महत्वाच्या बातम्या
-
मुस्लिम आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांचा 'युटर्न'; भाजपकडून पोलखोल सामना
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देणार अशी घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेवरून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. मुस्लीम आरक्षणाला विरोध असेल तर उद्धव ठाकरेंनी जाहीर करावं, असं आव्हानच फडणवीसांनी दिलं होतं. तर फडणवीस यांच्या या आव्हानाला जितेंद्र आव्हाड यांनी सणसणीत उत्तर दिलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंनी अयोध्येला नाही तर मक्केला जावं...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला जात आहे. अयोध्यातील तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात राम भक्तांना धोका दिल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, ‘शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या हव्यासापोटी काँग्रेससोबत हातमिळवणी करीत राम भक्तांना धोका दिला आहे. त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही शिवाय त्यांना रामाचं दर्शनही घेऊ देणार नाही. मी स्वत: उद्धव ठाकरेंचा रस्ता रोखणार’.
5 वर्षांपूर्वी -
मुंब्रा, शिळ, कळव्यातील लोकांचा विरोध डावलून सरकारकडून टोरंट कंपनीची नेमणूक
मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी १ नोव्हेंबर २०१९ रोजी आगरी समाज प्रतिष्ठानने टोरेंट पॉवर कंपनीविरोधात आयोजित केलेल्या भव्य मोर्चात सहभाग नोंदवला होता. त्यावेळी भव्य मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलं होतं. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार राजू पाटील म्हणाले की, सदर कंपनीला माझा यापूर्वीच विरोध राहिलेला आहे आणि राज्यातील मंत्रिमंडळ अजून ठरलं नसल्याने प्रशासनाने तूर्तास या कंपनीच्या नव्या कार्यालयास स्थगिती द्यावी अशी विनंती देखील केली आहे. काही झालं तरी आम्ही टोरेंट पॉवर कंपनी येथून हटवणार म्हणजे हटवणार असा निश्चय यावेळी करण्यात आला होता.
5 वर्षांपूर्वी -
रश्मी ठाकरे दैनिक सामनाच्या संपादक, सामनाच्या पहिल्या महिला संपादक
आजपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या दैनिक सामनाच्या संपादक असणार आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर सामनाचे संपादकपद ठेवण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे आता रश्मी ठाकरे या सामनाच्या संपादक असणार आहेत. आजपासून त्यांच्याकडे हे पद सुपूर्द करण्यात आलं आहे. सामना हे शिवसेनेचे मुखपत्र आहे.
5 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांना दिलासा; कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर
महाविकास आघाडी सरकारने घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांची दुसरी यादी शनिवारी जाहीर झाली. या यादीत तब्बल २२ लाख शेतकर्यांचा समावेश आहे. महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २४ फेब्रुवारी रोजी ३५ लाख शेतकर्यांपैकी केवळ १५ हजार ५५८ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली होती. यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. त्यामुळे आता दुसरी यादी २२ लाख शेतकऱ्यांची जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील सोमवारी यासंदर्भात अधिवेशनात माहिती देण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकार मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी लवकरच अध्यादेश काढणार
मुस्लिम समाजाला महाविकास आघाडी सरकार लवकरच गुड न्यूज देणार आहे. मुस्लिमांना शैक्षणिक संस्थांमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. या संदर्भातील कायदे संमत करणार असल्याची ग्वाही अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
तात्याराव! ह्याच्या नावातून आडनाव काढून टाकायची वेळ आणली कारट्यानं; भाजपची जळजळीत टीका
भारतीय जनता पक्षाने स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे आणि वीर सावरकर यांचं व्यंगचित्रं प्रसिद्ध करून मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जळजळीत टीका केल्याने मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यामध्ये अत्यंत शेलक्या भाषेत उद्धव ठाकरे अप्रत्यक्षरित्या लक्ष करण्यात आल्याने शिवसेना यावर नेमकी काय प्रतिक्रिया देणार ते पाहावं लागणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात? निलेश राणे
शिवसेनेनं वीर सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपावर टीकेचे बाण सोडले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांची ‘ढाल’ करून भाजप हे नवराष्ट्रवादाचे राजकारण खेळते आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर ‘पेच’ निर्माण होईल असे त्यांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. शिवसेनेसमोर ‘पेच’ निर्माण होणार नाही, पण तुम्ही जे ढोंग उभे केले आहे त्या ढोंगाच्या पेकाटात मात्र नक्कीच लाथ बसेल. भाजपला वीर सावरकरांचा आलेला पुळका खोटा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
त्या अभिनेत्रीवर मंत्रालयात भीक मागण्याची वेळ; २०१८'मध्ये सामना'त बाता मारल्या होत्या: सविस्तर
१९८५ साली प्रदर्शीत झालेला ‘धुमधडाका’ हा चित्रपट मराठीतील आजवरच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. आजही या चित्रपटातील गाणी व डायलॉग्स प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. या चित्रपटात झळकलेले अशोक सराफ, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता जोशी-सराफ, प्रेमा किरण असे सर्वच कलाकार आज मराठीतील नामवंत कलाकार म्हणून ओळखले जातात. या चित्रपटात आणखी एका अभिनेत्रीने आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली होती. परंतु आज ती अभिनेत्री ओळखताही येणार अशा अवस्थेत हलाखीचे जीवन व्यतीत करत आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांनी त्या ‘१०५’ लोकांशी संवाद साधायचे ठरवले तर फडणवीसांचे काय होईल? - शिवसेना
भाजपने सत्तेचा गैरवाजवी वापर करून विरोधी पक्ष खरेदी-विक्री संघ उघडला होता. त्या मार्गाने महाविकास आघाडी किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज तरी जाताना दिसत नाहीत. त्यांनी विरोधी बाकावरील ‘१०५’ लोकांशी संवाद साधायचे ठरवले तर विरोधी पक्षनेत्यांचे काय होईल? असा टोला शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपाला टोला लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडी सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मोठी घोषणा केली होती. शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचे सरकारचे प्रयत्न असून, पहिली यादी २४ फेब्रुवारीला जाहीर होणार असल्याची घोषणा केली होती. अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर काही तासात शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकार ११ दिवसात कोसळणार: नारायण राणे
राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेनं एकत्र येऊन स्थापन केलेलं महाविकास आघाडी सरकार येत्या ११ दिवसांत कोसळले, असं भाकित भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी वर्तवलं आहे. भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कपिल पाटील फाऊंडेशन यांच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन तालुक्यातील अंजुर येथे करण्यात आले असून त्याचा उद्घाटन सोहळा माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्रातील सरकार अकरा दिवसात कोसळेल, असं भाकीत नारायण राणे यांनी केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
CAA-NRC : उद्धव ठाकरेंचे दोन्ही दगडांवर पाय - आनंदराज आंबेडकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर नागरिकत्व सुधारणा कायद्याचे (सीएए) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समर्थन केलं आहे. यावरूनच रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्यावरून मुख्यमंत्री हे दोन्ही दगडांवर पाय ठेवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
अधिवेशनात धनगर आरक्षणाचा प्रश्न न सुटल्यास मुख्यमंत्री व मंत्र्यांच्या घरात मेंढरं सोडू: भारत सोन्नर
येत्या अधिवेशनात धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही तर थेट मुख्यमंत्र्याच्या घरासह इतर मंत्र्यांच्या घरात मेंढरं सोडू, असा इशारा यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष भारत सोन्नर यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे. तसेच 26 फेब्रुवारीला धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी ‘सूंबरान’ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही भारत सोन्नर यांनी दिली आहे. आज बीड येथे राज्य स्तरीय धनगर समाजाच्या कोअर कमेटीची बैठक झाली. या बैठकीनंतर भारत सोन्नर यांनी माध्यमांना आंदोलनाविषयी माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
CAA मुद्दा, मुख्यमंत्र्यांच्या 'दिल्ली वारी'नंतर वर्षा निवासवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीला स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊतही उपस्थित आहेत. शरद पवार दुपारी चारच्या सुमारास वर्षा बंगल्यावर दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिल्लीत मॅरेथॉन बैठका घेतल्यानंतर, आज शरद पवारांसोबत बैठक होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
'U T' NRC - CAA, गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा; आमदार राजू पाटील यांचा टोला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यात सीएए, एनआरसी आणि एनपीआरबाबत केलेल्या वक्तव्यावरुन आता महाविकास आघाडीत धुसफूस होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी CAA चा अभ्यास करावा, असा सल्ला काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी दिला. त्याआधी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही उद्धव ठाकरेंनी सीएएचं जाहीर समर्थन करु नये असं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
सीएए'ला घाबरण्याची गरज नाही: मुख्यमंत्री
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये पोहचले. आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सात लोक कल्याण मार्ग या निवासस्थानी भेट घेण्यासाठी पोहोचले. दरम्यान ही बेत तब्बल १ तास चालली ज्यामध्ये राज्यासंबंधित अनेक विषयांवर चर्चा झाल्याचं वृत्त आहे. बैठक संपताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि तेथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींसोबतची बैठक संपली
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये पोहचले. आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सात लोक कल्याण मार्ग या निवासस्थानी भेट घेण्यासाठी पोहोचले. दरम्यान ही बेत तब्बल १ तास चालली ज्यामध्ये राज्यासंबंधित अनेक विषयांवर चर्चा झाल्याचं वृत्त आहे. बैठक संपताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि तेथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
भाजपसोबत पक्ष संपवण्यापेक्षा युपीए'सोबत पक्ष वाढविण्यासाठी सोनिया-उद्धव यांची भेट? - सविस्तर वृत्त
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ या निवासस्थानी उद्धव ठाकरे त्यांची भेट घेतील.आज दुपारी दीड ते दोनच्या सुमारास ही भेट होण्याची शक्यता आहे. भाजपशी फारकत घेऊन राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. याबाबत स्वतः शिवसेनेचे संसदीय नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. तसेच ही सदिच्छा भेट असल्याचं म्हणत या भेटीच्या तपशिलात खोल शिरण्याची गरज नसल्याचंही राऊत म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
सरपंच निवड: ठाकरे सरकारला राज्यपालांचा धक्का
राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला आता तीन महिने होत आहेत. या तीन महिन्यात पहिल्यांदाच राज्य सरकारला धक्का बसलाय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारचा एक महत्त्वाचा आदेश फेटाळून लावलाय. राज्य सरकारने थेट सरपंच निवडीला विरोध केला होता. हा नियम बदलण्यासाठी नवा अध्यादेश करावा असं सरकारचं मत होतं. मात्र सरकारची ही शिफारस राज्यपालांनी फेटाळून लावली अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे सरकारला आता विधानसभेत यासंबंधीचं विधेयक आधी मंजूर करून घ्यावं लागणार आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा