Uflex India Share Price | एक बातमी आली आणि हा शेअर 14 टक्के वाढला, पुढे स्टॉकमध्ये मोठ्या हालचाली
Uflex India Share Price | ‘युफ्लेक्स इंडिया’ या पॅकेजिंग अँड सोल्युशन्स क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 14 टक्के वाढले होते. मात्र आज 2 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.54 टक्के घसरणीसह 411.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कालच्या व्यवहारात कंपनीचे या कंपनीचे शेअर्स 429.50 रुपयांवर पोहोचले होते. ‘युफ्लेक्स इंडिया’ कंपनीच्या शेअरमध्ये पडझड होण्याचे कारण म्हणजे, कंपनीच्या कार्यालयात इन्कम टॅक्स विभागाचे छापे पडले होते. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 6.82 टक्के कमजोर झाले आहेत. आयटी छाप्यानंतर स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीने ‘युफ्लेक्स इंडिया’ कंपनीकडून स्पष्टीकरण मागितले होते. 28 फेब्रुवारी 2023 रोजी कंपनीने स्पष्टीकरण दिले की, आयटी विभागाला छाप्यात काहीही मिळाले नाही. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Uflex Share Price | Uflex Stock Price | BSE 500148 | NSE UFLEX)
2 वर्षांपूर्वी