महत्वाच्या बातम्या
-
जीवनावश्यक वस्तूंची दुकानं २४ तास सुरु ठेवा; पण दुकानात माल आहे कुठे?
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकानं, किराणा दुकानं, औषधांची दुकानं २४ तास उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात येत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिली.
5 वर्षांपूर्वी -
संचारबंदी लागू आहे; टेहळणी करायला विनाकारण बाहेर पडू नका - मुख्यमंत्री
राज्यात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधला. कोरोना व्हायरस या संकटाचं गांभीर्य ओळखून लोकांनी सहकार्य करावं, अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ‘संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे’, असा धीर देत नागरीकांनी घरातच राहा, सुरक्षित राहा, असं आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. अन्नधान्याचा साठा पुरेसा; काळजीचे कारण नाही.
5 वर्षांपूर्वी -
घाबरू नका, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य व इतर आवश्यक सेवा सुरुच राहणार
रोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी कठोर पाऊल उचलले आहे. राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा सील करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. संचारबंदीदरम्यान रस्त्यावर ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात संचारबंदी लागू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
रोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी कठोर पाऊल उचलले आहे. राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा सील करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. संचारबंदीदरम्यान रस्त्यावर ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या; मुख्यमंत्र्यांची विनंती आणि इशारा देखील
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करत असूनही यावर नियंत्रण मिळवणे दिवसेंदिवस कठीण जाताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशभरात ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला होता. दरम्यान, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. राज्यात रविवारी कोरोना विषाणूचे १५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात कलम १४४ लागू; ५ पेक्षा जास्त जण एकत्र आल्यास ताब्यात घेणार: मुख्यमंत्री
करोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात ‘जनता कर्फ्यू’चं आवाहन केलं होतं. त्याला मुंबई,ठाणे,पुणे, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण राज्यात रस्त्यांवर, लोकल आणि बसमध्ये शुकशुकाट निर्माण झाला आहे. लोकांनी घरातच राहणं पसंत केल्याने राज्यात कडकडीत संचार बंदी पाळली जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे राज्यातील पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द
कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे राज्यातील पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला. शुक्रवारी त्यांनी पत्रकारांना याबद्दल माहिती दिली. राज्यात शुक्रवारी सकाळपर्यंत ५२ जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
जीवनाश्यक वस्तू व्यक्तिरिक्त सर्व गोष्टी ३१ मार्चपर्यंत बंद, मुख्यमंत्र्यांची घोषणा
अर्धी मुंबई बंद असली तर बस आणि रेल्वे सेवा बंद होणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई, पुणे आणि महानगरातील सर्व खासगी कार्यालयं बंद राहणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. राज्यात सर्व दुकानं आणि व्यापार बंद राहतील पण जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
महानगरातील सर्व खासगी ऑफिसेस बंद राहणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
अर्धी मुंबई बंद असली तर बस आणि रेल्वे सेवा बंद होणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई, पुणे आणि महानगरातील सर्व खासगी कार्यालयं बंद राहणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. राज्यात सर्व दुकानं आणि व्यापार बंद राहतील पण जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
हे युद्ध आहे, सर्वजण मिळून या संकटावर मात करुया - मुख्यमंत्री
करोना व्हायरस हे वेगळ्या प्रकारचं युद्ध आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी सरकारने दिलेल्या सूचना पाळा. घरातच राहा, गर्दी टाळा. स्वत:हून काही बंधने पाळा, असं सांगतानाच हे वॉर अगेन्स्ट व्हायरस असल्याने रेल्वे, बसेस बंद करण्याची वेळ येऊ देऊन नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात लॉकडाऊनची गरज नाही, पण पुढचे १५ दिवस महत्त्वाचे: मुख्यमंत्री
कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पुढचे १५ दिवस महत्त्वाचे आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. खबरदारीच्या पार्श्वभूमीवर घरातून बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी केले आहे. कोरोना हे जागतिक संकट असून त्यावर आपण मात निश्चित करु. पण त्यासाठी आपल्याला राज्य सरकारने दिलेल्या सूचनांच पालन करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
5 वर्षांपूर्वी -
आमदारांना वाहनासाठी बिनव्याजी ३० लाख; तेच स्टार्टअप'ला दिल्यास? सविस्तर वृत्त
आमदार निधीत एक कोटी रुपयांची वाढ, वाहनचालकांना दरमहा १५ हजारांचे वेतन यापाठोपाठ आमदारांना वाहन खरेदीकरिता ३० लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा करून उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आमदार मंडळींना खूश केले. यासाठी सरकारने दिलेली मूळ रक्कम आमदाराला फेडावी लागणार आहे. त्यावरील व्याज सरकार भरेल, अशी घोषणा करताच सभागृहात आमदारांनी त्यांचे बाके वाजवून स्वागत केले.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई, ठाणे, नागपूर, पुण्यातील सिनेमागृहे, नाट्यगृहे आज मध्यरात्रीपासून बंद: मुख्यमंत्री
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर आणि पिंपरी-चिंचवड येथील शाळा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. जनतेच्या हितासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. याबाबत घेतलेले निर्णय आज मध्यरात्रीपासून लागू होणार असल्याचेही त्यांनी म्हटले. दहावी आणि बारावीची परीक्षा वगळता शालेय परीक्षा उशिरा घेण्याबाबतही विचार सुरु असल्याचे ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडी सरकार संत गाडगेबाबांच्या 'दशसुत्री' प्रमाणे काम करेल: मुख्यमंत्री
संत गाडगेबाबा यांच्या ‘दशसुत्री’ शिकवणीनुसार महाविकास आघाडीचे सरकार काम करेल, हा विश्वास दर्शविणाऱ्या फलकाचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मंत्रालय येथे केले. दरम्यान आज मंत्रालयात कोरोनाच्या संदर्भातील महत्वाची बैठक पार पडली.
5 वर्षांपूर्वी -
शिवभोजन योजनेतील हॉटेलचालकांची बिलं लटकली; सरकारी काम आणि....
महाविकास आघाडी सरकारकडून गोरगरिब जनतेसाठी २६ जानेवारीपासून शिवभोजन योजना सुरू करण्यात आली होती. यामध्ये जनतेला १० रूपयांमध्ये पोटभर जेवण देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात दिली होती. सुरूवातीच्या टप्प्यात शिवभोजन योजनेची ५० केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर राज्यात टप्प्याटप्प्यानं आणखी केंद्रे वाढवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणादरम्यान निरनिराळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातून पुण्यात ८ तर मुंबईत २ कोरोनाग्रस्त रुग्ण : मुख्यमंत्री
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात दहशत पसरली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे १० रुग्ण आढळले आहे. हे १० जण पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, पण ते गंभीर नाहीत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसंच अर्थसंकल्पीय अधिवेशनही याच आठवड्यात गुंडाळणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
5 वर्षांपूर्वी -
भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे: उद्धव ठाकरे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी १ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. काँग्रेसशी युती करून शिवसेनेने हिंदुत्वापासून फारकत घेतली, या टीकेचा त्यांनी प्रतिवाद केला.
5 वर्षांपूर्वी -
मी भाजपपासून वेगळा झालोय, हिंदुत्वापासून नाही - उद्धव ठाकरे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी १ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. काँग्रेसशी युती करून शिवसेनेने हिंदुत्वापासून फारकत घेतली, या टीकेचा त्यांनी प्रतिवाद केला. मी भाजपपासून वेगळा झालोय, हिंदुत्वापासून नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. उद्धव ठाकरे संध्याकाळी ४ वाजता रामल्लाचे दर्शन घेणार आहेत. यानंतर ते पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना होतील.
5 वर्षांपूर्वी -
राम मंदिराच्या निर्माणासाठी शिवसेनेकडून १ कोटीचा निधी; उद्धव ठाकरेंची घोषणा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी १ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. काँग्रेसशी युती करून शिवसेनेने हिंदुत्वापासून फारकत घेतली, या टीकेचा त्यांनी प्रतिवाद केला. मी भाजपपासून वेगळा झालोय, हिंदुत्वापासून नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. उद्धव ठाकरे संध्याकाळी ४ वाजता रामल्लाचे दर्शन घेणार आहेत. यानंतर ते पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना होतील.
5 वर्षांपूर्वी -
महिला सुरक्षेवरुन मुख्यमंत्र्यांची डबलढोलकी! कदमांना निवडणुकीत आशीर्वाद अन आता टीकास्त्र
“तुम्हाला जी मुलगी आवडली, ती पळवून आणा असं, सांगणारे राजकारणी आहेत, ते निवडून येतात. ते इथे आहेत. सैनिकांच्या पत्नीबद्दल बोलणारे इथे आहेत. मतांच्या राजकारणासाठी एवढे आपण आगतिक आहोत”, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिला सुरक्षेवरुन विधानपरिषदेत विरोधकांवर हल्लाबोल केला.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB