच्या हक्कांचा आदर करण्याचे वचन दिले होते. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत त्यांचं महिलांविरोधी धोरण समोर आलंय. काबूलमधील शर-ए-नॉ येथील ब्यूटी सलूनबाहेरचे महिलांचे स्प्रे-पेंट केलेले फोटो हटवण्यात आले आहेत. या संदर्भातील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | Afghanistan women crying | आम्हाला तालिबानींपासून वाचवा, अफगाणी महिलांचा आक्रोश
तालिबानची सत्ता आल्यापासून जनतेत प्रचंड दहशत आहे. लाखो लोकांना देश सोडायचा आहे. तालिबाननं अफगाणी नागरिकांना सुरक्षेचं वचन दिलं आहे. मात्र नागरिकांचा त्यांच्या शब्दावर विश्वास नाही. कोणत्याही मार्गानं देशाबाहेर पडण्याचा प्रयत्न नागरिकांकडून सुरू आहे. काबुलच्या विमानतळावरील गर्दी कायम आहे. दिवसागणिक गर्दी वाढत आहे. याच गर्दीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
अनेकांना प्रश्न | तालिबान्यांच्या कब्जानंतर आता भविष्यात अफगाणिस्तानात नेमकं काय होणार? - वाचा सविस्तर
अमेरिका आणि नाटोच्या फौजा तब्बल २० वर्षांच्या मुक्कामानंतर अफगाणिस्तानमधून बाहेर पडल्या. त्यानंतर तालिबाननं अख्खा अफगाणिस्तानच आपल्या बंदुकीच्या दहशतीखाली आणला आहे. अनेक नागरीकांनी देश सोडला आहे. राष्ट्रपतींसह अनेक राजकीय नेते देशातून पळून गेले आहेत. दरम्यान, तालिबान्यांनी देशावर पूर्णपणे नियंत्रण ठेवले आहे. रविवारी रात्री राजधानी काबूल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने मंगळवारी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्यासाठी सांगितले आहे.
3 वर्षांपूर्वी -
तालिबान दहशतवादी संघटनेजवळ एवढा पैसा येतो कोठून? | असा उभा केला जातो पैसा
तालिबानने रविवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूलवरही कब्जा केला. अफगाणिस्तानमध्ये अराजकाता निर्माण झाली असून तालिबानी सरकार आले आहे. तालिबानच्या ताब्यात अफगाणिस्तान गेल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण तयार झालंय. तालिबानच्या जुलमी राजवटीत राहण्यापेक्षा देश सोडण्याचा विचार करत आहेत. काबूलमधून बाहेर जाणाऱ्या विमानांमध्ये बसण्यासाठी नागरिकांची झुंबंड उडाली आहेजो तो देश सोडण्यासाठी प्रयत्न करतोय. विमानतळावरील अफगाण नागिराकांची प्रचंड गर्दी झाल्यानं अमेरिकन लष्करानं हवेत गोळीबार केल्याचं समोर आलंय. अमेरिकेच्या लष्करानं केलेल्या गोळीबारामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, अमेरिकेनं काबूल विमानतळाचा ताबा घेतला आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | तालिबान्यांसमोर अफगाणि सैनिक झुकले, पुरुष पळाले | पण महिला अजुनही तालिबान्यांविरोधात भिडत आहेत
तालिबानने रविवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूलवरही कब्जा केला. यामुळे आता संपूर्ण देशावर तालिबान्यांचे नियंत्रण आहे. 3 लाख अफगाण सैनिक तालिबानपुढे झुकले आहेत मात्र काही महिलांना अजुनही त्यांची राजवट मंजूर नाही. अफगाणिस्तानवर तालिबानच्या ताब्याच्या तिसऱ्या दिवशी देखील 5 महिला काबूलमध्ये निषेध करताना दिसल्या. समोर सशस्त्र सेनानी होते, जे महिलांना घरी जाण्यास सांगत राहिले.
3 वर्षांपूर्वी -
तालिबान्यांना भिडणारी वाघिण तालिबान्यांच्या ताब्यात | महिला अत्याचारांना सुरुवात? | कोण होती सलीमा मजारी?
अफगाणिस्तानातील पहिल्या महिला राज्यपालांपैकी एक, सलीमा मजारी इतर अनेक राजकीय नेत्यांप्रमाणे देश सोडून पळून गेली नाही. चाहर किंट जिल्ह्यातील बाल्ख प्रांताच्या शरणागतीपर्यंत ती लढत राहिली. तिने तालिबानशी लढण्यासाठी शस्त्र घेण्याचा निर्णय घेतला. तिला आता तालिबान्यांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तिच्या सद्यस्थितीबद्दल कोणतीही माहिती नाही.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | तालिबानमधून पळण्यासाठी विमानाच्या पंखावर बसून प्रवासाचा LIVE थरार | पहा काय घडलं
अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तेथील परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. तेथील परिस्थिती दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अफगाणी नागरिक एका चालत्या विमानाच्या पंखांवर बसलेले दिसत आहे. या गर्दीतील एका व्यक्तीनं आपल्या फोनवर हा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय. देश सोडण्यासाठी नागरिक आपला जीव धोक्यात घालत असल्याचं या व्हिडिओतून दिसत आहे. दरम्यान, या व्हिडिओतील लोकांचं पुढे काय झालं, याची माहिती मिळू शकली नाही.
3 वर्षांपूर्वी -
तालिबानची पहिली पत्रकार परिषद | महिलांबाबत महत्वाचं वक्तव्य - काय म्हणाले?
तालिबानने काबुलवर ताबा मिळवल्यावर त्यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी काबुल मध्ये कोणते नवीन नियम लागू करणार या बाबत माहिती दिली आहे. पहिल्या अधिकृत पत्रकार परिषदेत इस्लामिक कायद्याच्या मर्यादेत महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचे वचन दिले. तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद म्हणाले की, महिलांच्या हक्कांचे संरक्षण इस्लामिक कायद्याच्या मर्यादेत केले जातील. महिलांनीही सरकारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. त्यांनी देशातील लोकांमध्ये असलेले भीतीचे वातावरण कमी करण्यासाठी ही घोषणा केली होती.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | क्रूर तालिबानी महिलांना पळवून नेत आहेत | तर विमानतळावर जाणाऱ्या नागरिकांवर थेट गोळीबार
तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यामुळे भारतात राहणाऱ्या शेकडो अफगाणी नागरिकांची काळजी वाढली आहे. चंदीगडमध्ये वास्तव्यास असलेल्या काही अफगाणी नागरिकांशी संवाद साधला असता त्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या. तालिबानी महिलांना घरातून पळवून नेत आहेत. महिलांच्या स्वातंत्र्याला धोका निर्माण झाला आहे, अशा प्रतिक्रिया अनेकांनी नोंदविल्या. विमानांत माणसं कोंबून स्थलांतर करत असल्याची भयंकर परिस्थिती अफगाणिस्तानात निर्माण झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
खतरो के खिलाडी । अमेरिकन विमानातून अफगाणी नागरिकांचा मुंबई लोकल ट्रेन प्रमाणे प्रवास - पहा फोटो
तालिबान्यांनी सत्ता ताब्यात घेतल्यानंतर अफगाणिस्तानच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. यामुळे हजारो लोक देश सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. यासाठी त्यांनी लोखंडी कुंपण आणि मोठ्या भिंतींवरुन उड्या मारल्या आणि काबूल विमानतळावर शिरकाव केला. लोकांनी भीतीपोटी तेथे दिसणाऱ्या कोणत्याही विमानात चढण्याचा प्रयत्न केला. विमानतळावरील अशी अनेक दृष्ये तेथी उद्भवलेल्या परिस्थीतीचे भयावह दर्शन घडवत आहेत.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH