महत्वाच्या बातम्या
-
सेनेने भाजपशी पुन्हा युती केल्यास ती त्यांच्याच मुळाशी येण्याची शक्यता? सविस्तर
भारतीय जनता पक्ष जर आज महाराष्ट्रात पाय घट्ट करू शकला असेल ते तो शिवसेनेमुळे. राज्यात फारसं अस्तित्व नसलेला भाजप त्यावेळी शिवसेनेसोबत युती करून राज्यभर पक्ष विस्तार केला. त्यानंतर २०१४ मध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर मात्र भाजप उन्मत्त झाली आणि स्वतःच्या मित्रपक्षांच्या अडचणीत वाढ करून, त्यांच्याच अस्तित्वाला आवाहन देण्याचा हेतुपुरस्कर प्रयत्न केला. त्यात भर म्हणजे राज्याची राजधानी असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश प्राप्त केलं. त्यामुळे भविष्यात भाजप शिवसेनेचा आर्थिक लचकाच मोडेल अशी शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई-ठाण्यात मराठी माणूस न एकवटल्यास, भविष्यात त्याला एकही राजकीय वाली नसेल? सविस्तर
सध्या राज्याची राजधानी मुंबई आणि त्याच्या आजूबाजूच्या ठाणे, मीरा-भायंदर शहरांमध्ये मराठी माणूसच अल्पसंख्यांक होण्याच्या दिशेने कूच करत आहे. हिंदी भाषिकांची संख्या इतकी प्रचंड वाढलेली दिसत आहे, की इथली राजकीय गणित देखील मराठी माणसाच्या मतांवर अवलंबून राहिलेली नाही. नेमकं तेच राजकीय वास्तव स्वीकारून मराठी माणसाची शिवसेना सुद्धा उत्तर भारतीयांच्या सन्मानासाठी मुंबई-ठाणे सारख्या शहरात खुलेआम सज्ज झाली आहे. मुबईकर आणि हिंदुत्वाच्या आडून मुंबई-ठाण्यातल्या मराठी माणसाला शिवसेनेने कधी मूर्ख बनवलं याचा पत्ता त्याला स्वतःला सुद्धा अजून लागलेला नाही.
6 वर्षांपूर्वी -
याला पाडू, त्याला पाडू हे करण्याच्या धुंदीतच उद्या हे स्वतः कोसळतील: उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षावर बोचऱ्या भाषेत टीका केली आहे. दरम्यान, सत्तासंघर्षवर देखील उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे, ‘सत्ता कोणाला नको आहे? राजकारण करणार्या सगळ्यांनाच ती हवी आहे, पण २४ तास त्याच नशेत राहून झिंगणे आणि झिंगल्यासारखे तर्राट बोलणे हे बरे नाही’, असे सामनाच्या अग्रलेखात भाजपाला खडे बोल सुनावले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
राम मंदिराचा विषय हिंदुत्ववाद्यांनीच गुंडाळून ठेवला: शिवसेना
अयोध्येत राम मंदिराबाबत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारकडून होत असलेला वेळकाडूपणा आणि RSS आणि विहिंपने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बदलेल्या भूमिकेवर शिवसेनेने सामनामधून टीकास्त्र सोडलं आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर राम मंदिराचे काय ते पाहू, असे बोलणे म्हणजे शरयू नदीत बलिदान देणाऱ्यांचा अपमान असल्याचं सामनात म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींचे २०१४ मधील सोशल मीडिया 'चाणक्या'नीतीचे तज्ज्ञ प्रशांत किशोर मातोश्रीवर
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या यशात समाज माध्यमांच्या आधारे नियोजनबद्ध वापर करून केंद्रात भाजपची सत्ता स्थापन करण्यात मोलाची भूमिका बजावणारे राजकीय पंडित आणि जेडीयूचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपसोबत युती नको, उद्धव ठाकरेंना भावना कळवल्या
केवळ आगामी लोकसभा निवडणुकीचा विचार न करता पक्षाचा दूरदृष्टीने विचार करून भारतीय जनता पक्षासोबतची युती तोडावी, अशा तीव्र भावना शिवसनेच्या प्रत्येक जिल्ह्यांतून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे कालच्या बैठकीत व्यक्त केल्या. परंतु, यावर पक्षप्रमुखांनी सध्या कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, सर्वांशी पूर्ण चर्चा करूनच आपण अखेरचा निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितल्याची वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
अण्णांनी आमरण उपोषणकरून प्राणत्याग करण्यापेक्षा रस्त्यावर उतरुन लढा द्यावा: उद्धव ठाकरे
जनलोकपाल, लोकायुक्त, शेतक-यांचे प्रश्न या अशा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राळेगणसिद्धी येथील संत यादवबाबा मंदिरात सगळं ५ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा ५वा दिवस असून त्यांच्या वयाचा विचार करता, त्यांची प्रकृती खालावल्याचे डॉक्टरांनी तपासणी अंती सांगितले. दरम्यान, अण्णा उपोषणाला शिवसेनेने पाठिंबा देत काही चांगल्या आणि वाईट गोष्टी सुद्धा सांगितल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
जॉर्ज यांनी कामगारांना अर्थवादात ओढले व कामगार चळवळीचे नुकसान झाले: उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जॉर्ज यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहत अत्यंत दुःख व्यक्त केले. त्यात त्यांनी भावना व्यक्त करताना म्हटले की, जॉर्ज फर्नांडिस यांचा स्वतःचा असा एक कालखंड होता. ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या काळात तळपत राहिले. परंतु हा तळपणारा तारा आता निखळला. तसेच आता राजकीय क्षितिजावरील एक धगधगती मशाल सुद्धा विझली आहे. इतिहासाच्या पानावर जॉर्ज फर्नांडिस यांचे नाव कुणाला पुसता येणार नाही, असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी सामनातील अग्रलेखात म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
'ठाकरे' सिनेमा आडून हवानिर्मिती, लवकरच मोदींसोबत जेवणाच्या टेबलवर युतीची चर्चा?
ठाकरे सिनेमा प्रदर्शित करून प्रत्येक ठिकाणी सिनेमाला जाताना मिरवणुका काढतंच जा असे जणू काही पक्षाचे आदेशच असावे, असं चित्र सध्या अनेक शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. सिनेमा प्रदर्शित करण्यापूर्वी अनेकांनी हीच शंका उपस्थित केली होती. पक्षाचे पदाधिकारी सुद्धा कार्यकर्त्यांना आदेश देऊन सिनेमाला जाण्यास सांगत आहेत, असे ठिकाणी प्रसार माध्यमांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे एकदा का सिनेमा प्रदर्शित झाला की पक्ष लगेचच युतीच्या बोलणीसाठी पुढे जाऊन ‘हिंदुत्वासाठी’ आम्ही एकत्र येत आहोत, असे पारंपरिक कारण पुढे करणार असल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
प्रियंका गांधी सुद्धा इंदिरा गांधींप्रमाणे हुकमाची राणी ठरतील: उद्धव ठाकरे
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सामनाच्या अग्रलेखातून प्रियंका गांधी यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाचे स्वागत केले आहे. तसेच त्यांना सक्रिय राजकारणात आणण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे सुद्धा कौतुक केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
बेस्ट कामगारांच्या संपात भाजपाने तेल ओतलं: उद्धव ठाकरे
बेस्ट कामगारांनी तब्बल ८ दिवसांनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने संप मागे घेतला. मात्र मुंबई बेस्ट कामगारांच्या संपात भारतीय जनता पक्षाने तेल ओतलं आणि त्यांनीच कामगारांना शिवसेनेच्या नावाने शहरभर बोंबाबोंब करण्यास सांगितले, अशा रोखठोक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’मधून केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवस्मारकाचा छळ करणाऱ्यांनाही पटकून टाका: उद्धव ठाकरे
इतरवेळी राज्य सरकार राजकीय निर्णय प्रचंड वेगाने घेतात, परंतु राज्यातील बहुचर्चित शिवस्मारकाबद्दल हलगर्जीपणाच आहे. भारतीय जनता पक्षाला आडवे येतील त्यांना ‘पटकून’ टाकू अशी भाषा वापरणाऱ्यांचे राज्य सध्या महाराष्ट्रात आहे. तसं असेल तर मग शिवस्मारकाचा छळ करणाऱ्यांना सुद्धा पटकून टाका, अशा शब्दांमध्ये शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
बेस्ट संप, रेल्वे प्रवास आणि उद्धव ठाकरे; व्हॉटसअॅप-एफबी'वरील तो फेक व्हायरल-चेक
सध्या सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होऊन जगभर पसरेल ते काहीच सांगता येणार नाही. मागील जवळपास ७ दिवसांपासून मुंबईमध्ये बेस्टचा संप सुरु असून सामान्यांसाठी मेट्रो आणि ट्रेन हीच परवडणारी प्रवासाची माध्यमं उरली आहेत. परंतु, सध्या याच संपाचा धागा पकडून रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका नेटकाऱ्याने रेल्वेतील प्रवाशाचा फोटो काढून तो समाज माध्यमांवर व्हायरल केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई की लखनौ-पटना? सेनेकडून मुंबईत मकर-संक्रांत आधी 'भोजपुरी लाई चणा' कार्यक्रम
सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले असून शिवसेना राज्याच्या राजधानीत मराठी संस्कृतीपेक्षा उत्तर भारतीय संस्कृतीवर अधिक भर देताना दिसत आहे. याआधी सुद्धा शिवसेनेकडून मुंबई आणि ठाण्यात भव्य उत्तर भारतीय सन्मान मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. दरम्यान, या कार्यक्रमात अश्लील भोजपुरी कार्यक्रमांचे आयोजनसुद्धा मोठ्या प्रमाणावर करण्यात येत. मुंबई उपनगरात शिवसेनेने उत्तर भारतीय लोकांपुढे पूर्णपणे लोटांगण घातल्याचे चित्र अनेक महिन्यांपासून पाहायला मिळत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
अहो मोठा-भाऊ लहान-भाऊ नाही, ते प्रियकर-प्रेयसीचं भांडण आहे: प्रकाश आंबेडकर
शिवसेना आणि भाभारतीय जनता पक्ष यांच्यातील भांडण हे पती पत्नीचं नाही तर प्रियकर प्रेयसीचं यांच्यातील आहे अशी बोचणारी प्रतिक्रिया भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी युतीबाबत दिली आहे. नाशिकला बहुजन वंचित आघाडीची सभा पार पडली त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शिवसेना आणि भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले.
6 वर्षांपूर्वी -
बेस्ट संप: 'बाबा किती खायचे ओ?' नितेश राणेंची व्यंगचित्रातून शिवसेनेवर टीका
आमदार नितेश राणे यांनी चक्क व्यंगचित्रातून उद्धव ठाकरेंवर बेस्ट संपाच्या विषयाला अनुसरून जोरदार निशाणा साधला आहे. मुंबईतील बेस्ट कामगारांच्या संपाचा आज सलग ७व्या दिवशी सुद्धा सुरूच आहे. त्यावरुन, नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
बेस्ट संपामधील एकाही कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नाही : उद्धव ठाकरे
मुंबईमधील बेस्ट संप चर्चेच्या मार्गानं तडीस लावण्यात येईल, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी सुरुवातीपासूनच दोन्ही बाजूने चर्चा सुरू आहे. तसेच या संपात सहभागी झालेल्या एकाही कामगाराची नोकरी जाणार नाही, असं आश्वासन सुद्धा उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांसमोर दिलं.
6 वर्षांपूर्वी -
ग्रामीण भागात आले की 'युती गेली खड्ड्यात' अन मुंबईत गुपचूप युतीची बोलणी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जेव्हा राज्याच्या ग्रामीण भागात दौऱ्यावर गेले की, ‘युती गेली खड्ड्यात’, अशा घोषणा देतात. त्यानंतर मुंबईत पोहोचले की पाठच्या दाराने गुपचूप मुख्यमंत्र्यांसोबत निवडणुकसंदर्भात युतीची चर्चा सुरु करतात. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशी खरमरीत टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भर सभेत केली.
6 वर्षांपूर्वी -
बेस्ट संप; शिवसेनेमुळेच हाेताेय BEST कर्मचाऱ्यांचा गिरणी कामगार : शशांक राव
आज सलग चौथ्या दिवशीसुद्धा बेस्ट कामगार संघटनेचा संप सुरूच आहे. त्यात महापालिका, बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये मागील ४ दिवस केवळ चर्चा सुरू असून सुद्धा काेणताही ताेडगा निघू शकलेला नाही.
6 वर्षांपूर्वी -
कालच्या पोरांनी ओला-उबेरला आर्थिक संपन्न केलं, मग सर्वकाही असताना बेस्ट 'डब्यात' का? सविस्तर
बेस्ट बस म्हणजे मुंबई आणि आसपासच्या शहरांची मुख्य प्रवास वाहिनी, असाच तिचा उल्लेख अनुभवातून करावा लागेल. सर्वाधिक प्रवासी क्षमता, जागोजागी स्वतः वाट पाहत थांबणारा सर्वाधिक ग्राहक म्हणजे प्रवासी, अनुभवी मनुष्यबळ आणि मुंबई सारख्या शहरात मोनोपॉली अशी शक्तिस्थळं असताना सुद्धा, आज आर्थिक दृष्ट्या बेस्ट खातं शेवटच्या घटका मोजत आहे, असंच म्हणावं लागेल. परंतु, असं काय झालं की काही वर्षांपूर्वी उदयाला आलेल्या ओला आणि उबेर सारख्या कंपन्यांचे बाजार मूल्य अब्जो रुपये आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल