Vikram Gokhale | मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी तसंच नाट्यसृष्टीतही अढळपद निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंच निधन
Vikram Gokhale | ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झालं आहे. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांना 15 दिवसांपासून या रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण शनिवारी, दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती, मात्र शनिवारी प्रकृती बिघडली आणि त्यांचं निधन झालं. आज संध्याकाळी 6 च्या सुमारास त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
2 वर्षांपूर्वी