महत्वाच्या बातम्या
-
Udayanraje Bhosale On ED | कारवाई करणार असाल तर ED'ने यावं, अन्यथा येऊ नये - उदयनराजे
राज्यात मागील काही दिवसांपासून ED, आयकर विभाग आणि CBI अशा विविध संस्थांकडून राजकीय विरोधक व्यक्तींच्या विरोधात कारवाई केल्या जात आहेत. सदर कारवाईत महाराष्ट्र केंद्रस्थानी ठेवण्यात आला असून त्यात सत्ता गेल्याची आग भाजप नेत्यांच्या (Udayanraje Bhosale On ED) मनात अजून फेटत आहे.
3 वर्षांपूर्वी -
साताऱ्यात भाजप खासदार विरुद्ध भाजप आमदार | 'ते' थापांचा पाऊस पाडण्यात माहीर | उदयनराजेंवर जोरदार टीका
मागील साडेचार वर्षांत सत्ताधाऱ्यांनी पालिकेला फक्त लुटण्याचे काम केले. आता निवडणूक जवळ आल्याने विकासकामांचा पाऊस भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्ताधारी थापांचा पाऊस पाडण्यात माहीर असले तरी हा केवळ निवडणुकीचा मोसमी पाऊस आहे. त्यामुळे पालिकेतील ‘कचरा’ हळूहळू हद्दपार करण्याची वेळ जवळ आली आहे, असा उपरोधिक टोला भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला आहे.
3 वर्षांपूर्वी -
'राजेंचा' केवळ राजकीय वापर? | संभाजीराजेंना भेट मिळत नाहीत, तर उदयनराजेंना मंत्रिमंडळात स्थानच नाही
केंद्रीय मंत्रिमंडळाची नावं अखेरीस जाहीर झाले आहेत. मोदी सरकारच्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आज (७ जुलै) संध्याकाळी ६ वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, मंत्रिमंडळात सहभागी होणाऱ्यांमध्ये ज्या नेत्यांच्या नावाची चर्चा आहे. सगळ्यात जास्त चर्चेचा विषय ठरला आहे तोच म्हणजे नारायण राणे यांचा फोटो.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात भाजपचे १०६ आमदार, २३ खासदार | उदयनराजे म्हणाले सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींना रस्त्यात आडवा
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याने भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. लोकप्रतिनिधांना घराबाहेर पडू देऊ नका, त्यांना रस्त्यातच आडवा, असे आदेशच उदयनराजे यांनी मराठा बांधवांना दिले आहेत. उदयनराजे यांनी मराठा बांधवांना उघडपणे चिथावणी दिल्याने आगामी काळात मराठा आरक्षणाचा विषय अधिक तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
लोकांचा जिव महत्वाचा | पण भाजप नेत्यांकडून वातावरण तापवायला सुरुवात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाच्या उद्रेकामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, राज्य सरकार कठोर निर्णय घेऊ शकतं. महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा लॉकडाऊन लावला जाऊ शकतो. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही तसेच संकेत दिले आहेत. त्यामुळे सध्या वीकेंड लॉकडाऊन आणि निर्बंध असले तरीही वाढती रुग्णसंख्या आणि मृतसंख्या पाहता, महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन लावला जाऊ शकतो.
4 वर्षांपूर्वी -
भाजप खासदार उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर राज ठाकरे यांच्या भेटीला
भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले हे कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. या भेटीचं नेमकं कारण समजू शकलं नाही. मात्र, मराठा आरक्षणा संदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले हे अधिक आक्रमक झाले आहे. नवी दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आज त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार
खासदार उदयनराजे भोसले आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट होणार आहे. आज संध्याकाळी 5.30 च्या सुमारास ही भेट होणार आहे. उदयनराजेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ही पहिलीच भेट आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
नाना पटोले आणि उदयनराजेंची दिल्लीत भेट | पण नाना पटोलेंच्या प्रतिक्रियेने आश्चर्य
साताऱ्यातील भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांचा राजकारणापलीकडील स्वभाव सर्वश्रुत आहे. खासदार उदयनराजे भोसले त्यांच्या मानाप्रमाणेच वागतात किंवा बोलतील असाच अनुभव आहे. आतादेखील त्यांच्या अशाच एका कृतीची समाज माध्यमांवर आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी -
मी तर भरपूर खाज असलेला खासदार आहे | उदयनराजेंची टोलेबाजी
भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते आज ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन झाले. यावेळी उदयनराजे यांनी जोरदार फटके बाजी केली आहे. ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनासाठी मंत्रीच कशाला हवेत. मी सुद्धा खासदार आहे. आणि असा तसा खासदार नाही, तर भरपूर खाज असलेला खासदार आहे, अशी जोरदार फटकेबाजी उदयनराजे यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
नामांतर करताना मानहानी होऊन उद्रेक होणार नाही ना याचा विचार करावा – उदयनराजे
औरंगाबाद नामांतरावरुन राज्यातलं राजकीय वातावरण सध्या ढवळून निघालंय. नामांतर झालंच पाहिजे, अशी भूमिका सेनेने घेतलीय तर काँग्रेसने नामांतराला कडाडून विरोध केलाय. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीने मात्र सावध भूमिका घेत नामांतराचा प्रश्न महाविकास आघाडी एकत्रित बसून सोडवेल, असं म्हटलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज याच भूमिकेचा पुनरुच्चार केला.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | भाजपच्या काळातील वकीलच सुप्रीम कोर्टात लढवत आहेत | तरीही जाणीवपूर्वक...
मराठा व धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरून सातारच्या गादीचे वारसदार आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. फडणवीसांच्या कार्यकाळात मराठा आणि धनगर समाजाचे आरक्षणासाठी मोर्चे निघाले होते. तेव्हा फडणवीसांनी हे प्रश्न मार्गी का लावले नाहीत, असा प्रतिप्रश्न पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
रामराजे-उदयनराजेंची खास भेट | साताऱ्यातील दोन राजेंचा राजकीय वाद मिटला
जिल्हयाच्या राजकारणात एकमेकांशी राजकीय वितुष्ट असणारे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी चक्क एकमेकांना नमस्कार करत दिलखुलास गप्पा मारल्या. दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या तब्बेतीची चौकशी करत काळजी घेण्याचा सल्लाही एकमेकांना दिला. हा दुर्मिळ योग साताऱ्याच्या शासकीय विश्रामगृहात सायंकाळी साडेसहा वाजता जुळून आला. रामराजे- उदयनराजे यांच्या भेटीची जिल्हयाच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व उदयनराजे यांच्यात झालेल्या जोरदार राजकीय शेरेबाजीमुळे चांगलेच वितुष्ट आले होते.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणाबाबत खंबीर | राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही - उदयनराजे
काल (२७ ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात राज्यातील महत्वाचा प्रश्न असलेल्या मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणी पुढे ढकलल्यानंतर विरोधकांकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. यावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील सरकारवर टीका करत इशारा दिला आहे. फेसबुक पोस्टद्वारे इशारा देत खासदार उदयनराजेंनी म्हटलं आहे की, आरक्षणाबाबत खंबीर मराठा राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान, महाराष्ट्र सरकारचा वकील उपस्थित नसल्याने न्यायालयाने ही सुनावणी काही काळासाठी तहकूब केली होती. त्यानंतर पुन्हा सुनावणी झाल्यावर, कोर्टाने ही सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलली. मात्र गेले दोन आठवडे या सुनावणीबाबतची माहिती असतानासुद्धा सरकारने जाणीवपूर्वक तयारी केली नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
खासदार, आमदारांच्या २ वर्षांच्या निधीवरून उदयनराजेंचा केंद्र आणि राज्य सरकारला सवाल
राज्यातील कोरोना परिस्थितीवरुन खासदार उदयनराजे (BJP MP Udayanraje Bhonsale) यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. खासदार, आमदारांचे दोन वर्षांचे निधी (MP and MLA Two Years Fund) तुमच्याकडे घोटवून घेतले? त्याचं केंद्र, राज्याने काय केले ते कुठे गेले? गोर गरिबांना सुख-सुविधा मिळत नाहीत, याचं उत्तर केंद्र आणि राज्य शासनाने दिलेच पाहिजे, असा थेट सवाल उदयनराजे यांनी विचारला आहे. कोरोना परिस्थितीमुळे साताऱ्यातील दसरा उत्सव साध्यापणाने साजरा करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उदयनराजे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
साताऱ्यातील दोन्ही राजे भाजपमध्ये | तरी भाजपमध्ये राजकीय अस्वस्थता?
