Twitter Elon Musk | ट्विटरकडे सरकारच्या आदेशचं पालन करण्याशिवाय पर्याय नसतो, आम्ही तसं न केल्यास ट्विटर बंद केलं जाईल - एलन मस्क
Twitter Elon Musk | ट्विटरचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांनी शेतकरी आंदोलना दरम्यान मोदी सरकारला विरोध करणारे ट्विटर अकाउंट बंद करण्यासाठी मोदी सरकारकडून दबाव आणल्याचा दावा केला होता. या दाव्यावर टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले की, ट्विटरला स्थानिक सरकारच्या आदेशाचे पालन करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे स्थानिक सरकारचे आदेश पाळले नाहीत तर ट्विटर बंद केलं जाऊ शकतं असं एलोन मस्क यांनी म्हटले आहे.
2 वर्षांपूर्वी