Tega Industries Share Price | टेगा इंडस्ट्रीज शेअरने 1 वर्षात 115% परतावा दिला, तर मागील 1 महिन्यात 31% परतावा दिला, डिटेल्स पहा
Tega Industries Share Price | टेगा इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. टेगा इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 925.60 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत स्पर्श केली होती. यानंतर प्रॉफिट बुकींग मुळे स्टॉक 1.79 टक्के घसरणीसह 883.70 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मार्च 2023 तिमाहीतील जबरदस्त कामगिरीमुळे टेगा इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स तेजीत आले होते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टेगा इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर 10 टक्क्यांच्या वाढीसह 899.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 818.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.44 टक्के घसरणीसह 869.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी