महत्वाच्या बातम्या
-
गोसेखुर्द प्रकल्पाचे काम २०२३ पर्यंत पूर्ण करणार | मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी केली. तसंच घोडाझरी शाखा कालवा इथं सुरु असलेल्या कामाचीही पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. या कालव्याची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री पुढील दौऱ्यावर निघाले असता, प्रकल्पग्रस्तांनी त्यांचा ताफा अडवला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली आणि निवेदन स्वीकारलं. दरम्यान मुख्यमंत्र्यांचा ताफा अचानक थांबल्यानं पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
4 वर्षांपूर्वी -
भाजप अडचणीत | औरंगाबाद विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज करा | केंद्राला पत्र
एकाबाजूला औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा प्रचंड तापला असताना मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरन संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असं नामकरण करा, अशी शिवसेनेची गेल्या कित्येक वर्षांपासूनची भूमिका आहे. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक आता तोंडावर आल्याने भाजप आणि मनसेकडून शिवसेनेच्या याच भूमिकेवरुन प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. राज्यात शिवसेना सत्तेत असताना औरंगाबाद शहराचं नामकरण का झालं नाही? असा सवाल करत भाजप आणि मनसेने शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तर काँग्रेसने संभाजीनगर नामकरणाला विरोध दर्शवला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मध्यंतरी काहींनी पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला | त्यांची तोंडं बंद झाली
मध्यंतरी काही लोकांनी राज्यातील पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. परंतु आता त्यांची तोंडं बंद झाली आहेत. कारण, पोलिसांचं कर्तृत्व सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. त्याला तोड नाही. पोलिसांची ही परंपरा १०० ते १५० वर्षांची आहे. त्यामुळंच कोणी कितीही आदळआपट केली तरी ते पोलिसांच्या कर्तृत्वाला डाग लावू शकणार नाहीत,’ असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विरोधकांना टोला लगावला.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात पालिका क्षेत्रांत उद्यापासून रात्रीची संचारबंदी | मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही संचारबंदी 5 जानेवारीपर्यंत लागू राहील.
4 वर्षांपूर्वी -
मेट्रो कारशेड | माझ्या मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी - मुख्यमंत्री
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. राज्यातील कोरोना परिस्थिती, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन, मुंबईसह राज्यात नाइट कर्फ्यू आणि लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याची आवश्यकता नाही, अशा विविध मुद्द्यांमध्ये मुख्यमंत्र्यांना हात घातला.
4 वर्षांपूर्वी -
ग्रामपंचायत निवडणूक | मुख्यमंत्र्यांची शिवसेना संपर्कप्रमुखांसोबत महत्वाची बैठक
महाराष्ट्रातील तब्बल १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठीचा अधिकृत निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर (Election Commission announces election program for 14 thousand 234 Gram Panchayat in Maharashtra) करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात एप्रिल ते डिसेंबरमध्ये या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली होती. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून, १५ जानेवारीला मतदान होणार आहे, तर १८ जानेवारीला मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
रेकॉर्डवर सांगतोय | मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही - मुख्यमंत्री
मराठा आरक्षण लढाई अंतिम टप्प्यात आहे, ही लढाई आम्ही जिंकणारच, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) म्हणाले. रेकॉर्डवर सांगतोय, मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं. ते विधानसभेत बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस काही सुचवूत आहेत का | दरेकरांना ताब्यात घेण्यासाठी फडणवीसांकडे पुरावे असतील तर द्यावेत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेत सरकारच्या कामाची माहिती दिली. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षासह विरोधी पक्षांवर देखील जोरदार निशाणा साधला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप केला. याला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत मग देशात घोषित आणीबाणी आहे का? असा सवाल उपस्थित केला
4 वर्षांपूर्वी -
इथे आणीबाणी, मग थंडीत आंदोलक शेतकऱ्यांवर थंड पाण्याचे फवारे मारणं काय सद्भावनेची गोष्ट?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेत सरकारच्या कामाची माहिती दिली. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षासह विरोधी पक्षांवर देखील जोरदार निशाणा साधला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप केला. याला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत मग देशात घोषित आणीबाणी आहे का? असा सवाल उपस्थित केला
4 वर्षांपूर्वी -
माझ्या प्रयत्नाने का होईना कुणाची तहान भागत असेल तर ते पुण्यही महत्वाचं - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे (Chief MinisterUddhav Thackeray) आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत (Aurangabad Water Supply Scheme). यादरम्यान त्यांनी औरंगाबादचं प्रत्येक घर बदलणारवाऱ्या ‘पाणी पुरवठा योजने;चं उद्घाटन केलं. गरवारे स्टेडियम वरील भव्य शामियान्यात हा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. या योजनेअंतर्गत औरंगाबादकरांना 24 तास पाणी उपलब्ध होणार आहे. या योजनेने औरंगाबादेतील प्रत्येक घरात पुरेसं पाणी पोहोचेल असं आश्वासन देण्यात आलं आहे. या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अनेक विषयांवर भाष्य केले;.
4 वर्षांपूर्वी -
येत्या १ मेपर्यंत समृद्धी महामार्गावरुन नागपूर ते शिर्डी प्रवास सुरू होणार | मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अमरावती जिल्ह्यातील शिवणी (रसुलपूर) येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी केली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणाले, “आज प्रथमच मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे महामार्ग या प्रकल्पाची पाहणी करायला आलो. या प्रकल्पाचे अप्रतिम काम चालू आहे. हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा ज्याचा महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा आपल्या देशातील सर्वोत्तम महामार्ग बनेल, असं काम आपण केलेलं असेल.”
4 वर्षांपूर्वी -
शिवसेनेला ते गृहित धरुन चालत होते | की शिवसेना फरफटत येणारच...पण
राज्यातल्या महाविकास आघाडीला (State MahaVikas Aghadi Government) एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज ‘महाराष्ट्र थांबला नाही. महाराष्ट्र थांबणार नाही’ या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं. सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, (Uddhav Thackeray) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी केलेल्या छोटेखानी भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. माझा सहकाऱ्यांवर विश्वास असून त्यांचे फोन टॅपिंग करण्याची मला गरज नाही असा जोरदार टोला त्यांनी लगावला.
4 वर्षांपूर्वी -
जास्त अंगावर याल तर हात धुऊन मागे लागेन | मुख्यमंत्र्यांचा भाजपला थेट इशारा
‘ सध्या फक्त हात धुतोय; जास्त अंगावर याल तर हात धुऊन मागे लागेन. काहींना डोक्याचे विकार झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करावे लागतील. मराठी माणसाला गाडून त्यावर कुणाला नाचता येणार नाही. तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो. सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा, आम्ही दहा सूड काढू’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी भारतीय जनता पक्षाला इशाराच दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
तुम्हालाही मुलबाळं आहेत, तुम्हालाही कुटुंब आहेत | जर मी मागे लागलो तर...
‘आव्हान मिळालं की मला जास्त स्फूर्ती मिळते. आडवे येणाऱ्यांना आडवं करून महाराष्ट्र पुढे जाईल,’ असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिला आहे. हा इशारा नेमका कोणासाठी आहे आणि मुख्यमंत्री ठाकरे यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, याविषयी आता चर्चेला उधाण आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
वाढीव वीजबिल | मनसेचा महामोर्चा | ठाण्यात उद्धव ठाकरे हाय-हाय घोषणाबाजी
वाढीव वीजबिलाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली (MNS party Protest against High Electricity Bills) असून आज (२६ नोव्हेंबर) राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसहित अनेक ठिकाणी महाराष्ट्र सैनिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळत असून राज्य सरकारविरोधात आक्रोश व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली असून अटक केली आहे. तर काही जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांना पक्षप्रमुख राज ठाकरेंनी सक्त आदेश दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
आव्हान मिळालं की मला जास्त स्फूर्ती मिळते | आडवे येणाऱ्यांना आडवं करून....
‘आव्हान मिळालं की मला जास्त स्फूर्ती मिळते. आडवे येणाऱ्यांना आडवं करून महाराष्ट्र पुढे जाईल,’ असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. हा इशारा नेमका कोणासाठी आहे आणि मुख्यमंत्री ठाकरे यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, याविषयी आता चर्चेला उधाण आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईतील पाणी कपात टाळण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करणार | राज्य सरकारचा निर्णय
मुंबईत मे आणि जून महिन्यातील पाणी कपात (Water reduction) टाळण्यासाठी मनोर इथं समुद्राचे 200 एमएलडी खारे पाणी गोडे करणाऱ्या नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणीचा आढावा घेऊन प्रकल्पाची पुढची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिले आहेत. वर्षा या शासकीय निवासस्थानी 200 एमएलडी नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
थकबाकीची रक्कम भरल्यास शेतकऱ्यांना ५० टक्के वीजबिल माफी मिळणार - राज्य सरकार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ऊर्जा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कृषी विभागाशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. नवीन कृषीपंप वीज जोडणीचे धोरण आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आले. त्यामध्ये लघुदाब वाहिनी, उच्चदाब वाहिनी, सर्व्हिस कनेक्शन व सौर कृषीपंप याद्वारे वीज जोडणी देण्याचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असून राज्यभर सुमारे एक लाख कृषीपंप वीज जोडण्या दरवर्षी देण्यात येणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीत महाराष्ट्र द्वेष्ट्यांचं राजकारण | तरी राज्यात करोडोची गुंतवणूक आणली
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज समाज माध्यमांवरून जनतेशी संवाद साधला. दरम्यान यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं आहे. दिवाळी दोन दिवसांवर आली असताना फटाक्यांमुळं कोरोना वाढण्याची शक्यता देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. तसेच राज्यातील मंदिरे का खुली करत नाहीत? यावरून देखील स्पष्टीकरण दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
..अन्यथा मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही | खा. नवनीत राणा संतापल्या
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पूर आणि अतिवृष्टीचा जोरदार आर्थिक फटका बसला आहे. ठाकरे सरकारने बळीराजासाठी १०,००० करोड रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच ही मदत शेतकऱ्यांना लवकरात लवकर वितरीत करण्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. परंतु, ही मदत शेतकऱ्यांसाठी अत्यंत तुटपुंजी असून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या शेतात अजून पंचनामे झाले नसल्याचं अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन