Vadilal Share Price | दणादण पैसा! वाडीलाल इंडस्ट्रीज शेअरने एका दिवसात 15% परतावा दिला, अप्पर सर्किट तोडणारा शेअर खरेदी करणार?
Vadilal Share Price | वाडीलाल इंडस्ट्रीज या आइस्क्रीम बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स काही दिवसांपासून सुसाट वेगात धावत होते. आज मात्र स्टॉकचा तेजीला ब्रेक लागला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वाडीलाल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स एका दिवसात 15 टक्के वाढीसह 3294.65 रुपये या आपला 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. तर दिवसाअखेरीस स्टॉक 14.73 टक्के वाढीसह 3187 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज मंगळवार दिनांक 11 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.14 टक्के घसरणीसह 3,008.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी