Uttar Pradesh Pollution | उत्तर प्रदेशात प्रदूषणाचा त्रास शाळांना, प्रार्थनेदरम्यान विषारी वायूमुळे विद्यार्थी बेशुद्ध पडल्याने खळबळ
Uttar Pradesh Pollution | उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील एका शाळेत सहा मुले अचानक बेशुद्ध झाली. धक्कादायक बाब म्हणजे याच शाळेतील मुले काही दिवसांपूर्वी बेशुद्ध झाली होती. मात्र शुक्रवारी लहान मुले बेशुद्ध होण्याचे प्रमाण वाढल्याने हे प्रकरण चिघळले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शाळेच्या मुख्याध्यापकांकडून मुलांच्या बेशुध्दतेसाठी जवळपासच्या औद्योगिक क्षेत्रातून निघणाऱ्या विषारी वायूला जबाबदार धरत आहेत, मात्र प्राथमिक तपासाच्या आधारे जिल्हा प्रशासन हा सिद्धांत फेटाळत आहे.
2 वर्षांपूर्वी