महत्वाच्या बातम्या
-
राज व उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं, म्हणून शिवसैनिकाचं आंदोलन
शाम मारोती गायकवाड या शिवसैनिक कार्यकर्त्याने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं म्हणून चक्क दादर टीटीच्या पुलावर चढून घोषणा दिल्या. या दोन्ही भावांनी एकत्र यावं आणि निवडणूक लढवावी, अशी भावनिक मागणी या तरुणाकडून करण्यात आली आहे. तासा भराने जेंव्हा त्याला अग्निक्षमण दलाच्या जवानांनी खाली उतरवले तेंव्हा त्याने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकीची मागणी करणारी पत्रकेही त्या ठिकाणी वाटली आहेत.
7 वर्षांपूर्वी -
सेना 'एनडीए'त राहायचं की नाही हा निर्णय घेण्यास स्वतंत्र: अमित शहा
शिवसेना ‘एनडीए’त राहायचं की नाही तो निर्णय घेण्यास ते स्वतंत्र आहेत. भारतीय जनता पक्ष कोणत्याही परिस्थितीला सामोर जाण्यास तयार आहे असं भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी लखनऊ मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.
7 वर्षांपूर्वी -
पालघर प्रचारातील युतीचा कलगीतुरा अगदी २०१४ प्रमाणे?
सत्तेतीलच दोन वाटेकरी पक्ष पालघर निवडणुकीतील प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि चिखलफेक करण्यात कोणती सुद्धा कसर शिल्लक ठेवताना दिसत नाहीत. त्याचाच प्रत्यय काल शिवसेनेच्या प्रचारादरम्यान आला आहे. कारण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाजाची एक ऑडिओ क्लिप ऐकवली.
7 वर्षांपूर्वी -
गृह राज्यमंत्री सेनेचे, तरी आश्वासन 'वसईतील गुंडगिरी मोडून काढू'?
सध्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला असून दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्यात कोणती सुद्धा कसर शिल्लक ठेवताना दिसत नाहीत. तसाच काहीसा प्रकार सेनेच्या प्रचारादरम्यान घडला आहे. कारण प्रचारादरम्यान उद्धव ठाकरेंनी वसईकरांना आश्वासन दिल की,’आम्ही वसईतील गुंडगिरी मोडून काढू’. विषय गमतीचा असा आहे की सध्या राज्यात भाजप-शिवसेनेच्या युतीच राज्य आहे. त्यात कायदा व सुव्यवस्था संबंधित मंत्रालय म्हणजे फडणवीस गृहमंत्री तर सेनेचे दीपक केसरकर हे राज्याचे गृह राज्यमंत्री आहेत.
7 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंनीच वनगा परिवारास तोडल, ते पाप त्यांचं : मुख्यमंत्री
भाजपकडून श्रीनिवास वनगाला लोकसभेची उमेदवारी देण्याच निश्चित झाले होत. त्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी श्रीनिवास वनगाला पाठिंबा देण्याचं मान्य केलं होत. परंतु नंतर त्यांनी वनगा परिवार तोडण्याचे पाप केलं आणि त्यांना भाजप विरुद्ध उमेदवारी सुद्धा दिली. त्यामुळे त्याचे फळ शिवसेनेला भोगावेच लागेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
बाळासाहेबांनी समोरुन लढा दिला, पण शिवसेनेत आज ती स्थिती नाही
बाळासाहेब ठाकरेंनी कधीच कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही आणि नेहमी समोरुन लढा दिला. परंतु आज शिवसेनेची आजची स्थिती पहिल्यासारखी राहिलेली नाही जशी बाळासाहेबांच्या वेळी होती. आजची त्यांची स्थिती पाहून जर सगळ्यात जास्त दुःख कोणाला होत असेल तर ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना असं म्हणत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी थेट शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष पणे विरार येथील भाजपच्या सभेत लक्ष केलं.
7 वर्षांपूर्वी -
पालघरच्या मूळ समस्या प्रचारातून बाजूला ?
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत स्थानिक मूळ विषयांना सर्वच पक्षाच्या नेत्यांनी तीरांजली दिली असून प्रचाराचा सर्व रोख हा वैयक्तिक टीकेवर केंद्रित झाल्याचे चित्र आहे. नालासोपारा, वसई, विरार, बोईसर ते पालघर पट्यातील लोकांच्या मूळ समस्या ह्या प्रचारातून गायब झाल्या असून एकमेकांवर चिखलफ़ेक करण्यातच सर्व पक्ष गुंतले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
भाजप-सेनेच्या सरकारमुळे गिरगांवकर रस्त्यावर: मेट्रो-रेल्वे प्रकल्प
मुंबईतील मेट्रो रेल्वेचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरु असून त्याला सुरवातीला गिरगावकरांचे सहकार्य लाभले होते. कारण या मार्गातील केवळ २ इमारती पाडाव्या लागतील असं आधी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून सांगण्यात आलं होत. परंतु भाजप-सेनेच्या सरकारने अक्षरशः त्या विषयावर यू-टर्न घेतल्याचे चित्र समोर आले आहे.
