हिंदू राष्ट्र झालं आता लोकसभा निवडणुकीपूर्वी 'मुस्लिम मुक्त' उत्तराखंडसाठी महापंचायत, भाजपाची सत्ता असलेल्या राज्यात वातावरण पेटवलं जातंय?
Uttrakhand Politics | लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक राज्यांमध्ये हिंदू-मुस्लिम वादाचं विष पेरण्याचे प्रकार जोर धरू लागले आहेत. महागाई आणि बेरोजगारी हे मुद्दे भाजपच्या मुळाशी येऊ नये म्हणून मतांच्या ध्रुवीकरणातून सत्तेत येण्याच्या योजना अंमलात आणल्या जातं आहेत अशी टीका आता सुरु झाली आहे. विशेष म्हणजे ज्या राज्यात भाजपाच्या हातात सत्ता आणि प्रशासन आहे अशा राज्यातच हे प्रकार घडत असल्याने संशय अधिक गडद झाला आहे. तसेच गोदी मीडिया याच प्रकारणांवरून स्टुडिओत बसून हिंदू-मुस्लिम वातावरण कसं बिघडेल असेच डिबेट्स आणि चर्चा घडवून आणत असल्याने समाज माध्यमांवर भाजपवर जोरदार टीका सुरु झाली आहे. परंतु, भाजपचे हे खेळ आता लोकांना देखील समजू लागले आहेत. त्यामुळे यासाठी समर्थक हिंदुत्ववादी संघटनांना पुढे केलं जातंय. सध्या उत्तराखंड या संघटनांच्या निशाण्यावर आहे.
2 वर्षांपूर्वी