आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 160 जागा कमकुवत तर जवळपास 30 टक्के विद्यमान खासदार पराभवाच्या छायेत
Upcoming Loksabha Election | आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्या मागील यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजप विद्यमान खासदारांना थेट तिकीट देण्यापूर्वी त्यांच्या लोकप्रियतेचा मतदारसंघनिहाय सर्व्हे घेतल्यानंतरच विचार करणार आहे असं वृत्त आहे. भाजप पक्ष नवीन आणि तरुण चेहऱ्यांनाही सोबत घेईल, पण वय किंवा कुटुंबातील सदस्यांना तिकीट न देण्याच्या कोणत्याही फॉर्म्युल्यावर फारसा भर देणार नाही. कुचकामी आणि कमकुवत खासदारांवरही पक्षाची नजर असून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात नेतृत्व त्यांच्याशी स्वतंत्रपणे संवाद साधणार आहे आणि त्यांना स्वतःहून बाजूला जाण्याच्या सूचना देण्यात येतील असं वृत्त आहे.
2 वर्षांपूर्वी