महत्वाच्या बातम्या
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारला
राज्याचे २९ वे मुख्यंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारला. यावेळी शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, नेते दिवाकर रावते, डॉ. निलम गोऱ्हे यांनी त्यांचे स्वागत केले. उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी अनेक दिग्गज नेत्यांनी या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती.
5 वर्षांपूर्वी -
आरे जंगल घोषित होणार का? पर्यावरणप्रेमी शिवसेना भवनाजवळ एकवटले होते
शिवसेनेची सत्ता आल्यावर ‘आरे हे जंगल घोषित करू,’ असे आश्वासन नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या प्रचारात दिले होते. शिवसेनेची सत्ता आली असून मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा आरेच्या मुद्दा अधोरेखित करण्यासाठी शिवतीर्थावर पर्यावरणप्रेमींनी हजेरी लावली. या वेळी पर्यावरणप्रेमींनी हातात ‘सेव्ह आरे’चा हिरव्या रंगाचा बॅनर घेऊन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर आरेतील पर्यावरणप्रेमी शिवसेना भवनाजवळ एकवटले होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करावे, अशी मागणी या पर्यावरणप्रेमींनी केली.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत आमदार आदित्य ठाकरेंना मिळणारा प्रशासकीय अनुभव कामी येणार
महाराष्ट्रात गेले काही दिवस सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. राज्यातील सत्ता स्थापनेचा अखेर मंगळवारी तिढा सुटला. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय (Supreme Court of India Order) देते, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आता आपले बहुमत दाखवत ‘महाविकास’आघाडी सत्ता स्थापन करणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली
महाराष्ट्रात गेले काही दिवस सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. राज्यातील सत्ता स्थापनेचा अखेर मंगळवारी तिढा सुटला. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देते, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आता आपले बहुमत दाखवत ‘महाविकास’आघाडी सत्ता स्थापन करणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
ठाकरे घराण्यातील मुख्यमंत्री; स्वर्गीय. बाळासाहेबांच्या राजकारणापलीकडील मित्रामुळे शक्य
महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय नाट्यानंतर पुन्हा एकदा सर्वात मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल. सर्वोच्च न्यायालयानं उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. तत्पूर्वीच अजित पवारांनी राजीनामा दिला आहे. अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे नाव जाहीर करण्यात आले आहे. उद्या बुधवारी शिवतीर्थावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. विशेष म्हणजे संपूर्ण हयातीत भाजपने जे कधीच होऊ दिलं नसतं ते स्वर्गीय. बाळासाहेबांच्या जुन्या राजकारणापलीकडील मित्राने म्हणजे शरद पवारांमुळे ते शक्य झालं हे देखील वास्तव आहे.
5 वर्षांपूर्वी -
उद्या उद्धव ठाकरे शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार
महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय नाट्यानंतर पुन्हा एकदा सर्वात मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल. सर्वोच्च न्यायालयानं उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. तत्पूर्वीच अजित पवारांनी राजीनामा दिला आहे. अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे नाव जाहीर करण्यात आले आहे. उद्या बुधवारी शिवतीर्थावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.
5 वर्षांपूर्वी -
५ वर्ष सेनेचाच मुख्यमंत्री; शरद पवारांसोबत उद्धव ठाकरेंची निर्णायक चर्चा
विधानसभा निवडणुकीचे निकल जाहीर होऊन जवळपास महिना पूर्ण होत आला असला तरी सरकार स्थापनेच्या हालचाली सुरूच असून त्या अंतिम आणि निर्णायक टप्यात आल्या आहेत. दरम्यान, महिन्याभराच्या राजकीय अनिश्चिततेनंतर शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेस यांच्यात सहमती झाल्यामुळे महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होण्याचा मार्ग आता प्रशस्त झाला आहे. आज, शुक्रवारी मुंबईत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अहमद पटेल यांच्या उपस्थितीत होणाऱ्या निर्णायक बैठकीत याविषयी औपचारिक घोषणा होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेनंही राज्यात मोहम्मद घोरीसारख्या विश्वासघातकी प्रवृत्तीला जीवदान दिले
हिंदू राजे पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद घोरी यांच्यात १८ छोटी-मोठी युद्धं झाली. त्यातल्या १७ युद्धांमध्ये मोहम्मद घोरीचा पराभव झाला. मात्र प्रत्येकवेळी पृथ्वीराज चौहान यांनी मोहम्मद घोरीला जीवदान देऊन सोडून दिले. हीच चूक त्यांना महागात पडली. शिवसेनेनंही महाराष्ट्रात घोरीसारख्या विश्वासघातकी प्रवृत्तीला जीवदान दिले. हीच प्रवृत्ती आज शिवसेनेवर पाठीमागून वार करण्याचा प्रयत्न करीत आहे,’ अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा लांबणीवर
येत्या २४ नोव्हेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, आता उद्धव ठाकरेंनी आपाला नियोजित अयोध्या दौरा रद्द केल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यात निर्माण झालेला सत्तास्थापनेचा पेच वाढल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी अयोध्या दौरा रद्द केल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, अयोध्येमधील वादग्रस्त जमिनीसंदर्भात सुप्रीम कोर्टाने ९ नोव्हेंबर रोजी ऐतिहासिक निकाल दिला. त्यावेळी ‘येत्या २४ नोव्हेंबर रोजी सर्व काही नियोजन व्यवस्थित झाल्यास मी स्वत: अयोध्येला जाईन’, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. परंतु, आता हा दौरा रद्द करण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे आणि शरद पवारांदरम्यान निर्णायक चर्चा सुरु
सत्तास्थापनेबाबत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे. भारतीय जनता पक्षाने सत्तास्थापनेस नकार दिल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला निमंत्रित केलं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात फोनवरून चर्चा झाली होती. यावेळी शरद पवारांनी उद्धव यांचं अभिनंदन केलं आहे. तसंच त्यानंतर आता उद्धव ठाकरे शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाण्यासाठी रवाना झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
चुकीच्या लोकांसोबत युतीकरून गेलो याचं दु:ख: उद्धव ठाकरे
देवेंद्र फडणवीसांकडून माझ्यावर खोटेपणाचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी मला खोटं म्हटल्यामुळे मी संवाद थांबवलाय. त्यामुळे यापुढे भाजपा खरं बोलणार असेल तरच युती होईल, असा ठाम पवित्रा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
सगळं आधी ठरल्याप्रमाणे व्हावं, बाकी मला काही अपेक्षा नाही: उद्धव ठाकरे
राज्यातल्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना आज वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या बैठका एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे आज शिवसेनेच्या आमदारांचीही बैठक पार पडली. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदासह सत्तेतल्या समान वाटपावर शिवसेना ठाम आहे. आमदार फुटू नयेत यासाठी शिवसेनेकडून सावधगिरी बाळगण्यात येत असून सर्व आमदारांना रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे. ‘मला युती तोडण्याची इच्छा नाही; पण जे ठरलंय तेच व्हावं. आमची बाकी काही अपेक्षा नाही,’ अशी आपली भूमिका उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
माझं वचन आहे! सरकार आल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार: उद्धव ठाकरे
औरंगाबादेतील शेतकऱ्यांसोबत जमिनीवर बसून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. आपलं सरकार आल्यास सातबारा कोरा करीन, हे माझं वचन आहे, अशी घोषणा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. एकीकडे सत्तास्थापनेची लगबग सुरु असताना उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर निघाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
पवारांनी शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त भागांना प्रत्यक्ष भेटी देताच 'डिजिटल' सत्ताधारी जमिनीवर
राज्यातील शेतकर्यांचे अवकाळी पावसाने झालेले नुकसान आणि राज्य सरकारच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या उपाययोजना याचा सविस्तर आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. राज्याचे मुख्य सचिव, कृषी, मदत-पुनर्वसन, वित्त आणि विविध विभागांचे सचिव, भारतीय हवामान विभाग आणि विमा कंपन्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
5 वर्षांपूर्वी -
भाजपाकडून ‘गरज सरो वैद्य मरो’चा दुसरा अंक सुरु: शिवसेना
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी, राज्यात सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. भारतीय जनता पक्ष -शिवसेना यांच्यात सत्तासंघर्ष सुरू असतानाच, शिवसेनेनं मुख्यमंत्रिपद आणि समान वाट्याच्या मुद्द्यावर आग्रही भूमिका घेतलीय. त्यात आता शिवसेनेनं भारतीय जनता पक्षावर समान वाटपावरून टीका करण्यास सुरुवात केली आहे. ‘गरज सरो, वैद्य मरो’चा दुसरा अंक सुरू झाला आहे, असा टोला शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाला लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मला सत्तेची हाव नाही; पण सत्तेत समसमान वाटा हवा: उद्धव ठाकरे
लोकसभा निवडणुकीवेळी सत्तेत समसमान वाटा देण्याचा फॉर्म्युला ठरला होता. त्याची अंमलबजावणी करायला हवी. त्यानंतरच सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येईल, असा इशारा देतानाच जागा वाटपात समजून घेतलं. सत्ता वाटपात समजून घेणार नाही, असा सूचक इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भारतीय जनता पक्षाला दिला.
5 वर्षांपूर्वी -
वांद्रयात जाऊन उद्धव ठाकरेंना उत्तर देणार: खासदार नारायण राणे
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं देखील उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात राजकीय युद्ध पेटण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडून अनेक वर्ष झाली असली तरी उद्धव ठाकरे आणि राणे कुटूंबातील वाद क्षमण्याची शक्यता नाही. मागील दोन दिवसातील सिंधुदुर्गमधील राजकीय आरोप प्रत्यारोपांनी वादाला पुन्हा तोंड फोडलं असून खासदार नारायण राणे देखील संतप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंची उंची मोदींएवढी नाही: किरीट सोमय्या
जळगाव येथील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा फोटो न लावण्यावरून भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार व प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. नरेंद्र मोंदीची उंची मोठी आहे, त्यांचा प्रोटोकॉल ठरलेला असतो. त्यांची उद्धव ठाकरे यांच्याशी तुलना होऊ शकत नाही, असा टोला शिवसेनेला लगावला. लोकसभा निवडणुकीत मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच महायुतीला मते मिळाल्याचे सांगत शिवसेनेला सोमय्या यांनी डिवचले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मातोश्रीच्या मिठाला जागला नाहीस आणि मला काय शिकवतोस, उद्धव ठाकरेंचा राणेंवर प्रहार
कणकवलीत शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांच्या प्रचारसभेत बोलत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणे पिता-पुत्रांवर सडकून टीका केली आहे. नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना भाजपात प्रवेश दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी भाजपाला शुभेच्छा दिल्या आहेत तसेच राणेंना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला त्यावेळी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. राणे जिथे जातील तिथे वाट लावतात, आधी काँग्रेसची आणि आता स्वत:ची विल्हेवाट लावली. करून करून भागले आणि देवपूजेला लागले, अशी त्यांची अवस्था झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
टीकेची पातळी घसरली; हर्षवर्धन जाधवांची उद्धव ठाकरेंवर अश्लिल भाषेत टीका
शिवसेनेचे माजी आमदार आणि आता शिवस्वराज्य बहुजन पक्षातून कन्नडच्या मैदानात उतरलेल्या हर्षवर्धन जाधवांची उद्धव ठाकरेंवर टीका करताना जीभ घसरली. जर शिवसेनेला मुस्लिमांचं वावडे आहे तर मग सत्तारांना शिवसेनेत कसे घेतले, असा सवाल करताना त्यांनी उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह विधान केले. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा