महत्वाच्या बातम्या
-
अपरिपक्वपणा! वर्षा बंगला सोडताना देखील भिंतीवर 'विकृत-प्रवृत्ती' दर्शन?
महाराष्ट्रात सत्तापालट झालाय. आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. उद्धव ठाकरे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत. अशातच मुंबईतील मुख्यमंत्री बंगल्यावर म्हणजेच वर्षावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वाक्य लिहिण्यात आली आहेत.
5 वर्षांपूर्वी -
शौर्य दिनाच्या दिवशी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना पुणे जिल्हाबंदी
हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडेंसह १६३ जणांना पुणे जिल्हाबंदी करण्यात आली आहे. कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच चार तालुक्यांमध्ये कलम १४४नुसार जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, १ जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार झाला होता. या प्रकरणी संभाजी भिडे गुरूजी व मिलींद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
गोरगरीबांसाठी १० रूपयांत शिवभोजन योजना जाहीर
गोरगरिब जनतेसाठी लवकरच शिवभोजन योजना सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये जनतेला १० रूपयांमध्ये पोटभर जेवण देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात दिली. सुरूवातीच्या टप्प्यात शिवभोजन योजनेची ५० केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्यानंतर राज्यात टप्प्याटप्प्यानं आणखी केंद्रे वाढवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणादरम्यान निरनिराळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं.
5 वर्षांपूर्वी -
ठाकरे-पवार सरकारकडून शेतकऱ्यांचं २ लाखांपर्यंतचं कर्ज माफ
अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने कंबरडे मोडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत असलेले दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असे नाव या योजनेला देण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
CAA आंदोलनं: देश किंवा राज्य सोडावं लागेल ही भीती बाळगू नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नागरिकत्त्व सुधारणा कायद्यावरून देशभरात आगडोंब उसळला आहे. महाराष्ट्रातही याचे लोण पसरले असून ठिकठिकाणी आंदोलनं होतं. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जनतेला शांततेचं आवाहन केलं आहे. तसंच, महाराष्ट्रातील जनतेचे हक्क कुणालाही हिरवून देणार नाही, अशी ग्वाहीही दिली आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केलं.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य मुखपत्र चक्क हिंदी-गुजरातीत? सविस्तर वृत्त
महाराष्ट्र शासन सरकारी कामकाजात १०० टक्के मराठीचा वापर करण्याच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत आहे असाच प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. कारण, महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाच्या चक्क हिंदी, गुजराथी आणि उर्दू आवृत्तींच्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याच्या अंकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं आहे. यावेळी सचिव तथा महासंचालक सुरेश वांदिले देखील उपस्थित होते.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे व सेनेच्या बदनामीसाठी खोटा व्हिडिओ प्रचार; फडणवीस सुद्धा सामील - सविस्तर
नागरिकत्व दुरुस्ती कायद्या संसदेत मजूर झाल्यानंतर देशभर मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात येतो आहे. विद्यार्थीच रस्त्यावर ईशान्य भारतात उग्र स्वरूप आलेलं असताना दिल्लीत विद्यापीठात देखील प्रसार माध्यमांच्या केंद्रस्थानी आहे. मात्र, याच अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या (एएमयू) विद्यार्थ्यांच्या संबंधित आंदोलन आणि घोषबाजीवरून १-२ व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल करण्यात येत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळणार, फक्त बोंबलून प्रश्न मांडू नका
नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या जामिया मिलिया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा शिवसेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तीव्र शब्दांत निषेध केला. ‘तरुणांचं आंदोलन चिरडून देशात पुन्हा एकदा ‘जालियनवाला बाग’ घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे,’ अशी तोफ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर डागली.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई कोस्टल रोड प्रकल्प; मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टवरील बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली
मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडच्या कामावरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं उठवली आहे. प्रकल्पाचे काम सुरू करा, असे निर्देश न्यायालायनं दिले आहेत. या निर्णयामुळं मुंबई महापालिका व राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं १६ जुलै रोजी कोस्टल रोडच्या कामास मनाई केली होती.
5 वर्षांपूर्वी -
सत्ता आपल्या चुकीमुळे नाही तर शिवसेनेच्या गद्दारीमुळे गेली: खा. नारायण राणे
स्वातंत्र्यानंतर झालेल्या फाळणी वेळी भारताच्या सीमावर्ती भागात आश्रय घेतलेल्या अत्याचारग्रस्त लोकांना भारताचे नागरिकत्व देण्याचे काम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारत देश धर्मनिरपेक्ष आहे, हे पटवून देणारे नागरिकता विधेयक दोन्ही सभागृहांत संमत झाले. मात्र, या वेळी शिवसेनेची भूमिका ही धरसोड राहिली. हिंदुत्ववादी म्हणविणा-या शिवसेनेचा खरा मुखवटा यावेळी उघड झाला, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांनी केली. खरे म्हणजे, शिवसेना हा मुखवटा नसलेला पक्ष आहे, असेही ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
नागपूर: भाजपने विधानसभेत एकही जागा न दिलेल्या शहरांमध्ये शिवसेनेची पक्षबांधणी
शिवसेना काय आहे ते सगळ्या देशाला ठाऊक आहे, आम्ही कोणताही बुरखा पांघरलेला नाही. आम्ही धर्मांतर केलेले नाही. आम्ही आजही हिंदुत्त्ववादीच आहोत, अशी टीका करतानाच हिंदुत्त्वाचा बुरखा पांघरुन वावणार्यांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नाव घेता दिला. त्या पक्षाने २०१४ साली युती तोडली होती. त्यानंतरही आम्ही हिंदूच होतो.शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याबाबत आपण कटीबद्ध आहोत, असेही ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस गेले अन संवेदनशील गृहमंत्री येताच बंदोबस्तावरील पोलिसांना आयुक्तालयातर्फे १० रु. थाळी
नागपूर हिवाळी अधिवेशनात बंदोबस्तासाठी राज्यभरातून आलेल्या पोलिसांच्या जेवणाचा बंदोबस्त गृहखात्या अंतर्गत येणाऱ्या नागपूर शहर पोलिस आयुक्तालयाने केला आहे. गोंडराजाचा पुतळा असलेल्या विधानसभा चौकात पोलिसांनी बुफे पद्धतीने जेवण वितरीत केले. हे जेवण अवघ्या १० रुपयात सर्व पोलिसांना देण्यात आले. जेवणाचा दर्जा कसा काय आहे हे पाहण्यासाठी खुद्द पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय जातीने हजर होते. त्यांनी पदार्थांची चव चाखून समाधान व्यक्त केले. त्यांनी स्वत: पोलिसांना जेवण वाढले देखील.
5 वर्षांपूर्वी -
मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरलं! समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देणार
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. हा मार्ग ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग’ म्हणून ओळखला जाईल, अशी माहिती राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
खडसेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली; सोबत ओबीसी समाजाचे नेते देखील
भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानभवनात भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे शिवसेनेत जाणार अशी चर्चा रंगली आहे. शिवसेनेकडूनही वरिष्ठ नेत्यांना एकनाथ खडसेंशी चर्चा करण्यास सांगितल्याचंही बोललं गेलं. मात्र, आता स्वतः एकनाथ खडसे यांनीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने खडसेंच्या पुढील राजकीय प्रवासाविषयी उत्सुकता वाढली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सेनेचा अपमान छोट्या-मोठ्या गोष्टीं? भाजपा - शिवसेना यांनी एकत्र यायला हवं: मनोहर जोशी
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी मोठं विधान केलं आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आले तर उत्तम होईल, पण सध्या दोन्ही पक्ष त्या मानसिकतेत नाहीत, असं मनोहर जोशी म्हणाले. मनोहर जोशी यांनी हे आपलं वैयक्तिक मत असल्याचंही यावेळी नमूद केलं.
5 वर्षांपूर्वी -
पार्टटाइम गृहमंत्री गेले; मुख्यमंत्र्यांनी महिलांवरील अत्याचारांसंदर्भात तातडीची बैठक बोलावली
देशभरात सध्या महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांनी मोठ्याप्रमाणावर तोंड वर काढलं आहे. मात्र राज्यात मुख्यमंत्री पदासहित गृहमंत्री पद देखील सांभाळणारे हे केवळ पार्टटाइम गृहमंत्री असल्याचा आरोप विरोधकांनी नेहमीच केला होता. कारण, देशभरात महाराष्ट्र राज्य महिला विषयक गुन्ह्यांमध्ये द्वितीय क्रमांकावर असल्याचं राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने २०१७ मध्ये दिलेल्या अहवालात स्पष्ट झालं होतं. तसाही राज्याला गृहमंत्री आहे हे सामान्य माणसाला फडणवीस सरकारच्या काळात कधी माहीतच नव्हतं.
5 वर्षांपूर्वी -
केंद्राने जनतेच्या जीवनावश्यक मुद्यांवर लक्ष द्यावे, नको त्या प्रश्नांत लोकांना भरकटवू नका: मुख्यमंत्री
लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेनं राज्यसभेत वेगळी भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. ‘लोकसभेत जे झालं, ते विसरून जा. राज्यसभेत जेव्हा विधेयक मांडले जाईल तेव्हा शिवसेनेची भूमिका सर्वांपुढं येईलच,’ असं शिवसेना संसदीय पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरेंचं नाव निश्चित; पण भाजपचा विरोध?
मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाचे काम गतिमान झालेले नसले तरी त्याच्या नामकरणावरून निर्माण झालेला वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. या महामार्गास दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा भाजपचा प्रस्ताव मोडीत काढत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे या महार्गाचे नामांतर करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्याची घोषणा लकरच केली जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रानी दिली.
5 वर्षांपूर्वी -
उद्या खडसेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी भेट झाल्यास भाजपाला जय महाराष्ट्र निश्चित होणार
भाजपत ओबीसी नेते नाराज असून या पक्षाचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आपल्याला भेटले अशी माहिती राष्ट्रवादी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथे पत्रकारांना दिली. मंत्रीपदी निवड झाल्यानंतर आज प्रथमच भुजबळ यांचे नाशिकमध्ये आगमन झाले. त्यानंतर भुजबळ फार्म येथे त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
कर्नाटक निकाल: ४ राज्यात भाजपने जनादेश धुडकावल्याचं विसरून मोदी-फडणवीसांचा सेनेला टोला
कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींची री ओढत शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो