Tax on Saving Schemes | या आहेत पोस्ट ऑफिसच्या अनेक बचत योजना, गुंतवणूक करा, पैसा वाढवा आणि टॅक्स सूट मिळवा
आपण गुंतवणूक करताना नेहमी काही चुका करतो पण त्या चुका जर टाळल्या तर आपण गुंतवणुकीचा जबरदस्त फायदा घेऊ शकतो. नेहमी गुंतवणूक करताना दोन गोष्टींची काळजी घ्या. गुंतवणुकीचा पर्याय तुम्हाला महागाई दरापेक्षा जास्त परतावा देतो आहे की नाही. उदाहरणार्थ, जर महागाईचा दर 7 टक्के असेल तर तुम्हाला गुंतवणुकीतून त्यापेक्षा जास्त परतावा मिळतो आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे. दुसरे म्हणजे, रिटर्नवरील कर दायित्व जास्त नसावे. करांमुळे तुमचा परतावा कमी होतो. लहान बचत योजनामध्ये मोठ्या संख्येने लोक गुंतवणूक करून पैसे बचत करतात. परंतु रिटर्नवर किती कर आकारला जातो हे आपल्याला माहित नसते. आज आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देत आहोत.
3 वर्षांपूर्वी