Twitter Gray Tick | ट्विटरवर ब्लू नाही तर ग्रे-टिक होणार अधिकृत अकाऊंटची ओळख, कोणाला मिळणार?
Twitter Gray Tick | ट्विटरचं अधिग्रहण झाल्यापासून रोज नवनवीन बातम्या माध्यमांमध्ये पसरत आहेत. नवीन मालक एलन मस्क यांनी सर्वप्रथम जाहीर केले की सर्व वापरकर्त्यांना दरमहा 8 डॉलर द्यावे लागतील. म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये सुमारे 650 रुपये मोजावे लागतील. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 5 देशांमध्ये आयओएस युजर्ससाठी ट्विटर ब्लू टिकची सब्सक्रिप्शन सेवा सुरू झाली आहे. येत्या काळात भारतासह काही देशांमध्ये ही सेवा सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत अधिकारी, राजकारणी, पत्रकार आणि मीडिया हाऊसेस यांची खाती वेगळी करण्यासाठी ट्विटरने ‘ग्रे’ टिक देण्याची तयारी सुरू केली आहे.
2 वर्षांपूर्वी