7 वर्षांपूर्वी -
नाहीतर सेनेचे आमदार-खासदार फुटण्याची शक्यता
शिवसेनेने २०१९ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जर भाजपसोबत युती केली नाही तर शिवसेना पक्षात उभी फूट पडून शिवसेनेचे अनेक आमदार आणि खासदार बाहेर पडतील असं मत आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. या विधानाने शिवसेना आणि रामदास आठवले यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
पालघर निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना बुलेट-ट्रेनच्या विरोधात ?
सध्या पालघर जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणुकीची लगबग असून त्याचाच मेळ साधून शिवसेनेने बुलेट ट्रेनला विरोध दर्शविला आहे. पालघर पोटनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने बुलेट ट्रेनविरोधी कृती समितीने आयोजित केलेल्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. तसेच शिवसेना या मोर्चात सहभागी होणार असल्याचे सूचित केले आहे. बुलेट ट्रेनला विरोध असण्यापेक्षा या मागील खरं कारण लोकसभा पोटनिवडणुक असल्याचं राजकीय विश्लेषक बोलत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
सोलापूर महापालिकेत मलईदार पदांसाठी सेना-भाजपचं मिलन
सोलापूर महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेनेचे एकमेकांशी जरा सुद्धा पटत नसताना ते महापालिकेच्या ७ विषय समिती सभापती निवडणुकीसाठी व मलईदार पदांसाठी एकत्र आले व आपसातील रुसवे फुगवे बाजूला ठेवले. विशेष म्हणजे विरोधकांना अंधारात ठेवून शिवसेनेचं आणि भाजपचं मनोमिलन झालं आहे.
7 वर्षांपूर्वी -
आप व शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच 'डिपॉझिट' जप्त
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष तर काँग्रेस आणि जेडीएस हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. परंतु बाकी सर्व पक्ष म्हणजे आप आणि शिवसेनेच्या पक्षाच्या सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
7 वर्षांपूर्वी -
नारायण राणे पालघरमध्ये शिवसेना विरुद्ध प्रचारात
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार नारायण राणे हे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपसाठी प्रचारात उतणार असल्याचे वृत्त आहे. पालघर मध्ये मोठया प्रमाणावर कोकणी मतदार तसेच भंडारी समाजाचे लोक आहेत. त्याचाच फायदा भाजपच्या उमेदवाराला व्हावा या उद्देशानेच खुद्द मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेंना प्रचारासाठी विनंती केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजपने बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन शंका दूर करावी : उद्धव ठाकरे
सध्या देशभरात भाजपची सर्वच निवडणुकांमध्ये विजयी घोडदौड पाहून सर्वच पक्षांकडून ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली जात आहे. त्यालाच अनुसरून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपने बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन लोकांच्या मनातील शंका दूर करावी अशी टिपणी केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
तुम्ही पालघरमध्ये माघार घ्या, आम्ही भंडारा-गोंदियात समर्थन देतो: उद्धव ठाकरे
भाजपने पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी मागे घेतल्यास शिवसेना भाजपला भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिडणुकीत समर्थन देईल असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर दौऱ्यावर आले असता प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.
7 वर्षांपूर्वी -
भाजपला निवडणुक जिंकण्यासाठी ई.व्ही.एम ची गरज - शिवसेना
कर्नाटक मध्ये सापडलेल्या १०,००० खोट्या निवडणुक ओळखपत्रांवरुन एकच रान उठले आहे आणि हा सर्व प्रकार निवडणुक प्रक्रियेला एक वेगळ्या पातळीवर घेऊन जात असल्याची चिन्ह दिसत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर राम कदमांची सडकून टीका
शिवसेना साधी नखं कापली तरी स्वतःला शहीद म्हणवून घेत फिरते अशी शिवसेनेची सध्याची परिस्थिती आहे अशी खरमरीत टीका भाजपचे आमदार राम कदम यांनी केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
२०१९ लोकसभेला भाजप शिवसेनेशी युती करणार: अमित शहा
कर्नाटक विधानसभेच्या निवडणूक प्रचारात व्यस्त असलेल्या अमित शहा यांनी ‘नवभारत टाइम्स’चे विशेष प्रतिनिधी गुलशन राय खत्री यांच्या बरोबर केलेल्या औपचारिक मुलाखती दरम्यान अमित शहा यांनी हे वक्तव्य केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
समुद्रच नसलेल्या १५ देशात ३२ रिफायनरीज.
कोकणातील नाणार रिफायनरीवरून राज्यात सध्या वातावरण तापलं असताना आणि ‘रिफायनरी हवी असेल तर विदर्भात समुद्र आणा, मी रिफायनरी देतो’, असं राज्याचे प्रमुख सांगू लागले. परंतु रिफायनरी बाबतचे जगातील वास्तव समोर आलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
आम्ही स्वबळावरच आणि निर्णयावर ठाम: उद्धव ठाकरें
पुढील सर्व निवडणूक शिवसेना स्वबळावरच लढणार असून आम्ही निर्णयापासून माघार घेणार नाही असं पुन्हां एकदा शिवसेना पक्ष प्रमुखांनी प्रसारमाध्यमांकडे स्पष्ट केलं.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB