Toyam Sports Share Price | मागील 3 वर्षात 260% परतावा देणारा टोयम स्पोर्ट्स शेअर पुढे मोठा परतावा देऊ शकतो, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
Toyam Sports Share Price | सध्या जर तुम्ही गुंतवणुकीसाठी चांगला शेअर शोधत असाल, तर तुम्ही टोयम स्पोर्ट्स कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकता. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. टोयाम स्पोर्ट्स ही मुख्यतः क्रीडा उत्पादन, जाहिरात आणि व्यवस्थापन संबंधित व्यवसाय करणारी कंपनी आहे. टोयम स्पोर्ट्स या कंपनीने MMA मध्ये यशस्वी Kumite-1 लीगचे यशस्वी आयोजन केले होते. आणि केनिया, मॉरिशस आणि ग्रीसमधील क्रिकेट लीगचे हक्क देखील मिळवले होते. मागील आठवड्यात.शुक्रवारी टोयम स्पोर्ट्स कंपनीचे शेअर्स 1.29 टक्क्यांच्या घसरणीसह 9,98 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे बाजार भांडवल 561.36 कोटी रुपये आहे. आज गुरूवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी टोयम स्पोर्ट्स कंपनीचे शेअर्स 0.80 टक्के घसरणीसह 9.92 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी