TRAI Tariff Order | बापरे! तुमची केबल आणि डीटीएचची बिले 30 टक्के महागणार, सामान्य लोकांना महागाईत फटका
TRAI Tariff Order | टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटीने (ट्राय) टीव्ही चॅनल्सच्या किमतीबाबत नवा टॅरिफ ऑर्डर दिला आहे. हा आदेश १ फेब्रुवारीपासून सर्व डीटीएच आणि केबल ऑपरेटर्सना लागू होणार आहे. ट्रायच्या या आदेशाच्या अंमलबजावणीमुळे सर्व ग्राहकांना आपले खिसे मोकळे करावे लागणार आहेत. 1 फेब्रुवारीनंतर डीटीएच आणि केबलच्या बिलात 30 टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, ओटीटी चॅनेल वाढल्यानंतर केबल ऑपरेटर्सचे ग्राहक कमी झाले असून ट्रायच्या ताज्या ट्रॅफिक ऑर्डरमध्ये आणखी वाढ होण्याची भीती ऑपरेटर्सना वाटत आहे.
2 वर्षांपूर्वी