महत्वाच्या बातम्या
-
राणेंचा भाजपप्रवेश हे युती 'न' होण्याचं निमित्त ठरणार?
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्ष चांगलेच सक्रीय झालेले आहेत. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. दरम्यान, मागील राज्यसभा निवडणुकीच्या वेळी नारायण राणे जर भाजपमध्ये गेले तर युती अवघड असल्याचा सांगणारी शिवसेना नेमका कोणता निर्णय घेणार ते पाहावं लागणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद: राजकीय फायद्यासाठी एमआयएम'शी साटंलोटं करत निवडणूक जिंकून दाखवली
लोकसभा निवडणुकीत ‘एमआयएम’ आणि शिवसेनेत झालेल्या लढतीत ‘एमआयएम’ने शिवसेनेचा पराभव केला होता. पण त्याच ‘एमआयएम’ने विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेला मदत केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे कशी असतील याची चर्चा सुरू झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
चिदंबरम ‘हिंदू दहशतवाद’ शब्दाचे जनक : शिवसेना
आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना जामीन नाकारण्यात आला असून त्यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या राउज अॅव्हेन्यू कोर्टाने गुरुवारी हा निर्णय दिला.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO: आशिष शेलारजी भाजप निवडणूक लढवतं; मग हे नेते काय बोलत आहेत ईव्हीएम'वर?
ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरनं निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करावे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी गुणवत्ता असलेल्या आमदार-पदाधिकारी व अन्य नेत्यांना भाजपात सुरू असलेला प्रवेश आता बंद झाला असला तरी विदर्भातील नेत्यांचे आम्ही स्वागत करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले आहे. ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करणे हे अविश्वास दर्शविण्यासारखे आहे. ते न करता आत्मचिंतन करावे, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपनीती! एनसीपी'चे बहुतांश आमदार सेनेविरुद्ध निवडून आल्याचा इतिहास; युती अचानक तोडणार? सविस्तर
लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असल्या तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाचे अंतर्गत मनसुबे भलतेच असू शकतात याची शिवसेनेला देखील पूर्व कल्पना असणार. त्यात लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेलं यश देखील मोदीमुळेच आहे असं भाजपचे अनेक नेते पडद्याआड बोलून दाखवत आहेत, तर शिवसेनेचे अनेक खासदार देखील ते पाठीमागे मान्य करतात.
5 वर्षांपूर्वी -
कोस्टल रोड: सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती कायम, सेनेच्या ड्रीम प्रोजेक्ट्ला धक्का
कोस्टल रोडप्रकरणी मुंबई महानगरपालिकेला सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने कोस्टल रोडवर असलेली स्थगिती कायम ठेवली आहे. मुंबई हायकोर्टाने कोस्टल रोड संबंधी दिलेला निर्णय रद्दबातल ठरवण्यास सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी नकार दिला. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २० ऑगस्ट रोजी पार पडेल असं वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
निर्लज्ज युती सरकार! भरपाईसाठी धरणफुटीत वाहून गेलेल्या वस्तूंची बीलं दाखवा, अन्यथा!
तिवरे धरणाच्या दुर्घटनेत तब्बल १९ गावकऱ्यांचा जीव गेला असून त्यांचे कुटुंबीय प्रचंड दुःखात आहेत. अनेकांचे तेर अजून शव देखील मिळालेले नाहीत. सरकारने देखील संबधित मंत्र्यांना या ठिकाणी धाडले खरे मात्र त्यांनी देखील वरचेवर गावकऱ्यांशी चर्चा करून आणि त्यानंतर सरकारी विश्राम गृहात बसून स्वतःच्या अकलेचे तारे तोडून धरण खेकड्यानी तोडल्याचा जावईशोध लावला.
6 वर्षांपूर्वी -
मी विधानसभा निवडणूक लढणार, हाकाळपट्टीनंतरही आशा बुचकेंचा ठाम निर्धार
लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्यामुळे शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पुण्यातील शिरूर लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या आढळराव पाटलांचा पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे विजयी झाले. लोकसभा निवडणुकीत आशा बुचकेंनी पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळेच आढळराव पाटलांचा पराभव झाला असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेच्या मागणीकडे दुर्लक्ष करत लोकसभेचे उपाध्यक्षपद YSR काँग्रेसला?
लोकसभेच्या उपाध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाने वायएसआर काँग्रेस या आंध्र प्रदेशातील पक्षाला ऑफर दिल्याचे वृत्त आहे. दरम्यान एनडीएतील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेने या पदासाठी आधीच दावा केला होता आणि हा आमचा नैसर्गिक अधिकार असल्याचं म्हटलं होत. परंतु, शिवसेनेला डावलून वायएसआर काँग्रेसला ही ऑफर देण्यात आल्याने भारतीय जनता पक्षाची ही खेळी आश्चर्यकारक मानली जात आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते नरसिम्हा राव यांनी मंगळवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांची विजयवाडा येथे भेट घेतली आणि हा प्रस्ताव ठेवला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत खात्रीलायक वृत्त दिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीतून आलेल्या जयदत्त क्षीरसागरांना मंत्रीपद? जुन्या शिवसेना आमदारांमध्ये प्रचंड नाराजी
बहुप्रतीक्षित महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार १४ जून रोजी पार पडण्याची शक्यता आहे, त्या अनुषंगाने शिवसेनेतील आमदारांनी लॉबिंग केले होते मात्र लोकसभा निवडणुकीत बाहेरून आलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना शिवसेनेच्या कोट्यातील आणि मंत्रीपदे भारतीय जनता पक्षाला मिळण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यातील नेते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेनेकडून मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याचं बोलले जात आहे. परंतु बाहेरून आलेल्या नेत्याला मंत्रीपद दिल जाणार असल्याने शिवसेनेतील आमदारांमध्ये मोठ्याप्रमाणावर धूसफूस सुरु झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे 10 वेळा जरी अयोध्येला गेले तरी राम मंदिर होणार नाही
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे १६ जुन २०१९ रोजी अयोध्येचा दौरा करणार आहेत, तसेच याची अधिकृत माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलर वरून दिली आहे. या दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत शिवसेनेचे १८ नवनिर्वाचित खासदार देखील असतील. मात्र उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या आधीच केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी १ वादग्रस्त विधान केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
पहले सरकार, फिर मंदिर...उद्धव ठाकरे १६ जूनला अयोध्येला जाणार
लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेत फार काही अलबेल नव्हतं. उद्धव ठाकरे लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी सतत भाजप आणि नरेंद्र मोदींवर टीका करताना दिसले, परंतु पुन्हा दिलजमाई करत दोघेही सोबतच निवडणूक लढले. २०१९ लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींना कोंडीत पकडण्यासाठी उद्धव ठाकरेंनी अयोध्येचा दौरा केला होता आणि त्यावेळी “पेहले मंदिर फिर सरकार” असा नारा देत भाजप विरुद्ध उघड-उघड रणशिंगच फुंकलं होतं.
6 वर्षांपूर्वी -
नोटाबंदीचे श्राद्ध घालणारी शिवसेना आज मोदींच्या एवढ्या प्रेमात का? सोशल व्हायरल
८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी जाहीर केली होती. नोटबंदी जाहीर झाल्यानंतर भारतातील सामान्य माणूस थोडा आनंदी आणि थोडा त्रासलेला दिसला. आनंदी यासाठी कि भारतातला श्रीमंतांकडे असलेला काळा पैसा बाहेर येईल असं त्यांना वाटलं होतं, आणि त्रास यासाठी कि लोकांना तासंतास फक्त २००० रुपयांसाठी रांगेत उभे रहावे लागले.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे भाजपला इतके का घाबरू लागलेत, जयंत पाटलांचा सवाल
उद्धव ठाकरे भाजपला इतके का घाबरू लागलेत, जयंत पाटलांचा सवाल
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंचे विश्वासघातकी प्रयोग बघत राहण्याशिवाय वनगांच्या हाती काहीच नव्हतं
आज मुंबईच्या ‘मातोश्री’वर जाहीर पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेने भारतीय जनता पक्षाचे पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना शिवसेनेत प्रवेश दिला. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गावित हे पालघरचे शिवसेनेचे लोकसभा उमेदवार असतील, असे जाहीर केले. त्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, श्रीनिवास वनगांना विचारूनच गावित यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मी अजून थोडे काम करतो व नंतर उमेदवारी मागतो, असे वनगा यांनीच सांंगितल्याचे उद्धव ठाकरेंनी जाहीर केले.
6 वर्षांपूर्वी -
युतीचे उद्योग म्हणजे लहानपणी पाहिलेला सर्कशीचा खेळ - रोहित पवार
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी भाजप – सेना युतीवर सडकून टीका केली आहे. त्यांच्या मते आजचे युतीचे उद्योग म्हणजे मी लहानपणी पाहिलेलं सर्कसच. “कधीकाळी बाळासाहेब भाजपचा उल्लेख कमळाबाई म्हणून करायचे आणि भाजप शिवसेनेचा उल्लेख थोरला भाऊ म्हणून करत. इतकेच नाही तर राजकारणाच्या मैदानात जंगलातल्या ढाण्या वाघप्रमाणे ते लढायचे, सर्वांना त्यांच्याबद्दल आदर होता”, अशा शब्दात रोहित पवारांनी बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढली.
6 वर्षांपूर्वी -
पूल दुर्घटनेला मुंबईकरच जबाबदार, उद्धव ठाकरेंची सामानातून सर्वसामान्यांवर टीका
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल प्लॅटफॉर्म क्रमांक १ ला लागून असलेला हिमालय पादचारी पूल दुर्घटनेत ६ लोकांनी आपला जीव गमावला असून ३० पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. पुलाची पूर्ण जबाबदारी दिवसभराच्या टोलवाटोलवी नंतर मुंबई महानगर पालिकेने स्वीकारली आणि पालिकेत शिवसेनेची सत्ता असताना त्यांनी मृतांची तसेच जखमींची साधी चौकशी देखील केली नाही. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या पुलाची जबाबदारी स्वीकारलेली असतानाच उद्धव ठाकरेंनी जखमींची विचारपूस करणं गरजेचं होतं.
6 वर्षांपूर्वी -
"चोर झाले थोर", मोदी देशासाठी पंतप्रधान असतील, माझ्यासाठी मात्र नरेंद्रभाई - उद्धव ठाकरे
काल पर्यंत एकमेकांच्या मुळावर उठलेले भाजप – शिवसेना आज एकमेकांचे गोडवे गात आहेत. काल पर्यंत चोर वाटत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उद्धव ठाकरेंना थोर वाटत आहेत. “नरेंद्र मोदी हे देशासाठी पंतप्रधान असतील, मात्र माझ्यासाठी ते नरेंद्रभाई आहेत”. तुमच्या भावासारखी असणारी व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी असणे ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींचं कौतुक केलं.
6 वर्षांपूर्वी -
ना भेट, ना शब्द, उद्धव ठाकरे किती असंवेदनशील आहेत ते आज मुंबईकरांनी पाहिलं
मुंबई : मुंबई महापालिका ते दिल्लीत खुर्च्या उबवणाऱ्या शिवसेना नेत्यांची तसेच उद्धव ठाकरे यांची मुंबई शहर आणि मुंबईकरांप्रती असलेली असंवेदनशीलता आज अधोरेखित झाली आहे. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनल येथील पादचारी पूल काल रात्री कोसळून अनेकजण मृत्युमुखी पडले आणि जखमी देखील झाले. परंतु, मुंबई महापालिकेत सत्तेत असून देखील उद्धव ठाकरे यांनी चकार शब्द देखील काढला नाही, ना जागेची पाहणी केली, ना मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली, ना जखमी झालेल्यांची विचारपूस केली.
6 वर्षांपूर्वी -
सर्व वाघांचं शिवसेनेत स्वागत, मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांची घरवापसी
मुंबई – “सर्व वाघांचं शिवसेनेत स्वाग! शिवसेनेत फक्तं वाघच राहू शकतात आणि जो शिवसेनेचा आहे तो सेनेत परत आला आहे” असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांचं पक्षात स्वागत केलं. मी सोनावणेंना म्हटलं होतं शिवसेनेत प्रवेश करा, जुन्नर तर आपलंच आहे, शिरूर तर आपलंच आहे. तुम्ही काही दिवस बाहेर होतात पण तिथे आनंदी होतात का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला त्यावर शरद सोनावणे यांनी नाही असे उत्तर दिले. सोनावणे पक्षाबाहेर होते मात्र त्यांच्या मनात भगवा होता असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन