महत्वाच्या बातम्या
-
भारताने अफगाणिस्तानाच्या विकाससाठी पैसा दिला । करोडोचे नुकसान । तालिबानमुळे चीन-पाकिस्तानच्या प्रभावाखाली
तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. याचा थेट परिणाम भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील व्यापारावर होईल. याचे मुख्य कारण म्हणजे भारत सरकार तालिबानला मान्यता देत नाही. तर भारत आणि अफगाणिस्तान सरकारचे एकमेकांशी चांगले संबंध होते. भारत ही दक्षिण आशियातील अफगाण उत्पादनांची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. भारताने अफगाणिस्तानमध्ये सुमारे 3 अब्ज डॉलर्स (22,251 कोटी रुपये) गुंतवले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
तालिबान राजवट | भाजप प्रवक्त्यांकडून 'मोदी' मार्केटिंग सुरु | म्हणाल्या, तर मोदीजी तालिबानची...
अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांचे सरकार कोसळले असून तालिबानने काबूलचा ताबा घेतला आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी युद्धग्रस्त देश ताब्यात घेतला आहे. तालिबानी दहशतवादी रविवारी काबूलमध्ये घुसले व त्यानंतर घनी यांचे सरकार कोसळले. त्यामुळे घनी यांच्यासह नागरिक व परदेशी व्यक्ती यांना देश सोडावा लागला. त्यामुळे अफगाणिस्तानातील बहुतांश दूतावास रिकामे करण्यात आले असून तेथील नागरिक आणि कर्मचाऱ्यांना परत नेण्यासाठी अनेक देशांनी काबूल विमानतळावर विमाने पाठवली आहेत.
3 वर्षांपूर्वी -
अफगाणच्या क्रूर तालिबानी राजवटीला भारताचा परम मित्र रशियाचाही पाठिंबा | भारत कात्रीत सापडला?
अपेक्षेप्रमाणे तालिबानी दहशतवाद्यांनी राजधानी काबूलवर कब्जा केला आहे. साधारण १५ ते २० दिवसांच्या आतच अफगाणी सैन्याचा पाडाव झाला. राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी लाखो अफगाणी नागरिकांना शब्दश: वाऱ्यावर सोडून देशातून परागंदा झाले आहेत. आता मुल्ला अब्दुल गनी बरादर या तालिबानी प्रमुखालाच राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित केले जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती पॅलेस ताब्यात घेतल्यावर तालिबान्यांनी तिथे जंगी ‘दावत’ केली. ही दावत यादवी आणि तालिबानच्या माथेफिरू राजवटीच्या या दुसऱ्या अध्यायाची सुरुवात आहे.
3 वर्षांपूर्वी -
क्रूर तालिबानी राजवटीपासून जगण्याची धडपड | अफगाणिस्तानमध्ये अजुनही भारतीय नागरिक अडकले
अफगाणिस्तानच्या राजधानीत अजुनही भारतीय नागरिक अडकले आहेत. भारताकडून त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, त्या ठिकाणी असलेल्या गैरव्यवस्थापनावर ते नाराज आहेत. अशात सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय नागरिक आपला रोष व्यक्त करत आहेत. त्यातील एकाने सांगितले, की आमचे कुणीही ऐकत नाही. फ्लाइट कधी येणार माहिती नाही. कुणी फोन सुद्धा उचलायला तयार नाही. बाहेर पाहा, गोळीबार सुरू आहे.
3 वर्षांपूर्वी -
अफगाणिस्तानमध्ये पुन्हा अंधकारमय दिवस येण्याची भीती | संयुक्त राष्ट्रसंघाची आपत्कालीन बैठक
संयुक्त राष्ट्रसंघाच्या आपत्कालीन सुरक्षा परिषदेची बैठक झाली. या परिषेदेचे महासचिव अॅन्टिनिओ गटेरर्स म्हणाले, की अफगाणिस्तानच्या सर्व सीमांवर नियंत्रण ठेवावे. विविध प्रातांमधून लोकांना स्थलांतरण करावे लागल्याने काबूलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. लोकांना असुरक्षित वाटू लागले आहे. सर्व पक्षांनी नियमांचे पालन करून नागरिकांच्या हितांचे संरक्षण करावे, अशी गटेर्रस यांनी विनंती केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
आता भारताने भूमिका बदलावी | कारण दोन्ही देशांसाठी हेच फायद्याचं ठरेल - तालिबान प्रवक्ते
अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबान्यांनी हिब्तुल्लाह अखुंदझादाला नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले आहे. त्यालाच तालिबानने आमिर अल मोमिनीन असे संबोधले आहे. हिब्तुल्लाह या अरबी शब्दाचा अर्थ ईश्वरीय वरदान असा होता. पण, अफगाणिस्तानच्या नवीन राष्ट्राध्यक्ष पदाचा दावेदार हिब्तुल्लाह अखुंदझादा अतिशय क्रूर असा तालिबानी कमांडर आहे. एकेकाळी त्यानेच हत्या आणि अनैतिक संबंध ठेवणाऱ्यांना ठार मारण्याचे फतवे काढले आहेत. एवढेच नव्हे, तर चोरी केल्यास हात कापण्याचे आदेश सुद्धा त्याने दिले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
कुप्रसिद्ध हिब्तुल्लाह अखुंदझादाला अफगानचा नवा राष्ट्राध्यक्ष | पाकिस्तानचा पाठिंबा, चीनचा मैत्रीसाठी हात | भारतासाठी धोक्याची....
अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबान्यांनी हिब्तुल्लाह अखुंदझादाला नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले आहे. त्यालाच तालिबानने आमिर अल मोमिनीन असे संबोधले आहे. हिब्तुल्लाह या अरबी शब्दाचा अर्थ ईश्वरीय वरदान असा होता. पण, अफगाणिस्तानच्या नवीन राष्ट्राध्यक्ष पदाचा दावेदार हिब्तुल्लाह अखुंदझादा अतिशय क्रूर असा तालिबानी कमांडर आहे. एकेकाळी त्यानेच हत्या आणि अनैतिक संबंध ठेवणाऱ्यांना ठार मारण्याचे फतवे काढले आहेत. एवढेच नव्हे, तर चोरी केल्यास हात कापण्याचे आदेश सुद्धा त्याने दिले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | तालिबानराजची लोकांमध्ये दहशत | विमानतळाचा बस स्टँड झाला | विमानावर बसून प्रवास | उड्डाण घेतल्यावर..
तालिबानने अफगाणिस्तानच्या राजधानीवरच नव्हे, तर राष्ट्रपती भवनावर सुद्धा ताबा मिळवला आहे. आता हेच तालिबानी सरकार स्थापनेच्या हालचाली करत आहेत. राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी आणि उपराष्ट्राध्यक्ष अमीरुल्लाह सालेह देश देश सोडून पसार झाले. परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत असल्याने लोक लाखोंच्या संख्येने पलायन करत आहेत. तर विमानतळावर अशी हजारोंची गर्दी पाहायला मिळत आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | तालिबानच्या तावडीतून एअर इंडियाचं विमान कसंबसं सुटलं | काबुल विमानतळावर हौदोस
अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सरकार स्थापन होणार आहे. भीतीच्या या वातावरणातून एअर इंडियाने काबूलमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप परत आणले आहे. एअर इंडियाचे एक विमान रविवारी संध्याकाळी काबूलमधील भारतीयांसह दिल्लीला रवाना झाले होते.
3 वर्षांपूर्वी -
अफगाणिस्तानात तालिबानी राज | राष्ट्रपती अशरफ गनी आणि उपराष्ट्रपती सालेह देश सोडून पळाले
अफगाणिस्तान आता पूर्णपणे तालिबानच्या ताब्यात आले आहे. तालिबान रविवारी काबूलमध्ये दाखल होताच अफगाणिस्तान सरकारने त्यांच्याशी करार करण्यास सहमती दर्शविली आहे. अफगाणिस्तान सरकारचे म्हणणे आहे की काबूलवर हल्ला न करण्यावरुन करार झाला आहे. तालिबान काबूलवर हल्ला करणार नाही. त्याचवेळी, तालिबानने असेही म्हटले आहे की त्यांना शांततेने हस्तांतरण हवे आहे. अफगाणिस्तानचे कार्यवाहक गृहमंत्री अब्दुल सत्तार मीरजकवाल यांनी एक निवेदन जारी केले आहे की तालिबान काबूलवर हल्ला करणार नाही. शांततेत हस्तांतरण होईल.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: TATAMOTORS
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- House Rent | पगारदारांनो, कमी पगार आणि त्यामुळे बचती कमी होतेय, मग या टिप्स फॉलो करा, होईल मोठी बचत - Marathi News
- CIBIL Score | तुमच्याकडे सुद्धा एकापेक्षा अधिक पॅन कार्ड आहेत मग, तुमच्या क्रेडिट स्कोरवर होणार हा परिणाम - Marathi News
- NHPC Share Price | पीएसयू NHPC शेअरबाबत CLSA ब्रोकरेज फर्मचा फायद्याचा रिपोर्ट, शेअर रॉकेट होणार - NSE: NHPC