Ukraine Russia War | अमेरिका आणि मित्रराष्ट्रांच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर रशियन अण्वस्त्र बेलारूसमध्ये दाखल, युक्रेनला अणुहल्ल्याची धमकी
Ukraine Russia War | रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्षाहून अधिक काळ लोटला असला तरी आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे युद्ध लवकरच संपवण्याच्या मनःस्थितीत असल्याचे दिसत आहे. युक्रेनशी युद्ध सुरू असताना अमेरिका आणि मित्रराष्ट्रांच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर रशियाचे पहिले अण्वस्त्र बेलारूसमध्ये दाखल झाले आहे, अशी माहिती रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी दिली. बेलारूसची सीमा युक्रेनला लागून आहे, त्यामुळे पुतिन यांच्या या निर्णयामुळे युक्रेनला अणुहल्ल्याची धमकी आहे. पुतिन यांनी २५ मार्च रोजी बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनात करण्याची घोषणा केली होती.
2 वर्षांपूर्वी