महत्वाच्या बातम्या
-
जन आशीर्वाद हा शब्द शिवसेनेचाच | यात्रेमुळे महाविकास आघाडीला टक्कर वगैरे काही मिळणार नाही - विनायक राऊत
भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवरून शिवसेना नेते विनायक राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. जनआशीर्वाद हा शब्द शिवसेनेचाच आहे. भाजपने तो चोरला आहे, असं सांगतानाच नारायण राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही, असा हल्लाच विनायक राऊत यांनी चढवला.
3 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकारने ईडीचा कितीही वापर केला तरी महाविकास आघाडीला धोका नाही - खा. विनायक राऊत
मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली. केंद्र सरकारचं हे पाऊल चुकीचं होतं, असं सांगतानाच आता केंद्र सरकारने आता आपलं अपयश झाकण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे बोट दाखवू नये, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
चाकरमानी कोकणात ज्या ठिकाणावरून येणार, त्याच ठिकाणी स्वस्त दरात कोविड चाचणी करावी
गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे तसेच राज्यातील अन्य शहरांत नोकरीनिमित्त असलेले लाखो चाकरमानी आपल्या कोकणातील मूळगावी येत असतात. कोरोना संसर्गामुळे या चाकरमान्यांपुढे यंदा मोठे विघ्न आले आहे. गणपतीला गावी जायला मिळणार की नाही, असा प्रश्न सर्वांच्याच मनात होता. त्यावर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी घेतलेल्या बैठकीत उत्तर काल मिळालं.
5 वर्षांपूर्वी -
विनायक राऊत! तुम्हालाही चपलेने मारू', भाजप या नेत्याचा इशारा
नाणार रिफायनरीच्या मुद्द्यावरुन कोकणात रणकंदान सुरु आहे. दोन दिवस आधी शिवसेनेनं कात्रादेवीत शक्तीप्रदर्शन करत जाहीर सभेतून नाणार विरोधी भूमिका घेतली. नाणार विषय संपल्याचं जाहीर करत शिवसेनेकडून नाणारचे समर्थन करणाऱ्यांना शेवटचं अल्टिमेंटम दिला होता. “नाणार विरोधात दलाली करणाऱ्यांना चपलेनी झोडा” असं आव्हान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी जाहीर सभेतून दिलं होतं. “विनायक राऊत यांच्या या धमकीला घाबरणार नाही. रिफायनरी समर्थनाच्या सभेला जाणार,” असा चंग रिफायनरीला समर्थन देणाऱ्या शिवसैनिकांनी बांधला होता.
5 वर्षांपूर्वी -
नाणार प्रकल्पाचं समर्थन करणाऱ्या शिवसैनिकांचं थोबाड फोडा; तर राणेंबद्दल काय म्हणाले राऊत?
नाणार रिफायनरीच्या मुद्द्यावरुन कोकणात रणकंदान सुरु आहे. शिवसेनेनं कात्रादेवीत शक्तीप्रदर्शन करत जाहीर सभेतून नाणार विरोधी भूमिका घेतली. नाणार विषय संपल्याचं जाहीर करत शिवसेनेकडून नाणारचे समर्थन करणाऱ्यांना शेवटचं अल्टिमेंटम दिलं आहे. “नाणार विरोधात दलाली करणाऱ्यांना चपलेनी झोडा” असं आव्हान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी जाहीर सभेतून दिलं. तसेच नाणारला समर्थन करणाऱ्या शिवसेना जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांची जाहीर सभेतून हकालपट्टी करण्यात आल्याचेही राऊत म्हणाले. “विनायक राऊत यांच्या या धमकीला घाबरणार नाही. रिफायनरी समर्थनाच्या सभेला जाणार,” असा चंग रिफायनरीला समर्थन देणाऱ्या शिवसैनिकांनी बांधला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांच्या समोरच नाराज आ. भास्कर जाधवांनी सेना खासदाराचा हात झटकला
‘ज्या शिवनेरीची माती घेऊन मी अयोध्येला गेलो त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद माझ्याकडे आले हा एक चमत्कार आहे. इतिहासात रमण्यापेक्षा इतिहास घडविणे महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते उमरठ, पोलादपूर येथे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या ३५० व्या पुण्यतिथीनिमित्त समाधी वास्तूचे लोकार्पण सोहळा पार पडला.
5 वर्षांपूर्वी -
मनसेच्या भगव्या हिंदुत्वावरील राजकारणाची आम्हाला चिंता नाही: खा. विनायक राऊत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं अधिवेशन येत्या २३ तारखेला मुंबईत होणार असून त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना नव्या रूपात दिसणार असल्याचं वृत्त आहे. यावेळी तब्बल एक लाख कार्यकर्ते आणि पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्षाचा नवा झेंडा जाहीर करणार आहेत असं म्हटलं जातं. मात्र या मेळाव्याचं नवं पोस्टर प्रकाशित करण्यात आलंय. पोस्टरवर भगव्या रंगात महाराष्ट्राचा नकाशा दाखविण्यात आलाय. आधिचा पंचरंगी झेंडा पोस्टरवरुन गायब झालाय. राज ठाकरेंची महाराष्ट्रधर्माची भूमिका असणार असल्याचं स्पष्ट झालंय. सततच्या अपयशाला दूर सारण्यासाठी राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वादळ निर्माण करतील अशी शक्यता व्यक्त केली जातेय.
5 वर्षांपूर्वी -
राणेंच्या पनवतीमुळेच फडणवीसांची सत्ता गेली: खासदार विनायक राऊत
खासदार नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील राजकीय दरी सर्वश्रुत आहे. त्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून आमदार नितेश राणे आणि निलेश राणे यांचा ट्विटरवर पोस्ट टाकून हल्ला करण्याचा एककलमी कार्य्रक्रम सुरु आहे. त्यात खासदार नारायणे यांनी देखील भर टाकण्यास सुरुवात केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
BSNLने सिंधुदुर्गला ४-जी सेवेतून वगळले; अपयशी ठरताच विनायक राऊतांकडून भलतीच अफवा
आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. स्वतःच्या अडाणीपणामुळे कुप्रसिद्ध असलेले रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी आपला अडाणीपणा मागील पानावरुन पुढे चालू केल्याचे समोर आले आहे. संपूर्ण राज्यात सुरु असलेली BSNLची ४ जी सेवा सिंधुदुर्गात आणण्यात अपयशी ठरल्यानंतर आता राऊत यांनी आपल्या नसलेल्या अकलेचे तारे तोड्ड्ण्यास सुरुवात केली आहे. ही सेवा सुरु झाल्यास नागरिकांचे जुने मोबाईल फोन निकामी होतील व त्यांना नवीन फोन विकत घ्यावे लागतील, अशी अजब कारणं पुढे रेटली आहेत. त्यांच्या या “थोर” विचारांमुळे कोकणात युवापिढी राऊत यांना लाखोल्या वाहत आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेची धाकधुक वाढली! अंजली दमानिया खंबाटा कामगारांसह आज रत्नागिरीत
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया खंबाटा कामगारांसह आज रत्नागिरीत येऊन जाहीर पत्रकार परिषद घेणार आहेत. यामुळे खंबाटा ऐअरलाईन्स मुद्द्यावरून कोकणातील राजकारण प्रचंड तापण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
कोकणाचा निसर्ग भस्मसात करण्याचा सेनेचा डाव : नारायण राणे
कोकणाचा निसर्ग भस्मसात करण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचे नारायण राणे पत्रकारांना म्हणाले.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- BEL Vs Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत मिळेल परतावा - NSE: TATAMOTORS
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन