महत्वाच्या बातम्या
-
उदयनराजे समर्थकांकडून सातारा बंद; राऊत आणि आव्हाडांचा निषेध
खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ उदयनराजेंच्या समर्थकांनी गुरुवारी थेट सातारा बंदचे आवाहन करत सातारा बंद ठेवला. तसेच संजय राऊत यांच्या विरोधातही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावा द्या, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांना आव्हान दिले होते. त्यामुळे उदयनराजेंचे समर्थक संतप्त झाले.
5 वर्षांपूर्वी -
उदयनराजेंचा सातारा येथे पराभव घडवून आणल्याचे सांगत..राऊतांच भाजपकडे बोट
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज उदयनराजे यांना शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावेच घेऊन येण्याचे आव्हान दिले होते. हा वाद एवढ्यावरच थांबलेला नसून आता साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंह राजे यांनीदेखील यामध्ये उडी घेतली आहे. शिवरायांच्या घराण्यात आम्ही जन्माला आलोय, हे जनतेला माहिती आहे. वेगळे पुरावे द्यायची गरज नसल्याचे सुनावतानाच त्यांनी हा वाद संजय राऊत यांनी सुरू केला आहे, त्यांनीच संपवावा असे आवाहन केले होते. यावर संजय राऊत यांचे नुकतेच ट्विट आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराजांचा अपमान करणाऱ्या भाजपच्या हलवणकरांना उदयनराजे विनंती करणार कि ?
छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्यांवर राज्यांच लक्ष वेधलं आहे. उदयनराजे भोसलेंनी राजकारणासाठी पत्रकार परिषद घेतली नसल्याचं सुरूवातीलाच स्पष्ट केलं. मात्र असं असलं तरीही त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अपमान! मोदींची महाराजांशी तुलना हा तर छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान: भाजपचे माजी आ. हळवणकर
पुणे : छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्यांवर राज्यांच लक्ष वेधलं आहे. उदयनराजे भोसलेंनी राजकारणासाठी पत्रकार परिषद घेतली नसल्याचं सुरूवातीलाच स्पष्ट केलं. मात्र असं असलं तरीही त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुलाचं नाव शिवाजी ठेवलं तर एनओसी साताऱ्यातून मागवायची का? : जितेंद्र आव्हाड
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी वादग्रस्त पुस्तकावरुन शिवसेनेवर तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर हल्ला चढवला. जाणते राजे फक्त शिवाजी महाराजच आहेत, अन्य कोणी नाही, असं म्हणत उदयनराजेंनी शरद पवारांवर निशाणा साधला. या टीकेनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजेंवर पलटवार केला.
5 वर्षांपूर्वी -
छत्रपती शिवाजी महाराज राहू देत, आधी आजोबांचा विचार तरी अमलात आणा: उदयनराजे
भारतीय जनता पक्षाचे नेते जय गवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून वाद निर्माण झाला होता. आता भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करताना लेखकाने पुस्तक मागे घेतलं असल्याचं म्हटलं आहे. गोयल यांनी ते वैयक्तिक लिहिले असून पक्षाचा त्या पुस्तकाशी काहीही संबंध नाही असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी माफी मागत हे पुस्तक मागे घेतल्याचं जावडेकर म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचे नाव बदलून ठाकरेसेना करा: उदयनराजे भोसले
यावेळी उदयनराजेंनी शिवसेनेवर जोरदार टीकेची झोड उठवली. स्वार्थासाठी शिवरायांच्या नावाचा वापर का करता असा संतप्त सवाल उदयन राजेंनी विचारला. तसेच महाराजांच्या नावाने शिवसेनेची स्थापना करताना वंशजांना विचारले होते का? अशी विचारणा करत उदयनराजेंनी ठाकरे कुटुंबीयांवर टीका केली. तसेच शिवसेनेचे नाव बदलून ठाकरेसेना करा, असा सल्लाही त्यांनी दिला.
5 वर्षांपूर्वी -
मोदींची महाराजांशी तुलना!...बुद्धी गहाण ठेवली आहे का काय? उदयनराजेंचा संताप
भाजपचे नेते जय गवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून वाद निर्माण झाला होता. आता भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करताना लेखकाने पुस्तक मागे घेतलं असल्याचं म्हटलं आहे. गोयल यांनी ते वैयक्तिक लिहिले असून पक्षाचा त्या पुस्तकाशी काहीही संबंध नाही असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी माफी मागत हे पुस्तक मागे घेतल्याचं जावडेकर म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
त्या पुस्तकावरून छत्रपती उदयराजे भोसले, शिवेंद्रराजे आणि राज्य भाजप शांत?
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तक प्रकाशनाचे तीव्र पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटायला सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत आणि राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्यात यावरून ट्विटर वॉर पाहायला मिळाले आहे. भारतीय जनता पक्षात शिरलेल्या छत्रपतीच्या वंशजांना ही तुलना मान्य आहे का?, असा सवाल करणाऱ्या संजय राऊत यांना छत्रपती संभाजी राजे यांनी तितक्याच आक्रमकपणे उत्तर दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
सातारा दौरा रद्द करण्यावर शरद पवारांचा खुलासा
उदयनराजे भोसले यांनी एनसीपीच्या खासदारकीचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर सातारमध्ये पोटनिवडणूक घ्यावी लागली. यामध्ये श्रीनिवास पाटील यांच्या बाजूने जनतेने कौल दिला. उदयनराजेंनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने एनसीपी’साठी देखील ही लढाई प्रतिष्ठेची बनली. एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारामध्ये सभा घेतली होती. धो धो पावसात पवारांच्या सभेची चर्चा राज्यभरात झाली. त्यानंतर उदयनराजेंचा दारुण पराभव झाला. यानंतर श्रीनिवास पाटील यांचे अभिनंदन करण्यासाठी तसेच सातारकर जनतेचे आभार मानण्यासाठी मी स्वत: जाणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. पण हा कार्यक्रम त्यांनी रद्द केला.
5 वर्षांपूर्वी -
जिंकलो नाही पण संपलो ही नाही: उदयनराजे भोसले
विधानसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या झंझावाती प्रचारसभा झाल्या. पायाला जखमा असतानाही वयाच्या ८०व्या वर्षी शरद पवार पायाला भिंगरी लावल्यागत फिरत असल्याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले. साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेत शरद पवारांनी चक्क मुसळधार कोसळणाऱ्या पावसात सभेला संबोधित केले. पवारांची ही सभा सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी निर्णायक ठरली आहे आणि उदयनराजेंना पराभव पाहावा लागला.
5 वर्षांपूर्वी -
सातारा: पवार नीतीसमोर यापुढे कॉलर खाली; यापूर्वीची मतं सुद्धा राष्ट्रवादीची असल्याचं सिद्ध
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सारी तयारी पूर्ण झाली असून, सुमारे २५ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मतमोजणीच्या कामाकरिता नेमणूक करण्यात आली आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व कौल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुती की आघाडीची सत्ता येणार हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले १० हजार मतांनी पिछाडीवर
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सारी तयारी पूर्ण झाली असून, सुमारे २५ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मतमोजणीच्या कामाकरिता नेमणूक करण्यात आली आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व कौल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुती की आघाडीची सत्ता येणार हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
जे माझ्या बारश्याला हजर होते ते आज माझ्याविरोधात उभे: उदयनराजे भोसले
उदयनराजें भाषणात बोलताना म्हणाले, खासदारकीचा राजीनामा देण्यासाठी हीच वेळ योग्य वाटली. मोदींसोबत जाण्याची मागणी समर्थकांनी केली म्हणून मी मोदींसोबत, जे माझ्या बारश्याला हजर होते ते आज माझ्याविरोधात उभे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पोलाद पुरुष आहेत असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं साताऱ्यात कौतुक केलं. कलम ३७० वरुन मोदींवर टीका केली जाते मात्र देशाचे जवान आपल्याला महत्त्वाचे नाहीत का? त्यामुळे कलम ३७० हटवलं आणि तो मुद्दा विधानसभा निवडणूक प्रचारात आणला तर बिघडलं काय? असंही उदयनराजे यांनी विचारलं.
5 वर्षांपूर्वी -
ज्या पेढ्यावरून मोदींची खिल्ली उडवली त्या 'सातारी कंदी पेढ्याचा' हार मोदींना घालणार?
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश करून खासदारकीचा राजीनामा देखील दिला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक देखील होणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादीकडून उदयनराजेंना थांबवण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न अपयशी ठरले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देखील उदयनराजेंशी संपर्क करुन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र राजेंनी ‘मी जातोय. मला संपर्क करु नका’, असं सांगितल्याची माहिती मुंडे यांनी दिली होती.
5 वर्षांपूर्वी -
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे 2 लाख मतांनी पराभूत होणार: पृथ्वीराज चव्हाण
विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही मतदान पार पडणार आहे. भाजपाकडून निवडणूक लढविणारे छत्रपती उदयनराजे भोसले पोटनिवडणुकीत 2 लाख मतांनी पराभूत होणार असा दावा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मोदी-शहा कोणीही आले तरी उदयनराजेंचा पराभव निश्चित आहे असा टोला पृथ्वीराज चव्हाणांनी लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सातारा लोकसभा पोटनिवडणुक विधानसभेसोबत अचानक जाहीर झाल्याने चर्चा रंगली
देशातील अनेक ठिकाणी पोटनिवडणुका होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. परंतु सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा मात्र केली नव्हती. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसोबतच ही पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे या जागेसाठीही २१ ऑक्टोबरला मतदान होईल आणि २४ ऑक्टोबरला मतमोजणी होईल.
5 वर्षांपूर्वी -
उदयनराजेंना धक्का! देशभरातील ६४ मतदारसंघात पोटनिवडणूक; साताऱ्याबाबत घोषणा नाही
महाराष्ट्र, हरयाणातील विधानसभा निवडणुकांसह देशभरातील ६४ मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. यासाठीदेखील २१ ऑक्टोबर रोजी मतदान घेतले जाईल आणि २४ ऑक्टोबर रोजी मतदान होईल. भाजपात प्रवेश करताना उदयनराजे भोसले यांनी काही अटी ठेवल्याचं सांगण्यात येत होतं. त्यानुसार लोकसभेची पोटनिवडणूक ही विधानसभेसोबत घेण्यात यावी अशीही अट होती.
5 वर्षांपूर्वी -
तेव्हा महाराज स्वत:च्या स्वार्थासाठी दिल्लीला गेले नव्हते; इथे मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी गेले
साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल सुरू केला आहे. एनसीपीने अन्याय केल्याचा पुर्नउच्चार उदयनराजे यांच्याकडून केला जात आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्ष प्रवेशावरून शरद पवार यांनी उदयनराजे यांना इतिहासाचा दाखला देत आरसा दाखवला आहे. “महाराज स्वत:च्या स्वार्थासाठी दिल्लीश्वरांचे अधीन झाले नव्हते. महाराज औरंगजेबाच्या भेटीला गेले. त्यानंतरही खचून न जाता त्यांनी स्वत: हिंदवी स्वराज्य निर्माण केलं”, असे खडेबोल शरद पवार यांनी उदयनराजेंना सुनावले.
5 वर्षांपूर्वी -
'सातारचे राजे' असा उल्लेख करत शिवसेनेकडून उदयनराजेंची खिल्ली
उदयनराजे भोसले हे शिवरायांचे १३ वे वंशज आहेत म्हणून त्यांना समाजात मान आहे. त्यामुळे उदयनराजेंना जाळ्यात ओढल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाची मते पदरात पडतील असे भाजपचे गणित आहे, पण शिवराय हे फक्त एका जातीचे नव्हेत, तर सर्व जाती-धर्माच्या लोकांचे दैवत आहे. त्यामुळे शिवरायांचे तेरावे वंशज एका जातीच्या राजकारणाचे ‘मोहरे’ म्हणून राजकारणात वापरले जात असतील तर तो शिवरायांचा अपमान ठरेल,’ अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा
- Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल