Triveni Engineering Share Price | मागील 5 दिवसात त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स तेजीत, नेमके कारण काय?
Triveni Engineering Share Price | आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने 74 टक्के वाढीसह 190.31 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. तर मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत कंपनीने 109.17 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मार्च 2023 च्या तिमाहीत त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने 1,839.86 कोटी रुपये कमाई केली होती. तर मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 1,195.08 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आज सोमवार दिनांक 29 मे 2023 रोजी त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.55 टक्के वाढीसह 278.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी