Unemployment Allowance | राहुल गांधी आश्वासनं पाळतात, काँग्रेसशासित छत्तीसगडमध्ये बेरोजगारांना दरमहा रु. 2500 बेरोजगारी भत्ता जाहीर
Unemployment Allowance | तरुण बेरोजगार असणाऱ्यांना छत्तीसगड सरकारकडून दिलासा देणारी बातमी आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून छत्तीसगड सरकारने तरुणांना बेरोजगारी भत्ता देण्याची घोषणा केली आहे. राज्यातील बेरोजगार तरुणांना दर महिन्याला बेरोजगारी भत्ता दिला जाईल, असे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितले. पुढील आर्थिक वर्षापासून हा भत्ता दिला जाईल, असे ट्विट त्यांनी केले. बेरोजगारी भत्त्याचे आश्वासन काँग्रेसने निवडणूक प्रचारादरम्यान दिले होते.
2 वर्षांपूर्वी