TCS Work from Home to End | टीसीएसने केली 'वर्क फ्रॉम होम' बंदची घोषणा | ऑफिसला जावं लागणार
देशातील बलाढ्य टाटा कंन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीनं कर्मचाऱ्यांचं ‘वर्क फ्रॉम होम’ पूर्णपणे बंद करत असल्याची घोषणा केली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवण्याची तयारी देखील कंपनीनं सुरू केली आहे. कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांचं कार्यालयीन काम पु्न्हा एकदा सुरू करणार असल्याची घोषणा टीसीएसनं केली आहे. लवकरच सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे देशातील जवळपास सर्वच आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम सुविधा सुरू केली होती.
3 वर्षांपूर्वी