Vikram Solar IPO | विक्रम सोलर कंपनी 1500 कोटीचा आयपीओ लाँच करणार, गुंतवणुकीपूर्वी कंपनीचा तपशील पहा
जर तुम्हाला आयपीओमध्ये गुंतवणूक करायला आवडत असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. विक्रम सोलरच्या आयपीओला बाजार नियामकाची मान्यता मिळाली आहे. या आयपीओअंतर्गत 1500 कोटी रुपयांपर्यंतचे नवे शेअर्स जारी केले जाणार आहेत. याशिवाय ऑफर फॉर सेल (ओएफएस) अंतर्गत भागधारकांकडून 50 लाख इक्विटी शेअर्सची विक्री केली जाणार आहे. विक्रम सोलरने मार्चमध्ये बाजार नियामकाकडे आयपीओची कागदपत्रे दाखल केली होती. कंपनीला १० ऑगस्ट रोजी निरीक्षण पत्र मिळाले. आयपीओ सुरू करण्यापूर्वी कोणत्याही कंपनीला सेबीचे निरीक्षण पत्र घेणे आवश्यक असते.
2 वर्षांपूर्वी