राजकीय वर्तुळात सध्या सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधी पक्षातील नेते भेटले की चर्चांना उधाण येते. असेच काहीसे उधाण पुन्हा एकदा आले होते. साताराचे भाजप आमदार शिवेंद्रराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली होती. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात शिवेंद्रराजे आणि अजित पवार यांच्यात भेट झाली होती. या बैठकीत जवळपास तासभर चर्चा झाली. शिवेंद्रराजे अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला आल्यानं राजकीय चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यापूर्वीही शिवेंद्रराजे यांनी अजित पवार यांची अशाप्रकारे भेट घेतली होती. त्यानंतर वृत्त पसरताच अजित पवारांनी भेटीचा वेगळा राजकीय अर्थ काढू नये असं स्पष्टीकरण दिलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
MPSC परीक्षा घेण्याचं घातकी धाडस राज्य सरकारने करु नये | उदयनराजेंचा इशारा
राज्यात मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत MPSC ची परीक्षा घेण्याचं घातकी धाडस राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने करु नये असा इशारा भाजपाचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चासह अनेक विद्यार्थी संघटनांनी केली आहे. त्या संदर्भात एक फेसबूक पोस्ट लिहून राजेंनी हा इशारा दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
व्यंकय्या नायडूंचं वर्तन चुकीचं नव्हतं, काँग्रेस खासदाराने आक्षेप घेतल्याने समज दिली - खा. उदयनराजे
काल दिल्लीत राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडला. उदयनराजे यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. मात्र, राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यावर आक्षेप घेत उदयनराजे भोसले यांना समज दिली. हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नसून माझ्या दालनात होत आहे. हे रेकॉर्डवरही घेतलं जात नाही. सभागृहात कोणत्याही घोषणा देण्यास परवानगी नाही. नवीन सदस्यांनी भविष्यात हे लक्षात ठेवावे. हे सांगत असताना उदयनराजेंनी नायडू यांच्याकडे कटाक्ष टाकला. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउनमुळे लोकांचे रोजगार गेले आहेत, किती दिवस लोकांना घरात बसा सांगणार
आज देशातील राज्यसभेच्या नवनिर्वाचित 61 पैकी 44 खासदारांनी खासदारकीची शपथ घेतली. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी या खासदारांना शपथ दिली. महाराष्ट्राचे नेते शरद पवार यांनी यावेळी हिंदीतून शपथ घेतली. तर उदयनराजे भोसले व व रामदास आठवले यांनी इंग्रजीतून गोपनीयतेची व एकनिष्ठतेची शपथ घेतली. शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी चक्क मराठीतून शपथ घेतली. काँग्रेसचे राजीव सातव आणि भाजपाचे भागवत कराड यांनीही मराठीतून शपथ घेतली. कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे फौजिया खान या शपथविधीला हजर नव्हत्या.
5 वर्षांपूर्वी -
भारताने स्वीडनप्रमाणे हर्ट इम्युनिटी पद्धतीचा वापर केला पाहिजे - उदयनराजे भोसले
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने दीड लाखाचा टप्पा ओलांडला असून या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील २४ तासांत राज्यात ४ हजार ८७८ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ७४ हजार ७६१वर पोहोचली आहे. तर २४ तासांत २४५ कोरोनाबळींची नोंद झाली आहे. यापैकी ९५ मृत्यू हे गेल्या ४८ तासांमधील असून १५० मृत्यू हे मागील काळातील आहेत. दरम्यान, राज्यातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ७५ हजार ९७९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS